Posts

Showing posts from July, 2019

अन्नदात्याच्या(बळीराज्याच्या) अवहलनेची कारणे आणि सन्मानासाठीचे उपाय.

नामदेव....माझा मित्र.तो 'शेती करतो'.शेती करतो असं म्हणने म्हणजे जरा पुणेरी आणि व्यवसायिकच वाटतं.तसं त्याच्या,माझ्या अन गावकर्यांच्या नजरेत तो 'वावरात खपतो'. मी  पुण्याच्या सदाशिव पेठेत   स्पर्धा परीक्षेची  तयारी करतो. जेव्हा केव्हाही पुण्याच्या ए.सी सभागृहात ऐकलेले 'आता तरूणांनी शेतीकडे वळावे" हे  वाक्य ऐकून त्याच्याशी बोलतो,तेव्हा तो त्याच्या पाठीला चिकटलेल्या पोटाच्या काळजातून अन दाभाडं बसलेल्या तोंडानी कळवळून सांगतो..."सौर्या तु काहीही कर पण गावात येऊ नकु,वावरात नुसती आयुष्याची माती हुती.तु तिकडं हाटेलीत कपबश्या धु नाही त काहीही पोटापुरतं पहा पण इथं येऊ नकु..इथं नियतीने वावराच्या अन वावराने जिवनाच्या सातबार्यावर  सततचा दुष्काळ अन वंचनाच कोरलेली आहे". हा नामदेव चा आग्रह दोन पुस्तकं वाचून किंवा अर्थशास्त्रातील सुत्र अभ्यासून निर्माण झालेला नव्हता.जो की मी माझा पुस्तकी शहाणपणाने खोडु शकेल.तर तो त्याच्या अर्ध्या आयुष्याच्या अनुभवातून अन बापाच्या अख्ख्या आयुष्याला प्रत्यक्ष बघून निर्माण झालेला होता. त्याचं हे असं बोलनं असो की माझ्याच बुलढाणा जिल्ह्या