Posts

Showing posts from May, 2020

गृहितके मोडली पाहिजेत*

(लेख जूना आहे,पण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा  लागू पडतो. नुसता वाचू नका,समजून घ्या....) ✍🏻सौरभ हटकर. एखादा  समूह संघटित नसतो ,त्याला त्याच्या प्रश्नाची जाणिव नसते.  त्याच्या वर होणाऱ्या अत्यंत अत्याचाराला तो नियतीचाच भाग समजायला लागतो. आपले हक्क ,न्याय या बाबत तो समूह पूर्णपणे अवगत नसतोच. अशावेळी त्या समाजावर व्यवस्था अन्याय करायला लागते. या  संपूर्ण अन्यायाला   त्या   समुहाचे  शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक,आर्थिक मागासलेपणंच जबाबदार असते.  अशावेळी प्रवाहाबाहेरील  त्या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य  वेलफेयर म्हणवून घेणाऱ्या राज्य संस्थेस करावयाचे असते. परंतू,तसं करने खडतर व जोखिमीचे ठरते. कारण उपेक्षित समुहाचे सक्षमीकरण केल्यास,उद्या तो  समाज आपला वाटा मागण्यासाठी उभा राहिला तर त्या समाजाला आतापर्यंत  गृहीत धरून व्यवस्था आपल्या मांडीखाली  सतत ठेवन्याची सवय झालेल्या  प्रस्थापित  वर्गाला त्याचा धक्का  बसू शकतो.  म्हणून प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध उपेक्षित समुहात असंतोष निर्माण होऊ नये व त्या असंतोषातुन उपेक्षित समुहाला आपला न्याय वाटा हक्काची जाणीव होऊ नये .   या करीता ,प्