गृहितके मोडली पाहिजेत*



(लेख जूना आहे,पण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा  लागू पडतो. नुसता वाचू नका,समजून घ्या....)

✍🏻सौरभ हटकर.

एखादा  समूह संघटित नसतो ,त्याला त्याच्या प्रश्नाची जाणिव नसते. 

त्याच्या वर होणाऱ्या अत्यंत अत्याचाराला तो नियतीचाच भाग समजायला लागतो.

आपले हक्क ,न्याय या बाबत तो समूह पूर्णपणे अवगत नसतोच.

अशावेळी त्या समाजावर व्यवस्था अन्याय करायला लागते.

या  संपूर्ण अन्यायाला   त्या   समुहाचे  शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक,आर्थिक मागासलेपणंच जबाबदार असते. 

अशावेळी प्रवाहाबाहेरील  त्या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य  वेलफेयर म्हणवून घेणाऱ्या राज्य संस्थेस करावयाचे असते.

परंतू,तसं करने खडतर व जोखिमीचे ठरते.
कारण उपेक्षित समुहाचे सक्षमीकरण केल्यास,उद्या तो  समाज आपला वाटा मागण्यासाठी उभा राहिला तर त्या समाजाला आतापर्यंत  गृहीत धरून व्यवस्था आपल्या मांडीखाली  सतत ठेवन्याची सवय झालेल्या  प्रस्थापित  वर्गाला त्याचा धक्का  बसू शकतो. 

म्हणून प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध उपेक्षित समुहात असंतोष निर्माण होऊ नये व त्या असंतोषातुन उपेक्षित समुहाला आपला न्याय वाटा हक्काची जाणीव होऊ नये .
  या करीता ,प्रस्थापित व्यवस्था नेहमीच   त्या उपेक्षित समुहातील १-२  जणांना आपल्या सोबत ठेवते.
त्यांना  सक्षम न होऊ देता. त्यांचा उपयोग उपेक्षित समुहातील असंतोषाला बाहेर काढण्यासाठी safety volve म्हणून करीत  असते.

त्या safety volve मधेही 'आपल्या शब्दाबाहेर न जाणारा 'निष्ठावानच 'ठेवल्या जातो. 

निष्ठवानाला सुद्धा कष्ट न करता आयते मिळवायची सवय झालेली असते ,त्यामुळे त्याची सुद्धा मेहनत  करायची तयारी नसते. 
वरुन  उपेक्षितांचा नेते असा मनमरातब ही कुठलेही कष्ट न करता  सहजच मिळत असल्या मुळे,तो त्या उपेक्षीत समुहाला सक्षम करण्याऐवजी स्वताचे सक्षमीकरण घडवून आणत असतो ..

दुसरीकडे .....
उपेक्षित समुहाला या गोष्टीची जाणीव नसल्या कारणाने ,तो समूह गप गुमाने मेळावे -आन्दोलनामधे सहभागी होत राहतो. 

साहेबांसोबत एक फोटो मिळाला म्हणजे खुप मिळवली या आनंदातच तो आपले सर्वस्व मानतो.  

या गोष्टीचा एकाच वेळी दुहेरी फायदा व नुकसान होतो .. 

फायदा..... त्या निष्ठवानाचा व् त्याला पोसणाऱ्या प्रस्थापित व्यवस्थेचा  होतो.
तर नुकसान त्या गृहीत धरलेल्या समुहाच्या वर्तमानाचे व भविष्याचे होत असते.

अशी परीस्थिती उपेक्षित असणाऱ्या मेंढपाळ या समुहाची झालेली आहे 

त्यामुळे व्यवस्थेने तर त्यांना गृहीत धरलेलेच आहे पण धनगर समाजातील नेत्यांनीही त्यांना तशाच प्रकारे  गृहीत धरले आहे.

'आपल्या शिवाय यांना कोण ?  आपण जेव्हा बोलावू तेव्हा हे येतातच........ 
लक्ष वेधण्यासाठी मेंढर रस्त्यावर आणायला काय वेळ लागतो ' ही अनेक गृहीतापैकीची काही गृहीतके आहेत .

आता ही व अश्या प्रकारची गृहीतके तोडण्याची वेळ आणि गरज निर्माण झालेली आहे .. 

ती   गरज नुसतीच व्यवस्थेला व समाजातील संधिसाधू नेत्यांना धडा शिकविण्यासाठी नसून ,समाजाचा शाश्वत विकास करण्यासाठी  आहे.

समाजाचे खरे उदर्निर्वाहाचे ,सुरक्षिततेचे आणि सामाजिक ,राजकीय-शैक्षणिक मागासलेपन दूर करुन प्रागतिक समाज निर्मितीसाठीचे मार्ग निर्माण करण्यासाठी    आहे .

*इतर काळात शांत-सुखमय-अलिप्त जीवन जगणाऱ्या,पण  निवडणुका,महामंडळांच्या नियुक्त्या  किंवा सत्तेत वाटा मिळविण्याची वेळ  आली की, आम्हीच कसे भटके विमुक्तांचे नेते आहोत ,आमच्यावर अन्याय झाला, वगैरे गळा काढून ...... मेळावा घेवून.. आपल्या साहेबांना ....मैनेज केलेल्या माध्यमातून आपले संख्याबळ दाखवून...किंवा आपल्या भक्तांकडून काहीतरी स्टंट करवून...*
*काहीतरी पदरात पाडल्यावर ५ वर्ष पुन्हा सुखमय जीवन जगणाऱ्या, संधिसाधू नेतॄत्वाला कायमचे घरी बसवून.*

 जो नेता "काम करेल -सुख दुःखात मदतीला येईल,  गंभीर प्रसंगी खंबीर भूमिका घेईल अश्या नेतृत्वा मागे पक्ष आणि विचारधारा न पाहता समाजाने उभे राहायला हवे .. 

किंवा ground लेवल वर कार्य करणाऱ्या सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा  साथ देऊन मोठ केले पाहिजेत  .. 

शेवटी लोकशाहीतील राजा  म्हणविले  जाणारे नेतृत्व  ... प्रश्नाची जाणीव असणारे  व  ते सोडविण्याची कणव असलेलेच  पाहिजे.
 न की मेहनत न करता संधी साधण्यास सोकावलेले .

 म्हणून अश्या खऱ्या नेतॄत्वाला मोठ करण्यासाठी  ही "आयातेपणाची" गृहितके समाजाने मोडलीच पाहिजे. 

तरच समाज प्रगत होईल.
      अन्यथा 
 सालाबादाप्रमाणे     "अस्स कस्स देत नाही " ठरलेलेच आहे   ....

(ही post फक्त धनगर समुहालाच लागू होते असे नव्हे ,तर दलित ,आदिवासी,शेतकरी व इतर सर्वच समुहांना ही लागू पड़ते )

सौरभ हटकर 
खामगांव  जि. बुलढाणा 
9604079143 ,9325462499 

(visit  saurabhhatkar.blogspot.com )

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता