सार काही फिगरसाठी

"सारं काही फिगरसाठी" फिगर म्हटलं कि आपल्या समोर दोनच गोष्टी ऊभ्या राहतात. एक करिनाची 'झिरो' फिगर, अन 36,24,36 हिरोईनची परफेक्ट हिरो फिगर. पन या हि पलिकड सध्या ज्या फिगरने महाराष्ट्रात धुमाकाळ घालुन भल्या भल्यांचे होश ऊडवित आहे.ती म्हणजेच फिगर@144, अर्थात महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या सिंहासन काबीज करण्यासाठीची मोहिम. या वर्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये ऊभा ठाकला होता. त्यामुळे सर्वच पक्ष साम,दाम,दंड,भेद वापरून " किसमे कितना है दम, चुनके आयेंगे हम, चुन के आयेंगे हम तो, खुद ही बनेंगे 'बाजी'राव सिंघम." अशाच अविर्भावात वावरत होते. तस तर प्रत्येकाला स्वताच सिंघम बनायच असल्यामुळं,प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या सहकारी पक्ष व विरोधकांवर पातळी सोडुन प्रचारामध्ये ऊद्धार केला. असो ते सारं काही होत फक्त 'फिगरसाठीच' आता सध्या महाराष्ट्रात b j.p ने सर्वाधिक 123 जागा जिंकल्या.साहजिकच मुख्यमंत्री पदासाठीच त्यांची मोर्चेबांधणीही सुरूच आहे. पण स्वबळावर बहुमताच स्वप्न मात्र भंगले. शिवसेनेने दुसर्या क्रमाकांच्या जागा जिंकत आपली ताकद दाखवलीच, अन राष्ट्रवादी,काॅग्रेस ला मात्र बर्या पैकी प्रतिमा राखण्यात यश आलं,मात्र डोक्यावर अपयशाच गाठोड परफेक्ट बसल. पण या सर्व रनसंग्रामात 'स्वाभिमानी' म्हणुन असलेल्या अनेक घटक पक्षांच पानिपतच झालं. आता त्यांना त्यांच्या अपयशाच मंथन करण्यासाठी डोळे ऊघडुन 'व्हाईट प्रिंट' काढावी लागेल. या सर्व बाबीचा विचार करून भाजपाला मुख्यमंत्री व्हायचय अर्थात ते कुणाच्या तरी मदतीशिवाय शक्य नाही. त्यासाठी त्यांना त्यांच्या माजी सहकार्याची(सेनेची) आठवण झालीच असनार. पन सेना-भाजपाच्या युतीत काडी मुख्यमंत्री पदा वरूनच झाली. त्याचाच परिनाम विधानसभेच्या प्रचारात वाघापासुन ऊंद्रापर्यंत,व ऊंद्रापासुन देवेंद्रा पर्यंत टिका करण्यात गेल. तथा राष्ट्रवादीने भाजपाला बिनशर्त जो बाहेरून पाठिंबा दिलाय,तो मात्र अतिशय धक्कादायकच.राष्ट्रवादीच्या मदतीने जर सरकार बनलं,तर तो जनतेचा विश्वासघात होईल.कारन निवडणुक प्रचारात पंतप्रधानांनी राष्ट्रवादीला भ्रष्टवादी ठरवलं होत. मग पर्याय सेनेचा ऊरतो,पन सेनेने ही अफजलखानाची फौज,कुतुब'शहा' अशी अनेक विशेषने लावुनwhatss app,facebookवर भाजपाचा ऊद्धार केला होता. जर सेनेने भाजपा सोबत पुन्हा युती केली तर ती मात्र त्यांच्या 'स्वाभिमानी बाणाशी' केलेली बेईमानी असेल. मग पर्याय काय तर सध्याwhatss appवर जोरात सुरू असलेला dialogue अनेक विचारवंताना विचारात पाडु शकतो. तो असा कि "जब मिल बैठेंगे तीन यार, ऊद्धव,पृथ्वी और शरद पवार" अस जर काही घडल रे भौ तर मात्र ऊद्धव ठाकरेंच मुख्यमंत्री पदाच स्वप्न पुर्न होऊ शकतं.तसही आता भाजपा सेनेला दुय्यमच समजनार, कारन आतापर्यंत सेना महाराष्ट्राच्या राजकारनात भाजपाला आपल्यापेक्षा दुय्यमच समजत होती. पन यावेळेस भाजपाने सेनेला 'करून दाखवलं' त्यामुळे सेनेला नेहमीच खाली मान करून राहाव लागल, अन ते सेनेच्या स्वाभिमानास कदापि सहन न होनारी गोष्ट राहिल.कारन सन्मान आणि स्वाभिमान हिच आमची ओळख असे अनेकदा सेनेच्या शिलादारांच्या तोंडून ऐकले आहे. म्हणुन भाजपाला रोखण्यासाठी तीघाडी करून भाजपा मुख्यमंत्री पदाची बिघाडीही करता येऊ शकते. तस जर घडल तर राष्ट्रवादी,कांग्रेसलाही सत्तेत वाटा मिळु शकतो. बहुमत नसल्यामुळ सेना,राष्ट्रवादी,कांग्रेस एकमेकांना योग्य सन्मान देतीलच. त्यामुळे असा प्रकार येत्या काही दिवसात महाराष्ट्रात घडल्यास आश्चर्य नको....!!! शेवटी काय राजकारन आहे हे,या मध्ये काय होईल ते सांगता येत नाही. त्यामुळे अनेकांची झोप ऊडविनारी,व अनेकांच्या स्वप्नात जाऊन मनमोहनारी हि 'फिगर@144'गाठण्यासाठी कोन कोन किती कसरत घेतो,हे लवकरच स्पष्ट होईल. :-सौरभ गोपाळ हटकर हिवरखेड ता खामखाव 9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता