लाॕकडाऊन डायरी-1* अन्यथा..... मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे
अन्यथा..... मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे.* मुद्धा फक्त पालघर घटने पुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही. ही कदाचित भयानक सुरूवात असु शकते...... काही दिवसांपुर्वीची घटना आहे.... माझ्या गावाजवळ औरंगाबाद वरून येणारा एक ट्रक य बंद पडला...... गुजरात मधील ते व्यापारी होते. औरंगाबाद वरून पुन्हा त्यांना हिंगोली ला जायचं होतं. रस्ता चुकुन ते आले होते. त्या ट्रकचा ड्रायव्हर अन एक सोबती दोघंही मुस्लिम होते. ट्रकला धक्का मारून चालू करायची गरज होती. दोघांकडुनही तशा प्रकारे भरलेला ट्रक चालू करणे शक्य नव्हतं.... म्हणून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तुरळक लोकांकडे ते मदत मागंत होते. तबलिगी प्रकरणानंतर...निर्माण झालेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जवळही कोणी जायला तयार नव्हते.... कित्येकांना हात दाखवू दाखवून थकलेल्या त्या दोघांनी ... ट्रक ला धक्का मारण्यासाठी कित्येकांना विनंतीही केली..... नुसता धक्का मारण्यासाठी 2 हजार रूपये देण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती.... तरीही दिवस भर त्यांना कोणीही मदतीचा हात सुद्धा दिला नाही. कोरोनाचं भय,मुस्लिमांप्रती निर्माण केलेल्या संशयाच्या वातावरणामधे म