Posts

Showing posts from December, 2016

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण . जगभरामध्ये अशी परंपराच आहे की,एखादी विशिष्ट व्यक्ती,दिवस   किंवा स्थळ जेथे/ज्यामुळे काही ऐतिहासिक काही घडले तर त्या व्यक्ती,दिवस किंवा स्थळाच्या स्मरणार्थ भविष्य व वर्तमान  काळातही तशाच प्रकारचे  उदात्त कार्य व्हावे. या प्रेरक हेतूने साजरे करतात. अशा विविध क्षेत्रातील  व्यक्तीमत्वां पैकी एक व्यक्तीमत्व भारतरत्न सर  मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.vishweshwarya ). यांच्या स्मरणार्थ 15  sept हा त्यांचा जन्मदिवस  अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो. विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते होते,त्यांची विशेष ओळख ही त्यांच्या संशोधनात्मक dam construction&water irrigation च्या निर्माण केलेल्या प्रणाली बद्धल आहे. त्यांच्या संशोधनामुळे  मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचले  आणि त्याचा   परीणाम सभोवातालच्या परीसरातील लोकांची तहान भागविने आणि उत्तम  शेतीवर  झाला. ब्रिटिश कालीन भारतात जन्मलेल्या  या जिज्ञासू व्यक्तीने आपल्या संशोधनाच्या बळावर ईतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले. म्हणून या संशोधन,जिज्ञासू आणि आभ