Posts

Showing posts from 2014

माफ करा बाबासाहेब

      "माफ करा बाबासाहेब" प्रिय आदरनिय बाबा, ...............तुम्ही 58 वर्षाअगोदर आम्हाला सोडुन गेलात.सर्व कष्टकरी आणि शोषितांचा आभारस्तंभच नव्हे तर प्रेरणेचा सुर्य 6डिसे1956 ला काळवंडला.हजारो दिनांचा,बहुजणांचा कैवारी सोडुन गेलात...... पण जी मानसं जन्माला आल्यानंतर फक्त आपल्या 'बाल्या,बाली.....अन वंशाला वाली ' निर्माण करण्यासाठी जगतात,ती 'मातीत' गेल्यावर लोकांच्या 'मती' तुन ही जातात. पण बाबा तुमचं अवघ आयुष्यच येथील लाखो शोषितांची मती सुधरविण्यासाठी गेल. हजारो वर्षाची गुलामगिरीला सुरूंग लावण्यात गेल म्हणुन तुम्ही देह स्वरूपान जरी गेला असाल तरी अमुल्य विचारांच्या स्मृतीत येथील प्रत्येक व्यक्तीच्या मनात व डोक्यात बसला आहात. म्हणुन हे एक पत्र तुम्हाला लिहीतोय बाबा, तुम्ही(स्वर्ग मि म्हणनार नाही,कारण ते थोतांड असल्याची जाणीव तुम्हीच आम्ह दिलीआहे म्हणुन)प्रत्येक मानसाच्या ह्रदयात तुम्ही आहात आणि तुमच्याच त्या अंशाला जागृत करण्यासाठी समर्पित हे एक पत्र....... काल एका न्युज वाहिनीवर एक दृश्य पाहिल.....प्रचंड असा जनसमुदाय चैत्यभुमिवर जमला.....हजारो य

आता समजायला हवं तिने--

Image
तिने तसच का केल......? ती तसंच का वागली....? हे मि विचारनार नाही, कारन तो तिचा वैयक्तिक अधिकार आहे. तिच्या व्यक्तीस्वातंत्र्याचाही प्रश्न आहे. असो पन ज्या पद्धतिने त्याच्या भावनांचा अवमान तिने केला, ज्या छोट्याशा अपेक्षा त्याने तिच्याकडुन ठेवल्या नि त्या पन भंग झाल्यात त्याच पातक, व त्याची तिच्या प्रतिची तळमळ याचाही नैतिक रित्या तिने हिशोब(हिशोब या साठी म्हटलो कि त्याचा विचार करायला तिला अवडतचं नाही) करायला पाहिजेच ना. प्रेम म्हटलं कि अपेक्षाभंग आलेच,पन प्रेम म्हटलं तर अगोदर मिलन पन आलच ना. 'एक झलक सबसे अलग 'असे वर्णिन्यासाठी तिची भेट(स्वच्छेने) घेणे ही त्यालाnot permitedअसेल तर त्याचं खच्चीकरण होण्याव्यतिरिक्त होईल तरी काय....? तिने ही ईतक्या कठोर का व्हाव तस तर तिच वर्णन म्हणजेच सुंदर,मनमोहिनी,स्वप्नसुंदरी असेच केल ना,मग दगडासारख्या ह्रदयाच्या भावना त्याचा जिव नसेल का जाळत...?तसं तर ती खुप समजुतदार आहे.....मनातलं न बोलताच  कळत तिला सर्व......मग तो प्रत्येक क्षणाला तिला आठवणीत,फोन वर बोलतांना मध्येच शांत बसतो तेव्हा त्या अबोल पनात खुप काही सांगतो पन मग ती सर्व जाणुनह

~~~काय फायदा~~~

~~~~काय फायदा~~~ तुटलेल्या तारा छेडुन काय फायदा. सुर मिळनारच नाही। ताल धरून काय फायदा। शब्द माझे तिला कळनारच नाही, आता बोलुन काय फायदा। जगणे ज्याला जमतच नाही, त्या साठी मरून काय फायदा...? ओठावरच्या हसण्यातही डोळ्यावरच्या पापण्यातही, मनाच्या आरशातही, मिच आहे.. खोट अस वागण्यात काय फायदा....... मनात साचलेल्या सागराला, गुदमरलेल्या जिवाला, अबोल राहुन, डांबण्यात काय फायदा..... :-सौरभ हटकर 9604079143

सार काही फिगरसाठी

"सारं काही फिगरसाठी" फिगर म्हटलं कि आपल्या समोर दोनच गोष्टी ऊभ्या राहतात. एक करिनाची 'झिरो' फिगर, अन 36,24,36 हिरोईनची परफेक्ट हिरो फिगर. पन या हि पलिकड सध्या ज्या फिगरने महाराष्ट्रात धुमाकाळ घालुन भल्या भल्यांचे होश ऊडवित आहे.ती म्हणजेच फिगर@144, अर्थात महाराष्ट्र राज्यात सत्तेच्या सिंहासन काबीज करण्यासाठीची मोहिम. या वर्षाच्या महाराष्ट्र विधानसभेत प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या रणसंग्रामामध्ये ऊभा ठाकला होता. त्यामुळे सर्वच पक्ष साम,दाम,दंड,भेद वापरून " किसमे कितना है दम, चुनके आयेंगे हम, चुन के आयेंगे हम तो, खुद ही बनेंगे 'बाजी'राव सिंघम." अशाच अविर्भावात वावरत होते. तस तर प्रत्येकाला स्वताच सिंघम बनायच असल्यामुळं,प्रत्येक पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी आपल्या सहकारी पक्ष व विरोधकांवर पातळी सोडुन प्रचारामध्ये ऊद्धार केला. असो ते सारं काही होत फक्त 'फिगरसाठीच' आता सध्या महाराष्ट्रात b j.p ने सर्वाधिक 123 जागा जिंकल्या.साहजिकच मुख्यमंत्री पदासाठीच त्यांची मोर्चेबांधणीही सुरूच आहे. पण स्वबळावर बहुमताच स्वप्न मात्र भंगले. शिवसेनेने दुसर्य

मत को मत होना बेईमान

Image
                                                        " 'मत' को मत होना बेईमान"  तुकडोजी महाराजांनी मतदानाचे महत्व विशद करताना म्हटल "मत हे दुधारी तलवार " मताचा आज जर योग्य वापर नाही केला तर ते ऊद्याच्या दिवशी आपल्या वरच ऊलटेल व मारक ठरेल।  त्यामुळे मतदानकरने तर अगत्याचेच पण त्याहुनही महत्वाचे योग्य व्यक्तीला मतदान करने निकडिच। कारण आम्हाला परिवर्तनाची क्रांती करायची असेल,  तर आम्हाला योग्य जनप्रतिनिधींना निवडुन देऊन जनसामान्याचा व देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला 'जात,पात,धर्माला देऊया मुठमाती,  नेते निवडुया ऊज्वल भविष्या साठी' हा मुलमंत्र ध्यानात घ्यावाच लागेल.  डाॅ बाबासाहेबांनी आम्हाला जगातील सर्वात प्रभावशाली शस्त्र प्रदान केलेय।  ज्याच्या माध्यमातुन आपन परिवर्तनाची रक्तविरहित क्रांती करू शकतो। ते म्हणजेच मतदान. आज आमची ओरड आहेच कि कुठे नेवुन ठेवलाय आमचा देश,महाराष्ट्र ...?वगैरे...वगैरे। या गोष्टीचा विचार करता आमचा महाराष्ट्र प्रगतच झाला नाही.अस कोणी म्हणत असेल तर ते चुकीचेच पण हवा तेवढा विकास मात्र झाला नाही हे ही नाकारता येत नाही
         ~~~जाणीव~~~ सगळीकडे आपापल्या गल्ली,गाव,जिल्ह ्याच्या राज्याच(जसे लालबागचा राजा,मुंबईचा राजा,खामगावचा राजा) आगमन धडाक्यात चालु आहे। कुठेकुठे तर70किलो सोने450 किलो चांदीचे दाग दागिने घालुन आपल्या गल्ली गावाच्या राजाला घेऊन येताहेत. सोबत ढोल ताशे ,d.j हे घेऊनही कार्यकर्त्यांची फौजच असते. आम्हाला आमच्या देवाच,मंडळाच,गल्लीच वर्चस्व दाखविण्यासाठी आम्ही साम-दाम-दंड-भेद वापरून आमच्या गल्लीच्या मंडळाच्या राजाच खर्चिक स्वागत करतो पण देशाचा राजा मात्र नंगा होतोय याचीही जानिव असु द्या मित्रहो. गणेशजीचे वाहन ऊंदीर मामा त्याच शेतकरी राज्याच अन्न खातो.जर शेतकरीच मेला तर अन्न नसणार,मग ऊंदीर मामा कसे जगतिल .....? बफे पार्टी छानच आहे जिथ प्रश्न पडतो कि काय खाऊ नि कोणत खाऊ..? पण 'मि' 'कुठ व कस' खाऊ प्रश्न पडणारेही या देशात बर्याच प्रमाणात आहेत याचीही जाणिव असु द्या मित्रांनो. आम्ही भंडारा करतो,अन्नदान करतो हरकत नाही पण बफे पार्टीच्या नावाखाली अन्नाची नासाडी मोठ्या प्रमाणात होते हे ही नाकारण्या जोगी गोष्ट नाही. गणेश महोत्सव कोणी,कशासाठी सुरू केला किंवा गणपती वैदिक कि अवैदिक संस्क

for collegeous leaders..

"आम्ही बी बिघडलेलोच ना" काॅलेज मध्ये एका ठिकाणी झालेल्या भाषणाचा प्रसंग । मि तावातावात बोलत होतो कारणहीम विषयही 'आजचा भारत' होता। स्पर्धक तर होतेच पण आज मला स्पर्धे साठी नाही देशासाठी बोलायच होते। मग सुरूवातच ऊपस्थित सळसळत्या रक्ताच्या ऊकळत्या विचारांना प्राधान्य देणार्या तरूणाईला जयहिंद ची साद घालुन केली। हा देश तरूणांचा म्हटल्या जातो ,येथे प्रत्येक तिसरा व्यक्ती तरूण आहे । आणि जगातले सर्वाधिक तरूण भारतातच आहेत म्हणुन तरूणांचा तरूण देश भारत देश म्हणायला तस हरकत नाही। पण मग नुसताच संख्येने तरूण असलेला भारत मात्र तरूणांच्या आचरणाने वयोवृद्ध झाल्या सारखाच भासत आहे। ईतिहास वाचता भारताच्या तरूणांनी सुवर्णअक्षरांना लाजवेल अशीच कार्य केलीत म्हणुन भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,सुभाषचंद्रबोस यांसारखे ज्वलंत कार्यशिल तरूण, स्वामि विवेकानंदांसारखे तत्वशिल तरूण, छत्रपति शिव-संभाजींसारखे पराक्रमि तरूण, शिवाजी काशिद,तानाजीं सारखे स्वामिनिष्ठ तरूण। यांसारख्यांमुळेच तर मिळाली स्वातंत्र्य ,स्वाभिमानाची अस्मिता। यांसारख्या ध्येयवेड्या तरूणांनीच निर्माण केले स्वराज्य,स्वातंत्र्य मग येवढा ज

देश स्वातंत्र्य झाला....?

From saurabh hatkars blogspot "यह आझादी झुठी है देश कि जनता अभि भुकि है।" गडे हो हे शब्द आहेत विद्रोही विचारांची साहित्यिक तोफ जिने गुलामगिरीच्या गटारात दडलेल्या  वाघांना स्वाभिमानाची झलकारी देऊन व्यवस्था ललकारली होती। तेच खरे साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे। ज्यांनी हा देश शेटजी-भटजी-लाटजींचा हस्तक झालाय का...? या प्रश्नाच ऊत्तरच त आपल्या16 ऑगष्ट च्या मोर्च्यात दिले होते। त्या गोष्टीचा विचार करता। देश स्वातंत्र्य जरी झाला तरी तो कागदोपत्रीच सामान्य जन  आजही रसातळ लाच आहेत। याचा अर्थ आमच्या क्रांतीकारकांचे बलिदान व्यर्थ झाले असे नाही। पण शोकांतिका याच गोष्टीची कि त्यांचे तत्वज्ञान आत्मसात नाही झाले। :सौरभ गोपाळ हटकर। हिवरखेड

वटपौर्णिमेचे विश्लेषण

"थोडस विश्लेषण वटपौर्णिमेचे" आज वट सावित्री। खरेतर हजारो वर्षापासुन चालत आलेली ही प्रथा। जी स्त्रीयांना वडाच्या झाडाला पुजण्यासाठी कटीबद्द करते आणि वर्षानुवर्षे तसेच सात जन्म तोच पती मिळावा असा अट्टहास त्या पुजेच्या माध्यमातुन केल्या जातो। हे सर्वश्रुत आहे माझे एवढेच म्हणने आहे की वृक्षांची पुजा कराच कारण की तुकोबांनी "वृक्षवल्ली आम्हा सोयरे" म्हणुन वृक्षांचे महत्व विशद केले होते । तसेच तुकडोजी महाराजांनी ग्रामगितेतुन वृक्षसंवर्धनाचा संदेश वेळोवेळी दिलाच आहे। व छत्रपती शिवराय,अहिल्याराणी होळकर यांनी ही वृक्षसंवर्धनाविषयी बरेच कार्य केलेले आहे। त्यामुळे स्त्रियांनी वटवृक्षाला गिरक्या मारण्यासोबतच एखादे वृक्ष लावुन तो वृक्ष पती जिवंत असे पर्यंत तरी मरणार नाही याची काळजी घेतली तरी वटपौर्णिमेच्या पुजेचे सार्थक होईल। त्याचा फायदा जगाला global warmingच्या जहरी सापा पासुन रक्षण्यासाठी व ozoneच्या संवर्धनासाठी होईल। ***अंधश्रद्धे बद्दल*** सात फेरे मारून सात जन्मी तोच पती मिळावा या प्रार्थने अगोदर थोडेश्या खालील गोष्टीवर विचार करून जरूर पुजा करावी। 1.पती जर pureबेवडा असला

लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर

Image
"लोककल्याणव्रत राजमाता:-अहिल्याराणी होळकर" परवा परवाला एक मुलगी two-wheeler बुलेट वर जाताना दिसली। तेव्हा आजुबाजुचे बहुतेक लोक तिच्याकडे बर्याच कुतुहुलाने बघाया लागले। आणि तेव्हाच मनामध्ये विचार शिनशिनला कि आजच्या आधुनिक 21व्या शतकात जर एका महिलेला गाडी चालवताना पाहुन समाजास कुतुहुल वाटते तर 250वर्ष्या पुर्वी घोड्यावर स्वार होऊन, हाती तलवार घेऊन, रणांगणावर जाऊन, निधड्या छातीने, शत्रुच्या चिंधड्या ऊडविण्यासाठी रणमैदानावर झुंजणार्या त्या रणरागिणी लोकमाता,राजमाता अहिल्याराणीची काय शौर्यशाली कैफियत असेल..? खरेतर 'चुल आणि मुल' या महिलांच्या प्रतिगामि व्याख्येला शह देऊन, स्वबळावर,स्वकर्तृत्वावर स्वराज्य मिळविण्याचे कार्य आपल्या कतृत्वातुन घडवुन जगासमोर 'स्त्री' या शब्दाची व्याख्याच बदलवुन टाकणार्या तसेच जिजाऊंच्या प्रेरणेने,मल्हार रावांच्या मार्गदर्शनाने,व खंडोजीरावांच्या प्रेमाच्या जडणघडणीतुन घडलेले क्रांतीकारी स्त्रीरत्न तथा 17 व्या शतकातील महान  व्यक्तिमत्व लोकमाता अहिल्याराणी होळकर यांची  आज जयंती। 31मे 1725 साली माणकोजी-सौ.सुशिलाबाईंच्या पोटी जन्मास

मोदीजी अबकी बार होऊनच जाऊ द्या-1।

थोडस विश्लेषण: निश्चितच मि काही मोठा लेखक किंवा विचारवंत नाही। पण एक सामान्य व सुज्ञ नागरिक म्हणुन मला जे काही वाटते ते न भिता  मांडतो। 1.मोदी पंतप्रधान झाले त्यांचे अभिनंदन। 2.मोदींमुळेच प्रतापराव खासदार झाले त्यांचेही अभिनंदन। 3.निवडणुकी पुर्वी मोदी हेभाजप चे नेते होते  साहजिकच त्यांनी प्रखर हिंदुत्वाचे प्रतिनिधित्व केले पण निवडणुकीत त्यांनि सर्व धर्म सन्मानतेचा अवलंब केला(भाषणातुन) म्हणुन मुस्लिम समाज व ईतरही धर्मांची मते त्यांना मिळाले  पण आज त्यांच्या समर्थकांनि फेसबुक,whatss app  वरून जे कट्टर वादाचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत ते पाहुन लोकशाहीत सारंजमशाही,हुकुहशाही तर येणार नाही अशी भिती वाटाया लागली,,?? 4.मोदी हे आता भारताचे प्रतिनिधित्व करतील साहजिकच बहुजण समाजातील कोणीतरी देशाच्या पंतप्रधान पदी  पाहुन बाबासाहेबांचे स्वप्न पुर्ण झाल्याचे आत्मिक सुखही मिळतेय । 5.त्यांनि जे काही धोरणे सांगितली त्यातील युवक सबलीकरण व रोजगार ह्या अजेंड्यावर त्यांनि विशेष लक्ष द्यावे कारण अब की बार चा. प्रचार व प्रसार युवकांमुळेच झाला। 6.परिवर्तन हा जगाचा नियमच आहे। त्यामुळे

विश्वरत्न राष्ट्रसंत:तुकडोजी महाराज।

विश्वरत्न,मानवतावादी राष्ट्रसंत:वंदनिय तुकडोजी महाराज। मानसाला मानवता देणारे राष्ट्रसंत। विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत। सैन्याला धैर्य, तर जनतेला देशक्रांतीसाठी मनोधैर्य देणारे राष्ट्रसंत। मानव का धर्म क्या है?म्हणुन कट्टरवादाला धुडकाविणारे, तर या भारतात बंधुभाव नित्य वसु दे गाऊन एकात्मता जोपासणारे राष्ट्रसंत। 'हर हर बोलाना' ची गर्जना ठोकत मावळ्यांना पेटविणारे, तर 'बसलास कशाला आळशी बनायला' विचारून तरूणांना जागृत करणारे राष्ट्रसंत। "झाड झडुले शस्र बनेंगे भक्त बनेगी सेना।पत्थर सारे बाम्ब बनेंगे" ची ललकारी ठोकत देशक्रांतीची मशाल पेटवणारे , तर बिगडे हूए शासनाला खंजरी  च्या माध्यमातुन झलकारी देणारे राष्ट्रसंत। "मेरे प्यारे सुंदर भारत "पर ज्याचि नजर पडेल त्याला कापरे भरविनारे , तर घडु दे प्रभु एवढे घडु दे म्हणुन भारताला घडविनारे राष्ट्रसंत। तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो सांगुन ग्रामनाथ शेतकर्यास तारनारे, तथा अंधश्रद्धेच्या मनक्यावर घाला घालणारे राष्ट्रसंत। आज विश्ववंदनिय तुकडोजि महाराजांचे विचार आत्मसात  करण्याची गरज ईथल्या प्रत

विद्ध्यापिठ जोमात।विद्ध्यार्थी कोमात।।

     "गाजर-carry onचे" गोंधळ,गडबड,व घोटाळ्यामुळे (कु)प्रसिद्ध असलेले नागपुर विद्ध्यापिठ पुन्हा एकदा महापराक्रम करायच्या स्थितीत आहे। त्यामुळे हजारो विद्ध्यार्थांचे भवितव्य वेशीला टांगल्या जात आहे।परिणामी विद्ध्यार्थ्यांची मानसिकते वर परिणाम होऊन काही अनुचित  विध्वंसक प्रकारही घडु शकतो। सदर नागपुर विद्ध्यापिठातुन मागील वर्षी  चंद्रपुर,गडचिरोली जिल्ह्यासाठी     गोंडवाना विद्ध्यापिठाची निर्मिती करण्यात आली।परिणामि काही विद्ध्यार्थी जे द्वितीय वर्ष नागपुर विद्ध्यापिठात अनुत्तिर्ण झाल्यामुळे त्यांचा प्रवेश गोंडवाना विद्ध्यापिठात जबरदस्तीने स्थानांतरण करण्यात आले।सदर प्रकरणास विद्ध्यार्थांनी कडाडुन विरोध करण्यात आला होता। त्यासाठी अनेक विद्ध्यार्थी संघटना रस्त्यावर ऊतरून आंदोलन केले।सदर विद्ध्यार्थांचा रोष पाहुन विद्ध्यापिठाने carry onचे आश्वासनरूपि गाजर मात्र विद्ध्यार्थांना दिले।परिणामि अनुत्तिर्ण झालेले विद्ध्यार्थांनि वर्षभर काॅलेज नियमित केले।पण आत्ता मात्र ऐन  परिक्षेच्या काळात  विद्ध्यापिठाने ते गाजर स्वताच्याच खिशात घातले।व विद्ध्यार्थांचे ऊज्वल भविष्य धोक्यात आनले। पर