Posts

Showing posts from June, 2016

बौद्धिक संपन्नतेचा सूर्य आणूया ......

Image
  बौद्धिक संपन्नतेचा सूर्य आणूया  ...... एखाद्या व्यक्तीची कल्पना,अविष्कार किंवा संशोधनाची अथवा कलाकृतीची चोरी करुन, तिचा ऊपयोग त्याच्या परवानगी विना  स्वताःच्या फायद्यासाठी  करण्याच्या जुगाड प्रवृत्ती वर निर्बंध घालण्यासाठी तथा  मुळ मालकाच्या कल्पनेच्या हक्काचे संरक्षण करण्या करीता भारत सरकार ने बौद्धिक संपदा धोरण जाहिर केले. आणि  माझ्यासारख्या तरुणाला आनंदी व्हावे कि निराश  व्हावे हा प्रश्न पडला ?. कारण आनंद या साठी कि आता कोणीही कुणाच्या कल्पना ,निर्मितीची  चोरी करून कॉपी पेस्ट करणार्या प्रवृत्ती वर प्रतिबंध येतील आणि खऱ्या संशोधकाला व त्याच्या मेहनतीला  न्याय मिळेल .त्यामुळे भारतीयांच्या कल्नाशक्तीला वाव मिळून भारत स्वयंपूर्ण विकासाच्या वाटेवर प्रगती करायला लागेल. निराश या साठी झालो  कि अमेरिकेच्या दबाव खाली स्वीकारलेले  हे धोरण भारतीयांच्या 'जुगाड' संस्कृतीचे जागतिक स्तरावर वस्त्र हरण करणारे होते. खरतर हे धोरण जरी चित्रपट,औषधी,पुस्तक,संशोधन व ई.गोष्टींसाठी मर्यादित असले तरी ,या धोरणा  वरून भारताच्या  बौद्धिक   विकासाच्या पातळी  बद्दल सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे .