Posts

Showing posts from September, 2021

पेरकुंड

 पेरकुंड(चिपाड) ✍🏻 सौरभ हटकर  09 जून ला मी 27 वर्षाचा झालो... मग सहज आई जवळ बसून मी  माझ्या जन्माची कथा तिला विचारली.  तीने जे माझ्या जन्मा वेळी झालेलं सांगितले.... ते डोळ्यात पाणी आणि डोक्यात मुंग्या आणणारे आहे... ते फक्त माझ्या जन्माची किंवा आईची कथा असती . तर फरक पडला नसता..ती तमाम मेंढपाळ व विशेषतः मेंढपाळ स्त्री ला भोगाव्या लागणाऱ्या अनेक वनवासा पैकी  एका वनवासाची आहे....... आई म्हटली "तु पोटात व्हता तव्हा म्या गावातंच हुती.....  वाड्यावं(बिऱ्हाड किंवा तांडा) तव्हा बिजा अन दादा असायची(काकू अन काका).... कधी मी जायची" मी म्हटलं मंग माझा जन्म कोणत्या दवाखान्यात झाला.......? आई म्हणाली "तुमा सगळ्याचाच जल्म असाच घरी किंवा वाड्यावं झाला,दवाखानं-बिवाखानं अन तिथं बाळांतंणं आपल्या बायाना नव्हती माहित. अन म्हणून तुया जल्मही बाबाच्या(आजोबाच्या)खोलीत झाला."  मी कुठं तरी वाचलं होतं.....  बाळंतण होतांना शरीरातील 28-29 हाडं मोडतील एवढा त्रास होतो.  मी लगेंच आईला विचारलं "पेन किलर खायची का"?  तिला पेन किलर काय आहे.  हे आजही माहिती नाही.  "तसांच दम धरत जल्म द्या