Posts

Showing posts from 2017

निसर्गाचा समतोल साधून करावा विकास

कुठल्याही देशाचे उत्तम रस्ते  हे विकासाचे चाके म्हणून ओळखल्या जातात. औद्योगिक मालाचे दळणवळण,पर्यटन,वेगवेगळ्या भागांची कनेक्टीविटी म्हणून रस्त्यांचे महत्व अबाधितच आहे.भारतासारख्या विकसनशील देशांमधे तर जेवढे रस्त्यांचे नेटवर्क  मजबूत तेवढा अंतर्गत विकास झपाट्याने घडवून आणता येतो.त्यामुळे रस्ते व्हायला पाहिजेतच..... पण निसर्गाचा,जैवविविधतेचा,आणि पर्यायाने पर्यावणाचा ह्रास करून होणारे रस्ते हे विकासाचे माॕडेल होऊ शकत नाही.भग्न अन सिमेंटची जंगले शाश्वत विकासात येत नाहीत.त्यामुळे वृक्षतोडीचा असाच प्रयत्न खामगांव-शेगांव रस्ता चौपदरीकरणात होणार तर नाही ना?  अशी शंका मनात निर्माण झाल्यामुळे हा लेख प्रपंच... काही वर्षापुर्वी खामगांव-जालना महामार्ग चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल केल्या गेली. नाममात्र भावात झाडांचा लिलाव करून,दशकांची नैसर्गिक संसाधाने असलेली अमुल्य झाडे खिरापतीत वाटल्या सारखी विकून तोडली. भरपाई म्हणून कुठल्याही प्रकारची झाडं कुठेच  लावल्या गेली नाही. आणि निर्दयतेचा कळस म्हणावा की काय???त्याच जून्या रस्त्याच्या आजूबाजूला मोठंं खोदकाम करून,ते तसंच पेंडींग ठेवल्या गेलं.त

---जनरल डबा~1---

         दि.15/10/2017 दुपारी 12 ला पेपर संपवून नवी मुंबई पासून कल्याणचा 'लोकल' प्रवास करण्यात 'ग्लोबल' मजा आली. तो प्रवास कदाचित संस्मरणीय ठरण्यासाठीच आसावा.कारण........© दुपारचा एक वाजला होता,घामाने तरर होतो. प्रवासा बद्धलचा विचार करून क्षीण मनाने कल्याण पासून जळगाव  साठी पवन ट्रेन च्या जनरल डब्यात घुसलो. खरंतर तो नुसताच जनरल डबा नसतोच , तो असतो खरा जनरल भारत. दुःखी,सुखी,कष्टी,पाकीटात तिकीटा ऐवढेच पैसे असणारे पण डोळ्यात जग जिंकण्याचा ध्यास ठेऊन मिळालेल्या जागेत(संधीत)Adjust होणारे,तर काही भनसेवादी(बाहेरसे आते है साले,यहाँ गंदगी फैलाते,सिट तुमारे बाप की है?,हमे सिट मिलनी चाहे वगैरे) व ई. दरवाजाच्या मुखाच्या अर्धे आत अर्धे बाहेर असलेला हा वर्ग दुःखी असतो,आपल्याला  संडास जवळ किंवा संडास मधेतरी प्रवास संपेपर्यंत उदरनिर्वाहा पुरती जागा मिळावी.ऐवढी माफक अपेक्षा त्या वर्गाची असतात. अन नाही मिळाली तरी , आपल्या नशिबात दरवाजाच आहे असं म्हणून सहनारे. दुसरा वर्ग दरवाज्याच्या आत सुरक्षित पण ताटकळत उभे असलेला कष्टी असतो. सकाळी सकाळी तोंडावर येणारी 'अर्जंट' प्रतिक्

स्वतःच्या जातीबद्धल पहिल्यांदाच post करतोय....

स्वतःच्या जातीबद्धल पहिल्यांदाच post करतोय.... (जत प्रकरणाबद्धल) खरंतर जातीचा माज असणे वगैरे,किंवा ईतिहासात उत्तुंग कार्य केलेल्या एखाद्या महापुरूषाच्या जातीत योगायोगाने जन्म होऊन, स्वतःचं कार्य शुन्य असतांना त्या महामानवाच्या उत्तुंग कार्याच्या नावावर स्वतः वृथा शौर्याच्या उड्या मारणं. हे काही मणाला पटत नाही, कधी पटलंही नव्हतं..... त्यामुळे कट्टर जातीवादात कधीच रमलो नाही..... पण जत मधील धनगरांचा उद्धार करणार्या महिलेचा video पाहिला..... अन मग संताप आला.....संताप याबद्धल नाही की प्रश्न माझ्या जातीचा आहे,तर याबद्दल की तो प्रश्न तथाकथित उच्चवर्णिय मानसिकतेचा आहे...... जिथे धनगरांना येड ठरविल्या जातं..... किंवा वर्णव्यवस्थेने निम्न स्थान दिलेल्या त्या प्रत्येक समुहास 'निच' ठरवण्यासाठी निर्माण केलेली प्रतिकं जाणिवपुर्वक वापरून उच्च निचता जोपासल्या जाते.... खरंतर ती महिला सामान्य आहे ,त्यांच्या बद्धल काही आकस पण नाही.... पण जी लोकं जातीव्यवस्थेचा कणा मोडण्याचा आव आणुन, तथाकथित पुरोगामित्वाचा ताव मारतात. स्वतःला वैचारीक प्रगल्भ म्हणवून घेतात, ती माणसं सुद्धा खाजगीत अशाच बाता म

आपण ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी.....?

आपण  ठरवून घेत असतो ना जगण्याच्या चौकटी ....?   आज  जरा करमत नव्हतं....म्हणजे हा न करमण्याचा प्रोग्राम बरेच दिवस झालाय ,असाच चालू आहे..... त्यामुळे ना कुणाशी बोलावसं वाटत  न कुणी जवळच वाटत .....काही लिहावसं वाटत नाही....कुठं फिरावसं वाटत नाही.....(बाकी ते प्रेम,प्रेयसी हे विषय त आपल्या आयुष्याचा भागच नाहीत)..... सतत एकटेपणाची जाणिव मनाला खचवत असते...... अशा  वेळी आजूबाजूच्या वातावरणाचा आणि चालू घडामोडीचा श्येड्यूल सुद्धा ठीक पचवल्या जात नाही .....पण मग थोडं चिंतन केलं ,की मनातले कच्चे पक्के दुवे कळायला लागतात.........आणि समजायला लागतं...की अरे आपल्या एकटेपणाची जाणिव आपणच ठरवून निर्माण केलेली असते......आपण ठरवून टाकलेली असते चौकट....की हे असेच होनार किंवा मी हे करूच शकणार नाही... नव्हे आपण ठरवलेली असते एखादी व्यक्ती,गोष्ट,वस्तु.आपल्या अनमोल जिवनाचा अविभाज्य भाग म्हणून...... किंवा ठरलेल्या असतात आपल्या बसायच्या,झोपायच्या जागा ,class/office चे तेच रस्ते तेच routine.... ईतकेच नव्हे तर ठरवलेल्या असतात आपण आपल्या स्वतःच्या सवयी,विचार,पद्धतींच्या चौकटी,ice cream flavour पासून तर भ