Posts

Showing posts from 2020

आंबेडकर ,अमेरिका आणि आम्ही..... (जाॕर्ज फ्लाॕईड व कोरोनाच्या निमित्ताने)

जाॕर्ज फ्लाॕइड च्या हत्ये विरोधात अमेरिकेतील श्वेत-कृष्ण वर्णीय जनता सरकार व पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर येते.... आंदोलन करत व्हाईट हाऊस पर्यंत जाते........ कोरोना पासून मृत्यू च्या  भीती पेक्षाही त्यांना, त्यांच्या मुलभूत हक्कांचे जिवंत राहणे अधिक महत्वाचं वाटतं..... कोरोना पेक्षाही वंशभेद अधिक धोकादायक वाटतो... म्हणून त्यांनी अन्याय झालेल्या व्यक्तीचा वंश न पाहता,व्यवस्थेच्या अन्याया विरोधात एकत्र आले. म्हणून अमेरिकेतील लोकशाही अधिक प्रगल्भ आहे. ती शासन व्यवस्था म्हणून नव्हे तर तेथील जनतेला व्यवस्थेच्या व अन्यही अन्याया विरोधात तिव्रतेने एकत्र आणते.... त्याचवेळी... दुसरीकडे ,आपल्या देशांत आकस्मिक लाॕकडाऊन जाहिर होतं. रस्त्यानी उपाशी  पोटी असणारी लोकं-लहान लेकरं-प्रेग्नंट स्त्रीया पायपीट करीत शेकडो किलोमिटर आपल्या गावी चालंत जात होत्या...... एक 14-15 वर्षाची ज्योती पासवान नावाची पोरगी 1200 कि.मी चा प्रवास, आपल्या बापाला घेऊन सायकल वर करते. एक दीड वर्षाच्या लहान लेकराची माय रेल्वे platform वर मृत पडलेली असते,ते लेकरू त्याच्या माय ला उठविण्यासाठी धडपड करीत आई शेजारी भ्रम

गृहितके मोडली पाहिजेत*

(लेख जूना आहे,पण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा  लागू पडतो. नुसता वाचू नका,समजून घ्या....) ✍🏻सौरभ हटकर. एखादा  समूह संघटित नसतो ,त्याला त्याच्या प्रश्नाची जाणिव नसते.  त्याच्या वर होणाऱ्या अत्यंत अत्याचाराला तो नियतीचाच भाग समजायला लागतो. आपले हक्क ,न्याय या बाबत तो समूह पूर्णपणे अवगत नसतोच. अशावेळी त्या समाजावर व्यवस्था अन्याय करायला लागते. या  संपूर्ण अन्यायाला   त्या   समुहाचे  शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक,आर्थिक मागासलेपणंच जबाबदार असते.  अशावेळी प्रवाहाबाहेरील  त्या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य  वेलफेयर म्हणवून घेणाऱ्या राज्य संस्थेस करावयाचे असते. परंतू,तसं करने खडतर व जोखिमीचे ठरते. कारण उपेक्षित समुहाचे सक्षमीकरण केल्यास,उद्या तो  समाज आपला वाटा मागण्यासाठी उभा राहिला तर त्या समाजाला आतापर्यंत  गृहीत धरून व्यवस्था आपल्या मांडीखाली  सतत ठेवन्याची सवय झालेल्या  प्रस्थापित  वर्गाला त्याचा धक्का  बसू शकतो.  म्हणून प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध उपेक्षित समुहात असंतोष निर्माण होऊ नये व त्या असंतोषातुन उपेक्षित समुहाला आपला न्याय वाटा हक्काची जाणीव होऊ नये .   या करीता ,प्

लाॕकडाऊन डायरी-1* अन्यथा..... मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे

अन्यथा.....   मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे.* मुद्धा फक्त पालघर घटने पुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही. ही कदाचित भयानक सुरूवात असु शकते...... काही दिवसांपुर्वीची घटना आहे.... माझ्या गावाजवळ औरंगाबाद वरून येणारा एक ट्रक य बंद पडला...... गुजरात मधील ते व्यापारी होते. औरंगाबाद वरून पुन्हा त्यांना हिंगोली ला जायचं होतं. रस्ता चुकुन ते आले होते. त्या ट्रकचा ड्रायव्हर अन एक सोबती दोघंही मुस्लिम होते. ट्रकला धक्का मारून चालू करायची गरज होती. दोघांकडुनही तशा प्रकारे  भरलेला ट्रक चालू करणे शक्य नव्हतं.... म्हणून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तुरळक लोकांकडे ते मदत मागंत होते. तबलिगी प्रकरणानंतर...निर्माण झालेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जवळही कोणी जायला तयार नव्हते.... कित्येकांना हात दाखवू दाखवून थकलेल्या त्या दोघांनी ... ट्रक ला धक्का मारण्यासाठी कित्येकांना विनंतीही केली..... नुसता धक्का मारण्यासाठी 2 हजार रूपये देण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती.... तरीही दिवस भर त्यांना कोणीही मदतीचा हात सुद्धा दिला नाही. कोरोनाचं भय,मुस्लिमांप्रती निर्माण केलेल्या संशयाच्या वातावरणामधे म

महादेव जानकर साहेब:- वाढदिवसा निमित्त माझ्या नजरेतून विश्लेषण.

Image
✍🏻सौरभ हटकर (टिप:- मी जानकर साहेबांचा भक्तही नाही अन विरोधक सुद्धा नाही. म्हणून पुर्ण पोष्ट वाचल्याशिवांय react व्हायची घाई करू नये) 2012-13 चं साल असावं बहूदा,मी आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात C&C++ चे क्लासेस साठी गेलो होतो. नल स्टाॕप असलेल्या सिड इन्फोटेक मधे मी    तेव्हा क्लास लावला होता. उरलेल्या वेळांत थोडेफार पुणेही फिरून यायचो. तेव्हा पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा हातात तलवार घेऊन,घोड्यावर स्वार या भूमिकेत अहिल्यामातेची बॕनर्स दिसलीं होती. 31 मे अहिल्यामाता जयंती निमित्ताने ती लावलेली होती. रासपच्या झेंड्याच्या रंगाचे background  त्याला असायचं. त्यावर बहुजनह्रदय सम्राट महादेव जानकर हे नाव फोटो सहित छापलेलंही दिसायचं. ते बघून पहिल्यांदा महादेव जानकर या नावा बद्धल कुतूहल निर्माण झालं होतं. वालचंद सांगली येथून अभियांत्रिकीचा Diploma ते विनालग्नाचे समाजकार्य हे कुठल्याही काळातील तरूणांसाठी आकर्षणाचे पैलू जानकरांच्या व्यक्तीमत्वात आढळले होते. मेंढपाळ असल्यामुळे जानकरांसोबत  ओळख नसतांनाही, एक अपरिचीत,विना नोंदणी कार्यकर्त्याचं नातं तयार झालं होतं. एक वेगळा आदरही न

'अनहायजेनिक' गावाचं हायजेनिक प्रेम.

Image
(कथा पुर्ण वाचली पाहिजेतंच) खरंतर सुमन ला गावाकडच्या सासर ला जायचा कंटाळाच यायचा.... उन्ह्याळ्याची सुट्टी लागली की पहिली धडधड सुमनला वाटायची,ती याचीच की आता गावाकडे जायचंय....... तीची चिडचिड अजय ला स्पष्ट जाणवायची..... तरीही अजय तिच्या बोलण्याला फारसा गंभीरतेने न घेता एक दोन दिवसांकरीता का होईना....लेकरांनासोबत घेऊन गावांत जायचा. अजय सुमनचा नवरा....दोघेही एकाच कंपनीत नौकरीला होते....तिथे दोघांचं प्रेम आणि प्रेमाचं नंतर लग्नात रूपांतर झालं. अजय ग्रामिण भागातला होतकरू तरूण होता.... त्याने शिवार-वावारापासून आपला प्रवास हिंजेवाडीच्या चकचकीत इमारती पर्यंत केला होता. तर सुमन ही सावळी पण प्रसन्न रूपाची होती. तिचं  स्वतंत्र व्यक्तीमत्वाने अजय ला भुरळ घातली होती. तीच्या निर्णय क्षमतेचा तो दिवाणा होता, तर अजय च्या नम्रतेने ती दिवाणी झाली होती. तुलनेने सुमन शहरी असल्याने तिला गावगाडा फारसा कधी रमणीय वाटला नाही. अगदी तिच्याच शब्दात गावगाडा तीला प्रचंड अनहाईजेनिक  वाटायचा. म्हणून सुट्ट्या आल्या की ,सुमन ला चिंता वाटायची.ती तिच्या लेकराच्या म्हणजे राहूल च्या आरोग्याची. गावामधे