Posts

Showing posts from October, 2014

~~~काय फायदा~~~

~~~~काय फायदा~~~ तुटलेल्या तारा छेडुन काय फायदा. सुर मिळनारच नाही। ताल धरून काय फायदा। शब्द माझे तिला कळनारच नाही, आता बोलुन काय फायदा। जगणे ज्याला जमतच नाही, त्या साठी मरून काय फायदा...? ओठावरच्या हसण्यातही डोळ्यावरच्या पापण्यातही, मनाच्या आरशातही, मिच आहे.. खोट अस वागण्यात काय फायदा....... मनात साचलेल्या सागराला, गुदमरलेल्या जिवाला, अबोल राहुन, डांबण्यात काय फायदा..... :-सौरभ हटकर 9604079143

सार काही फिगरसाठी

"सारं काही फिगरसाठी" फिगर म्हटलं कि आपल्या समोर दोनच गोष्टी ऊभ्या राहतात. एक करिनाची 'झिरो' फिगर, अन 36,24,36 हिरोईनची परफेक्ट हिरो फिगर. पन या हि पलिकड सध्या ज्या फिगरने महाराष्ट्रात धुमाकाळ घालुन भल्या भल्यांचे होश ऊडवित आहे.ती म्हणजेच फिगर@144, अर्थात महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या सिंहासन काबीज करण्यासाठीची मोहिम. या वर्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये ऊभा ठाकला होता. त्यामुळे सर्वच पक्ष साम,दाम,दंड,भेद वापरून " किसमे कितना है दम, चुनके आयेंगे हम, चुन के आयेंगे हम तो, खुद ही बनेंगे 'बाजी'राव सिंघम." अशाच अविर्भावात वावरत होते. तस तर प्रत्येकाला स्वताच सिंघम बनायच असल्यामुळं,प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या सहकारी पक्ष व विरोधकांवर पातळी सोडुन प्रचारामध्ये ऊद्धार केला. असो ते सारं काही होत फक्त 'फिगरसाठीच' आता सध्या महाराष्ट्रात b j.p ने सर्वाधिक 123 जागा जिंकल्या.साहजिकच मुख्यमंत्री पदासाठीच त्यांची मोर्चेबांधणीही सुरूच आहे. पण स्वबळावर बहुमताच स्वप्न मात्र भंगले. शिवसेनेने दुसर्य

मत को मत होना बेईमान

Image
                                                        " 'मत' को मत होना बेईमान"  तुकडोजी महाराजांनी मतदानाचे महत्व विशद करताना म्हटल "मत हे दुधारी तलवार " मताचा आज जर योग्य वापर नाही केला तर ते ऊद्याच्या दिवशी आपल्या वरच ऊलटेल व मारक ठरेल।  त्यामुळे मतदानकरने तर अगत्याचेच पण त्याहुनही महत्वाचे योग्य व्यक्तीला मतदान करने निकडिच। कारण आम्हाला परिवर्तनाची क्रांती करायची असेल,  तर आम्हाला योग्य जनप्रतिनिधींना निवडुन देऊन जनसामान्याचा व देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला 'जात,पात,धर्माला देऊया मुठमाती,  नेते निवडुया ऊज्वल भविष्या साठी' हा मुलमंत्र ध्यानात घ्यावाच लागेल.  डाॅ बाबासाहेबांनी आम्हाला जगातील सर्वात प्रभावशाली शस्त्र प्रदान केलेय।  ज्याच्या माध्यमातुन आपन परिवर्तनाची रक्तविरहित क्रांती करू शकतो। ते म्हणजेच मतदान. आज आमची ओरड आहेच कि कुठे नेवुन ठेवलाय आमचा देश,महाराष्ट्र ...?वगैरे...वगैरे। या गोष्टीचा विचार करता आमचा महाराष्ट्र प्रगतच झाला नाही.अस कोणी म्हणत असेल तर ते चुकीचेच पण हवा तेवढा विकास मात्र झाला नाही हे ही नाकारता येत नाही