विश्वरत्न राष्ट्रसंत:तुकडोजी महाराज।
विश्वरत्न,मानवतावादी राष्ट्रसंत:वंदनिय तुकडोजी महाराज। मानसाला मानवता देणारे राष्ट्रसंत। विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत। सैन्याला धैर्य, तर जनतेला देशक्रांतीसाठी मनोधैर्य देणारे राष्ट्रसंत। मानव का धर्म क्या है?म्हणुन कट्टरवादाला धुडकाविणारे, तर या भारतात बंधुभाव नित्य वसु दे गाऊन एकात्मता जोपासणारे राष्ट्रसंत। 'हर हर बोलाना' ची गर्जना ठोकत मावळ्यांना पेटविणारे, तर 'बसलास कशाला आळशी बनायला' विचारून तरूणांना जागृत करणारे राष्ट्रसंत। "झाड झडुले शस्र बनेंगे भक्त बनेगी सेना।पत्थर सारे बाम्ब बनेंगे" ची ललकारी ठोकत देशक्रांतीची मशाल पेटवणारे , तर बिगडे हूए शासनाला खंजरी च्या माध्यमातुन झलकारी देणारे राष्ट्रसंत। "मेरे प्यारे सुंदर भारत "पर ज्याचि नजर पडेल त्याला कापरे भरविनारे , तर घडु दे प्रभु एवढे घडु दे म्हणुन भारताला घडविनारे राष्ट्रसंत। तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो सांगुन ग्रामनाथ शेतकर्यास तारनारे, तथा अंधश्रद्धेच्या मनक्यावर घाला घालणारे राष्ट्रसंत। आज विश्ववंदनिय तुकडोजि महाराजांचे विचार आत्मसात करण्याची गरज ईथल्या प्रत