Posts

Showing posts from April, 2018

धनगर आरक्षण लढा:-एक चिंतन🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

महात्मा गांधीजी हे मुरलेले राजधुरंधर व्यक्तीमत्व होते.ते प्रत्येक लढा उभारायच्या वेळेस हा लढा अंतिम असून,स्वराज्य मिळविल्याशिवाय शांत बसायचे नाही असे सांगून लढा उभारायचे,,,,लढ्याला व्यापक जनस्वरूपही असायचे...पण गांधीजी काही सवलती मिळवून अचानक लढा मागे घेत असत....कारण त्यांना जनआंदोलने दिर्घ काळ टिकू शकत नाहीत ह्याची जाणिव असायची.....आंदोलन शांत झाल्यावर ते दुसरे आंदोलन सुरू करायच्या मधल्या काळात कृतीशील कार्यक्रम हाती घ्यायचे.जेणेकरून समाज संघटन सदृढ आणि लोकशाही स्विकारण्यास प्रवृत्त होईल. पुन्हा आंदोलन पुन्हा तोच जनसैलाब पुन्हा तह पुन्हा कृतीशील कार्यक्रम ....असा गांधीबाबाचा स्वातंत्र्य लढ्यातील प्रवास ठरलेला होता.यालाच struggle-truce-struggle असंही म्हटल्या गेलं.... सांगायचा मुद्धा हा की....अनेक वर्षांपासून विशेषतः 2013-14 पासून धनगर आरक्षण लढा जोरात चालू आहे.पण मुळतः तो दोनच पातळीवर झालेला दिसून येतो.आंदोलन आणि आश्वासन. या पलिकडे या लढ्यातून काही साध्य झालं असं मला तरी वाटत नाही(ते मंत्रीपद अन पहिली  खासदारकी ही स्वतः साठीची राजकीय सोय होती). मुद्धा असा की हे असंच किती दिवस चालण