लाॕकडाऊन डायरी-1* अन्यथा..... मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे



अन्यथा.....   मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे.*

मुद्धा फक्त पालघर घटने पुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही.
ही कदाचित भयानक सुरूवात असु शकते......
काही दिवसांपुर्वीची घटना आहे....
माझ्या गावाजवळ औरंगाबाद वरून येणारा एक ट्रक य बंद पडला......
गुजरात मधील ते व्यापारी होते.
औरंगाबाद वरून पुन्हा त्यांना हिंगोली ला जायचं होतं.
रस्ता चुकुन ते आले होते.
त्या ट्रकचा ड्रायव्हर अन एक सोबती दोघंही मुस्लिम होते.

ट्रकला धक्का मारून चालू करायची गरज होती.
दोघांकडुनही तशा प्रकारे  भरलेला ट्रक चालू करणे शक्य नव्हतं....
म्हणून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तुरळक लोकांकडे ते मदत मागंत होते.
तबलिगी प्रकरणानंतर...निर्माण झालेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जवळही कोणी जायला तयार नव्हते....

कित्येकांना हात दाखवू दाखवून थकलेल्या त्या दोघांनी ...
ट्रक ला धक्का मारण्यासाठी कित्येकांना विनंतीही केली.....
नुसता धक्का मारण्यासाठी 2 हजार रूपये देण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती....

तरीही दिवस भर त्यांना कोणीही मदतीचा हात सुद्धा दिला नाही.
कोरोनाचं भय,मुस्लिमांप्रती निर्माण केलेल्या संशयाच्या वातावरणामधे माणूसकीचा ओलावा आटला होता....

ती दोघंही सकाळपासून तहान अन भुकेने व्याकुळ होऊन भयभीत झालेले  होते.
तर त्यांना बघणारे,त्यांच्या दाढी-टोपी वरून संशयीत  होते.
 

सायंकाळी या प्रकरणाची माहिती अशोकराव हटकरांना झाली...
माध्यमातून तबलिगी रंगवलेले होतेच,त्याचा प्रभाव घरात न पडेल तर नवलंच.तरीही
घरच्यांची इच्छा नसतांनाही,त्यांनी घरच्या ट्रॕक्टरच्या मदतीने ट्रक चालू केला....
त्यांना घरून गरमा गरम भरपेट जेवण आणि पोटभर पिण्याचं पाणी उपलब्ध करून दिलं........
त्या दोन्ही मुस्लिम बंधूंनी कृतज्ञतेने अशोकराव हटकरां कडे पाहिले.....
त्याक्षणी त्यांना भरून आले आणि त्यांच्या डोळ्यांनी अश्रूंना वाट मोकळी करून दिली.....
आप भगवान बनके आये हे त्यांचे जातानांचे वाक्य काळजाला चटका लावून जाणारं होतं.......

खरंतर हा प्रसंग फारसा विशेष वाटण्यासारखा नाही.....एखाद्याला खाऊ पिऊ घालणं अन  त्याचं फोटोसेशन करणं.
हे तेव्हा गरजेचंही भासलं नाही.
पण आज त्या गोष्टीची सखोलता दिसू लागलेली आहे. 
कारण पुणे-मुंबई तसेच अन्यही मोठ्या शहरातून अनेक कामगार,असंघटीत क्षेत्रातील,हातावर पोट भरणारी लोकं मिळेल 
 त्या माध्यमातून  आपल्या  मुळ गावाकडं परतत आहेत.

कुणी सायकल,तर कुणी पायी जात आहेत....
त्यांच्या सोबत त्यांची , लहान मुलंही आहेत...
ती तहानलेली,भुकेने व्याकुळ झालेली आहेत....
त्यातंच दिवसेंदिवस दिवस उन्हाची तिव्रता वाढंत जात आहे....म्हणून चेहऱ्यावरील टवटवीत पणा गायब होऊन....त्या माणसांच्या नुसतेच शरीरात क्षीण आला नाही तर....त्यांच्या जगण्याच्या आशा/आकांक्षाही निस्तेज झालेल्या दिसून येतात...

अशावेळी ती बिचारी माणसं...कुण्या गावांत पाणी पिण्यासाठी किंवा सावलीसाठी  जरी थांबली....
तरीही त्यांना संशयतेच्या नजरेने पाहिल्या जात आहे......
त्यांना थांबूही दिल्या जात नाहीये....
ही संशयाची नजर जरी कोरोना निमित्ताने असली,तरीही येत्या काळांत ती गंभीर रूप धारण करू शकते...
रस्त्यांनी,जंगलांनी येणाऱ्या ही माणसं पालघर सारख्या दुर्घटनांना बळी पडू शकतात.....
शेवटी त्यांचा वर्ग हा एॕरोप्लेन मधून आणण्यांचा नाही हे तर आपण पाहिलेच आहे.
पण निदान त्यांना सरकारने संरक्षण देण्यातही दिरंगाई करावी....हे मानवतेला धरून राहणार नाही...जरी संपूर्ण लोकांना शहरातून काढून त्यांच्या गावी पोहोच करणे,सरकारला संयुक्तिक वाटंत नसेल..तर निदान....रस्त्यावर असणाऱ्या त्या हजारो माणसांना सुरक्षित पणे घेऊन जाणाऱ्या बसेसची तरी सोय करावी......
अन्यथा....ह्या पिडीत जिवंत माणसांना,माणसातीलंच संशयी राक्षसं जिवंत मारतील.....त्यातून ही वाचली तरीही..भूक-ऊन-तहान त्यांच्यासाठी गिदाडाप्रमाणे वाट पाहंत राहतील......
माझी मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब व महाविकास आघाडीला विनंती आहे की...या लोकांना वाचवा...
अन्यथा...मरण त्यांचे पाऊलो पाऊली  वाट पाहत आहे.

(टिप:-सुदैवाने मदत केलेल्या ट्रक वाल्यांचे फोटो आमच्याकडे नाहीत)

✍🏻सौरभ हटकर
खामगांव जि बुलढाणा
9604079143 ,9325462499

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता