प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

जगभरामध्ये अशी परंपराच आहे की,एखादी विशिष्ट व्यक्ती,दिवस   किंवा स्थळ जेथे/ज्यामुळे काही ऐतिहासिक काही घडले तर त्या व्यक्ती,दिवस किंवा स्थळाच्या स्मरणार्थ भविष्य व वर्तमान  काळातही तशाच प्रकारचे  उदात्त कार्य व्हावे. या प्रेरक हेतूने साजरे करतात.
अशा विविध क्षेत्रातील  व्यक्तीमत्वां पैकी एक व्यक्तीमत्व भारतरत्न सर  मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.vishweshwarya).
यांच्या स्मरणार्थ 15  sept हा त्यांचा जन्मदिवस  अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो.

विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते होते,त्यांची विशेष ओळख ही त्यांच्या संशोधनात्मक dam construction&water irrigation च्या निर्माण केलेल्या प्रणाली बद्धल आहे.
त्यांच्या संशोधनामुळे  मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचले  आणि त्याचा   परीणाम सभोवातालच्या परीसरातील लोकांची तहान भागविने आणि उत्तम  शेतीवर  झाला.
ब्रिटिश कालीन भारतात जन्मलेल्या  या जिज्ञासू व्यक्तीने आपल्या संशोधनाच्या बळावर ईतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले.
म्हणून या संशोधन,जिज्ञासू आणि आभ्यासू अभियंत्याच्या कार्याच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिन  आभियंता दिन  म्हणून साजरा  केला जातो.

पण याच अभियंता दिनी भारतातील अभियांत्रिकी क्षेत्राला आलेली उदासिनता, अकुशल, बेरोजगार अभियंत्यांचे लोंढे .
व त्यातून निर्माण झालेली अनास्था
एकंदरीतच हे चित्र अभियंता दिनी
अभियंते दीन झालेत का?हा प्रश्न  विचार करण्यास भाग पाडतो.

जे आपण शिकलो ते कृतीत ऊतरावयाला भाग पाडत त्याला ज्ञान म्हणता येईल.म्हणजेच theory शिकून जे practical करायला उद्युक्त करतं ते ज्ञान.
अशी कुशलता ज्यांच्या अंगी येते त्या विद्यार्थ्यांनाच खरे ज्ञानार्थी म्हणता येईल.

पण ती कुशालता निर्माण करण्यासाठी सुयोग्य आणि विद्वत्तेचा व्यासंग असण्यार्या विद्वानांची गरज असते त्याशिवाय ज्ञानार्थी घडविनेही शक्य नसतं.

त्याचबरोबर त्या विद्वानांच्या विद्वात्तेचा सन्मान करणारे प्रशस्त,आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानानी सुसज्ज अशा महाविद्यालयांची गरज असते.
तेव्हा कुठे ती एक आदर्श व्यवस्था बनून उत्तम दर्जाचे अभियंते जन्माला घालते.
इतकेच नसून
तत्सम व्यवस्थेचा दर्जा राखण्याबाबत कठोर नियंत्रण ठेवणार प्रशासन आणि  त्या ज्ञानार्थ्यांच्या सन्मानतेचा रोजगार ऊपलब्ध करुन देणारे तत्पर शासन.
असा
एकंदरीतच जैवसाखळीप्रमाणेचा हा क्रम ज्ञान साखळीबाबत राखने शाश्वत विकासासाठी गरजेचा असतो.
पण दुर्दैवाने वरील व्यवस्था  अभियांत्रिकी क्षेत्राबद्धल स्वप्नवतच असून, आभियांत्रिकीची संपूर्ण रचनाच खिळीखिळी झालेली दिसून येते.

खालील दोन प्रसंग लक्षात घेतले पाहिजेत.
दरवर्षी feb मध्ये प्रसिद्ध होनार्या  Indian employitability commission 2015-16च्या अहवालाने  भारतात80% बेरोजगार अभियंते असल्याचा(व त्यांच्या रोजगारासाठी मागील 5 वर्षात सरकार कडून कुठल्याच महत्वाच्या  सुधारणा केल्या गेल्या नसल्याचा )अहवाल जारी केला.
तसेच मध्यंतरी infosys चे नारायण मूर्ती म्हणाले "अभियांत्रिकी महाविद्यालयातून दर्जाहीन अभियंते बाहेर पडत आहेत[iit सुद्धा)"असल्याचे वक्तव्य केले होते.

वरील दोन्ही गोष्टींचा सामाईक पने विचार केल्यास  ज्ञान साखळीचे महत्व लक्षात येते.
80% टक्के अभियंत्यांना रोजगार नाही आणि त्यातील बरेचसे रोजगाराच्या क्षमतेचे सुद्धा नाहीत.
ही बाब भरमसाठ वाढलेल्या सुमार दर्जाच्या काॕलेजेस मुळे झाली आहे.

महाविद्यालयांची वाढलेली संख्या ही चिंतेची बाब नव्हेच,पण ती गुणवत्ता,ज्ञानवत्ता ऐवजी जर  धनवत्ता च संपादन करण्यात गुंतलेली असेल तर ते दुर्दैव असते आणि दुर्दैवाने ते वास्तव सुद्धा आहे.
तासिका तत्वावर शिकविनारे शिक्षक ,भाडोत्री ईमारत,अर्धवट यंत्र-तंत्र सामग्री(किंवा inspection च्या वेळी भाड्याने   पण आणतात).scholarship साठीची bogus admissions (online मुळे या प्रकाराला आळा बसेल).ई व तत्सम बाबी ह्या दर्जा खालावण्यास कारणीभूत ठरतात. कागदांवर सगळे नियम  अगदी तंतोतंत पाळलेले असतात, पण मग ते बहुतांश वेळी कागदावरच राहतात.
त्याचे पर्यावसन दर्जा खालावण्यात होतो.
बहुतांशी शिक्षण सम्राट हे राजकीय च असल्यामुळे inspection करतांना किंवा त्रुटी आढळल्यावर ही महाविद्यालयांवर कारवाई किती 'निरपेक्ष' होत असेल.
याचा विचार होने ही गरजेचा आहे.
बर्याच अभि.महा. मधे तासिकेवर शिकविनारे शिक्षक शिकवित असतात.
त्यातील बहुतेक जण हे passout बेरोजगार seniors च असतात,त्यांना ही जाॕब ची गरज  असते आणि काॕलेजला कमी पैशात शिकविणार्यांची. या दोन्ही अतृप्त जिवांच एकमेकांच्या गरजेपोटी मिलन होतं. आणि
अशावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले व्यासंगी व अनुभवी मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे   'रट्टा मार पाटार्थी' फळाला येतात.
पर्यायाने त्यांच्यातील चिकित्सक  वृत्तीच मारल्या जाते.
आणि मग विद्यार्थी practical ऐवजी theory वरच जास्त लक्ष द्यायला लागतात.

शिक्षणाच्या बाजारीकरणात टिकण्यासाठी नविन प्रवेश घेणार्यां नव विद्यार्थ्यांना  महा.कडे आकर्षित करता यावे.
या जाहिराती हव्यासापोटी practicals चे मार्क्स भरगच्च देऊन निकालांचे आकडे फुगविल्या जातात.
पण दुर्दैव बघा ना ज्या practicals मध्ये भरगच्च गुण मिळविणारे विद्यार्थी प्रत्यक्ष जिवनात त्याच practical implementation  करतांना सपशेल अपयशी ठरत आहेत. हे नेमके का होते?ह्याचा विचार होणे गरजेचा आहे.
प्रचलित असलेले practical च्या पद्धती तर सपशेल कामाच्याच नाहीत.कारण  practicals n assignments ह्या दरवर्षी सारख्याच व त्याच  त्या असतात. त्यामूळे
मुलं फक्त ती copy paste करून कागद काळे करायचे सौजन्य दाखवितात.
आणि ती पन एका रात्रीत(तेवढे कागद जरी वाचविले तरी कितीतरी वृक्ष वाचतील).
जेव्हा practical performance  ची वेळ येते,तेव्हा मात्र अक्षरशः रट्टा मारून आणलेले programes perform केले जातात.
त्याला logic लावण्याची काही गोष्टच नसते.कारण तेवढी क्षमताही विद्यार्थ्यां मध्ये निर्माण केलेली नसते.

अशा या वातावरणात विद्यार्थी मात्र 'अपने धुन मेच' असतात.
engineering च्या विद्यार्थ्यांमध्ये एक भारीवाला rancho attitude भरलेला असतो. सेमेष्टर भर enjoy आणि परीक्षेचा पंधरवाडाच फक्त अभ्यासासाठी राखीव ठेवायचा,सेमेष्टर भर अभ्यास करनारा अभियंताच नसतो वगैरे वगैरे गोष्टींचा ....
कुणी कुणी तर nyt ridersच असतात. एका रात्रीत top मारणारे .त्यांच अभिनंदन च पण मग एका रात्रीत एका विषयाचा अभ्यास होऊ शकतो का? तर त्याच ऊत्तर होयंच असेल कारण result तर distinction असतो ना.
पण पुन्हा प्रश्न तोच ऊभा राहतो की आपण ज्ञानार्थी आहोत की पाठार्थी? याच उत्तर प्रत्येक विदूयार्थ्याने स्वताःला विचारायला हवे.
मला विश्वास आहे की याचं उत्तर नकारार्थिच येईल.

मला असं वाटतं की वरील सर्व गोष्टींचा परीणाम अकुशलता व बेरोजगारी मध्ये झाले आहे.
engineering करतांनाचा rancho वाला attitude engineering झाल्यावर मात्र चकनाचूर होतो.आणि  मग त्याचे पर्यावसन अगदी clerk च्या जागेपासून तर "कुठलाही job मिळायला पाहिजेत यार".
या हताश व हरलेल्या भावनांन मध्ये होते. तर
काही m.b.a करून marketingकरणे,B.P.O मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेत स्वताःला घुसडवुन धडपडतात.त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वताःच्या पेशाला साजेसा व्यवसाय ही काढता येत नाही, कारण तेवढी क्षमताच त्यांच्यात निर्माण झालेली नसते.
एकंदरीतच संशोधक वृत्तीची ओळख असलेला अभियंता हताश होऊन सन्मानाच्या 'ऊदरनिर्वाहासाठी दीन'झालेला  दिसून येतो.

कुठल्याही देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात त्याच्या संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रावरच आधारलेला असतो.अमेरिका,चिन,युरोपियन देश यांनी कायमच या क्षेत्राला प्रोत्साहन दिलेले आहे.  म्हणून दिवसागणिक ते अधिक मजबूत सुद्धा बनत आहेत.
भारतातील cream talent सिलिकाॕन व्हॕली चमकावित आहेत.
पण भारत मात्र यामध्ये मागे असल्याची जाणिव होते.
त्याची नेमकी कारणे काय....?ह्याचा विचार विचारवंतांवर सोडू .
पण ह्या सगळ्या परीस्थितीला शैक्षणिक धोरणंच कारणीभूत असावीत असा प्राथमिक अंदाज आहे.
UNESCO ने भारतीय शिक्षण पद्धती 50-60वर्ष मागासलेली असल्याचा ठपका ठेवला आहे.
तर मागील 5-6 दशकांत कुठलेच नविन संशोधन अथवा earth shaking idea सुद्धा भारतीयांना देता आल्या नसल्याची खंत नारायण मुर्तींनी व्यक्त केली होती.
एकेकाळी नालंदा,तक्षशिला यांसारख्या जागतिक दर्जाच्या भारतीय शैक्षणिक संस्थेंनी जगाला उच्च दर्जाचे शिक्षण दिले.
पण त्याच भारतात उच्च शिक्षणाला आलेली अवदसा ही एक शोकांतिकेची बाब आहे.
सरकारने शिक्षण व्यवस्थे मधे परीवर्तन आणून आधुनिक अभ्यासक्रम,तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करावा.कारण विश्वेश्वरय्यांच्या संशोधनामुळे शेतजमिनीची उपयुक्तता वाढून उत्पादन वाढविण्यात झाले असावे.
आणि त्यातून आपोआपच अर्थव्यवस्था मजबूत झाली असावी म्हणून तर ब्रिटिशांनी त्यांचा सन्मान केला असावा ,असा माझा अंदाज आहे.
म्हणून आजच्या या विश्वेश्वरैयांच्या अनुययांची दखल सरकारने घ्यावी, त्यांना सन्मानार्थ रोजगार मिळावा. क्षमता वाढविनारी व्यवस्था निर्माण करावी.
त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला गती येईल आणि देशा महासत्ते कडे जाईल.
तीच खरी विश्वेश्वरैय्यांना आदरांजली ठरेल.

ाकी.....!अभियंता दिनाच्या दीनवाणी शुभेच्छा द्यायला जीव धजावत नाही.
धन्यवाद......!!

  :-सौरभ हटकर
    खामगाव9604079143
(लेखक कोणी विचारवंत वगैरे नसून,अभियांत्रिकी व्यवस्थेचाच भाग असलेला विद्यार्थी  आहे.फक्त अनुभवलेलं शब्दात मांडण्याचे धाडस केले.)

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता