Posts

Showing posts from 2016

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण . जगभरामध्ये अशी परंपराच आहे की,एखादी विशिष्ट व्यक्ती,दिवस   किंवा स्थळ जेथे/ज्यामुळे काही ऐतिहासिक काही घडले तर त्या व्यक्ती,दिवस किंवा स्थळाच्या स्मरणार्थ भविष्य व वर्तमान  काळातही तशाच प्रकारचे  उदात्त कार्य व्हावे. या प्रेरक हेतूने साजरे करतात. अशा विविध क्षेत्रातील  व्यक्तीमत्वां पैकी एक व्यक्तीमत्व भारतरत्न सर  मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.vishweshwarya ). यांच्या स्मरणार्थ 15  sept हा त्यांचा जन्मदिवस  अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो. विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते होते,त्यांची विशेष ओळख ही त्यांच्या संशोधनात्मक dam construction&water irrigation च्या निर्माण केलेल्या प्रणाली बद्धल आहे. त्यांच्या संशोधनामुळे  मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचले  आणि त्याचा   परीणाम सभोवातालच्या परीसरातील लोकांची तहान भागविने आणि उत्तम  शेतीवर  झाला. ब्रिटिश कालीन भारतात जन्मलेल्या  या जिज्ञासू व्यक्तीने आपल्या संशोधनाच्या बळावर ईतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले. म्हणून या संशोधन,जिज्ञासू आणि आभ

बौद्धिक संपन्नतेचा सूर्य आणूया ......

Image
  बौद्धिक संपन्नतेचा सूर्य आणूया  ...... एखाद्या व्यक्तीची कल्पना,अविष्कार किंवा संशोधनाची अथवा कलाकृतीची चोरी करुन, तिचा ऊपयोग त्याच्या परवानगी विना  स्वताःच्या फायद्यासाठी  करण्याच्या जुगाड प्रवृत्ती वर निर्बंध घालण्यासाठी तथा  मुळ मालकाच्या कल्पनेच्या हक्काचे संरक्षण करण्या करीता भारत सरकार ने बौद्धिक संपदा धोरण जाहिर केले. आणि  माझ्यासारख्या तरुणाला आनंदी व्हावे कि निराश  व्हावे हा प्रश्न पडला ?. कारण आनंद या साठी कि आता कोणीही कुणाच्या कल्पना ,निर्मितीची  चोरी करून कॉपी पेस्ट करणार्या प्रवृत्ती वर प्रतिबंध येतील आणि खऱ्या संशोधकाला व त्याच्या मेहनतीला  न्याय मिळेल .त्यामुळे भारतीयांच्या कल्नाशक्तीला वाव मिळून भारत स्वयंपूर्ण विकासाच्या वाटेवर प्रगती करायला लागेल. निराश या साठी झालो  कि अमेरिकेच्या दबाव खाली स्वीकारलेले  हे धोरण भारतीयांच्या 'जुगाड' संस्कृतीचे जागतिक स्तरावर वस्त्र हरण करणारे होते. खरतर हे धोरण जरी चित्रपट,औषधी,पुस्तक,संशोधन व ई.गोष्टींसाठी मर्यादित असले तरी ,या धोरणा  वरून भारताच्या  बौद्धिक   विकासाच्या पातळी  बद्दल सर्वांगीण विचार होणे गरजेचे आहे .

तोडुन फेकायच्या आधी सन्मानामने गळुन पडु.....

ताज तवानं फुल बघितल की मन कसं प्रसन्न राहतं............ त्या सोबतंच वेळ जावा...त्याच्या सुगंधाच्या सहवासातच राहावं..अस वाटन नैसर्गिकच असत.... पण तेच फुलं झुरमुसलेल शिळं असले तर...??? ते तितकंच नकोस वाटतं....... का..??? कारण ते सुकलेलं असतं....... त्यात नाविन्य किंवा हुरहुर माजविनारं कुतुहुल नसतंच..... नेमकं नात्यांच असंच आहे...... सुरुवातीला जेव्हा ते नवीन असतं तेव्हा ते आकर्षकच व हवहवंसच वाटतं..... त्याचा सहवास मिळो अथवा न मिळो पण सहवासाचे स्वप्नही खुपच रमणीय असतात.,,, तिच्या आठवणीच्या काळातील हुरहुरीची तिव्रता मनाला कंपनाचे तिव्र धक्के देणारी असतात.... फुलाविन सुगध अन सुगंधाविन फुल हा formulaजसा वर्क करत नाही....तसा तुजविन मि आणि माझ्याविन तु......हे ही शक्य नाही अशा अविर्भावात जगण्याचा तो काळ असतो.... पण जसा जसा काळ जातो तसा तसा त्यातल्या जिव्हाळ्याचा दर्पही सुकुन ते शिळं वाटाया लागतं. त्याला कारणंही अनेक असतात....करीयर,स्वप्न किंवा त्याच्या किंवा तिच्या आयुष्याच्या वेलीवर ऊगवलेलं आणखी एखादं दुसरं नविन फुल.................. अशावेळी जुन्या फुलाने त्या फांदीवर राहायचा