Posts

Showing posts from June, 2014

वटपौर्णिमेचे विश्लेषण

"थोडस विश्लेषण वटपौर्णिमेचे" आज वट सावित्री। खरेतर हजारो वर्षापासुन चालत आलेली ही प्रथा। जी स्त्रीयांना वडाच्या झाडाला पुजण्यासाठी कटीबद्द करते आणि वर्षानुवर्षे तसेच सात जन्म तोच पती मिळावा असा अट्टहास त्या पुजेच्या माध्यमातुन केल्या जातो। हे सर्वश्रुत आहे माझे एवढेच म्हणने आहे की वृक्षांची पुजा कराच कारण की तुकोबांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" म्हणुन वृक्षांचे महत्व विशद केले होते । तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतुन वृक्षसंवर्धनाचा संदेश वेळोवेळी दिलाच आहे। व छत्रपती शिवराय,अहिल्याराणी होळकर यांनी ही वृक्षसंवर्धनाविषयी बरेच कार्य केलेले आहे। त्यामुळे स्त्रियांनी वटवृक्षाला गिरक्या मारण्यासोबतच एखादे वृक्ष लावुन तो वृक्ष पती जिवंत असे पर्यंत तरी मरणार नाही याची काळजी घेतली तरी वटपौर्णिमेच्या पुजेचे सार्थक होईल। त्याचा फायदा जगाला global warmingच्या जहरी सापा पासुन रक्षण्यासाठी व ozoneच्या संवर्धनासाठी होईल। ***अंधश्रद्धे बद्दल*** सात फेरे मारून सात जन्मी तोच पती मिळावा या प्रार्थने अगोदर थोडेश्या खालील गोष्टीवर विचार करून जरूर पुजा करावी। 1.पती जर pureबेवडा असला