Posts

Showing posts from January, 2018

स्वच्छ सर्वेक्षण ..2018

स्वप्न जुळलेली होती स्वच्छ अन सुंदर भविष्याची... त्या स्वप्नांचं क्षणात विघटन झालं.... काय वाटत असेल त्यांना.....?? केला साफ कचरा ज्यांनी.... अन त्यांनाच कचर्यासारखं झाडून बाजूला केलं... काय वाटत असंल त्यांना....?? शेकडो GVP transform केले ज्यांनी.... आता त्या सर्वांचाच 'सुशिक्षित'GVP होणार .... काय वाटत असंल त्यांना....?? या देशात कचर्याचं देखील सर्वेक्षण होतं... प्रक्रियेसाठी...पुनर्वापरासाठी... चांगलीच गोष्ट आहे..... पण बेरोजागरांच कधी होणार... या  देशाच्या भवितव्यासाठी..?? असा विचार येत असेल ज्यांना.. काय वाटत असेल त्यांना... असेच जर DUMP जाहलो तर सडू.... जात,धर्म,प्रांत ,झेंडे,दांडे यात अडकून पडू..... जमलं तर करा .... विचार वरील बाबींचा.... देशासाठी आम्ही योगदान देऊन घडू... असा विचार आला ज्यांना कसं वाटत असंल त्यांना.. असेल विचार काहींचा बंडाचाही या विरोधात.... पण ध्यानात ठेवा  यारहो... काहीच वाटणार नाही त्यांना......

बा'च सर्वेक्षण

' बागायत वाटली तरी जिंदगी पडित आहे..... रूबाबात फिरती नेते बाप अडगळीत आहे.... काय मागणं मागू तूला सांग सांता...? भकास 'बा' ची दुरडी, अन सजलेली तिरडी आहे...... जात नसतो मी दर्शनाला, कुठल्याच देवस्थानाला..... बाप माझा साई,अन वावर शिर्डी आहे... भागविण्यास भूक जगाची बाप झुरतो मग मरतो.... ढेकर देताच 'इंडीयाने',मग कळतं बाप पुरूनही उरतो...... त्याच्या वाट्याचा हा अवमान टळाला पाहिजे... त्याचेही व्हावे एखादे  सर्वेक्षण, अन त्यालाही सन्मान मिळाला पाहिजेत... ✍🏻सौरभ हटकर खामगांव जि बुलढाणा9604079143 saurabhhatkar.blogspot.com

06 Dec...

मोहम्मद माझा खास दोस्त,अगदी हक्काने खिरखुर्मा सांगावा अन नाही आणला तर हक्काने शिव्या खाणारा मित्र.त्याचंही वय माझ्या वयाइतकंच म्हणून  वयाच्या 23 व्या वर्षी लग्न झालेल्या मोहम्मदची'हनिमुन' वरून मजा घ्या की,Family planning future वरून.तो हसूनच उत्तर देणार. घरून चिकन आणनार,तर कधी-कधी त्याच्या शेतातही जेवायला नेणार......इतका जवळचा तो दोस्त. तसाच आमच्या मैत्रीत सोबतीला तिसरा असणारा 'राम' ही आहे. राम सुद्धा तितकाच जिगरबाज.... आम्हा सर्वांना एकमेकांची दुःखे समान अन स्वतःची वाटतात. पैसे संपो की मुड खराब असो की चहा पाजायचा प्रश्न असो....प्रत्येकजण जबाबदारी पार पाडायला आवर्जून  पुढे  असतो.आमचे डबे शेअरींग करून खातानांचा आनंदच निराळा असल्याचा,अनुभव नेहमी प्रत्ययास येतो. म्हणूनच कदाचित आम्हाला कधीही  तो..'तो' आहे असं वाटलं नाही,अन मोहम्मदनेही कधी आम्हाला  वो...'वो' है असं जाणवू दिलं नाही. खरंतर आमची मैत्री भारताच्या तिरंग्या सारखी बहूरंगी पण तितकीच एकरूप आहे.. नव्हे आम्ही 'आमच्यातच' ईतके मिसळलोय अन  इतके एकरूप झालोय की,सारा देश असा वागला तर धर्माच