Posts

Showing posts from August, 2015
Image
~~~~~~खामोशिया~~~~ मणात जबरीने कोंडलेल्या भावनांना,  शब्दाच रूप देता आलं नाही कि मणात बैचेनी व आयुष्यात 'खामोशिया' आपोआपच येतात.... :-सौरभ हटकर
Image
~~~~जग बदल घालुनी घाव~~~~~ लोकशाहिर खरे शाहिर...... साहित्य तेच जे समाजातील पिचलेल्या व शोषित लोकांच्या जखमांना मांडण्याच कार्य करते.... घराच्या चौकटीत बसुन नव्हे तर समाजाच्या प्रस्थापित रूढी ,परंपरांची चौकट तोडुन गुलामिवर प्रहार करण्याची धमक देत. परीवर्तनाची ताकद देतं , समानतावाद निर्माण करून ,प्रत्येकाचे हक्क मिळविण्यासाठी प्रेरीत करतं असं ठणकावुन सांगुन 'यह आझादी झुठी है,देश कि जनता अभी भुकी है। असे म्हणुन शेठजींच्या तथाकथित सत्ता हस्तांतरणाच्या स्वातंत्र्यावर वार करनारे.............. गावा च्या कुसापासुन रशियाच्या वेशी पर्यंत आपली कला ,शिवरायांचा ईतिहास पोहोचविनारे--- महाराष्ट्र कुणाच्या बापाची जहागिरी नसुन ती शाहिरांच्या शाहिरींची,शुद्रांच्या कष्टाची,शेतकर्यांच्या वखराची व मावळ्यांच्या तलवारीची माती आहे.अस ऊस्फुर्त पणे मांडनारे, 'पृथ्वी हि शेषनागाच्या मस्तकावर नसुन कष्टकरी लोकांच्या तळहातावर आधारलेली आहे'विज्ञानवाद मांडनारे खरे साहित्यिक, ऊपेक्षित साहित्यिक ईतकेच नव्हे तर मराठी दिनाचे जनक लोकशाहिर वंदनिय अण्णाभाऊ साठे जयंती निमित्त त्रिवार अभिवादन..