Posts

Showing posts from 2018

विकास महात्मे साहेब समाजाविरूद्ध अविकसित राजकारण करू नका..* *सामाज भोळा आहे ...येडा नाही...* निर्यातबंदी पुर्वनियोजितच होती....

* ⭕मेंढपाळपुत्र आर्मी⭕ काही दिवसां पुर्वी  नाशिक ते मुंबई शेतकर्यांच्या विविध मागणींसाठी शेतकर्यांनी शिस्तीत अन शांततेत लाँग मार्च काढला, पुणे ते मुंबई स्पर्धा परीक्षेतील विविध घोटाळ्यांविरूद्ध आणि जागाभरतीबाबत विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढला,पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे शेकडो मुले मेलीत तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात लढत होत्या,ए.स टी कर्मचार्यांचा बंद असोकी धनगर-मराठा आरक्षण लढा असेल  असे अनेक उदाहरणे देता येतील की जेथे लाखो लोकं आपल्या मागण्यांसाठी लढत होती. पण सरकार कधी शेतकर्यांत माऔवादी तर कधी विद्यार्थांत डावे शोधत होते..एकंदरीत सरकार आम्ही किती पक्के आहोत अन तुमच्या मागण्यांसमोर न झुकणारे आहोत अशीच भूमिका ठासून घेतांना दाखवित होते. हे सर्व सांगायचे कारण की डाॕ रीचा जैन नामक अल्पज्ञानी व्यक्तीने मुठभर लोकांसोबत नागपुरात 'बोकड निर्याती'विरूद्ध आंदोलन काय केले? सरकार ने कित्येक मंत्र्याच्या उपस्थित होणारा आणि विशेषतः सोशिअल मेडियावरा विशेष झगमगाटी प्रसिद्धी करून स्वतःचे तथाकथित महात्म्य धनगर समाजावर थोपविणारे डाॕ विकास महात्मे यांनी तो

धनगर आरक्षण लढा:-एक चिंतन🎯🎯🎯🎯🎯🎯🎯🎯

महात्मा गांधीजी हे मुरलेले राजधुरंधर व्यक्तीमत्व होते.ते प्रत्येक लढा उभारायच्या वेळेस हा लढा अंतिम असून,स्वराज्य मिळविल्याशिवाय शांत बसायचे नाही असे सांगून लढा उभारायचे,,,,लढ्याला व्यापक जनस्वरूपही असायचे...पण गांधीजी काही सवलती मिळवून अचानक लढा मागे घेत असत....कारण त्यांना जनआंदोलने दिर्घ काळ टिकू शकत नाहीत ह्याची जाणिव असायची.....आंदोलन शांत झाल्यावर ते दुसरे आंदोलन सुरू करायच्या मधल्या काळात कृतीशील कार्यक्रम हाती घ्यायचे.जेणेकरून समाज संघटन सदृढ आणि लोकशाही स्विकारण्यास प्रवृत्त होईल. पुन्हा आंदोलन पुन्हा तोच जनसैलाब पुन्हा तह पुन्हा कृतीशील कार्यक्रम ....असा गांधीबाबाचा स्वातंत्र्य लढ्यातील प्रवास ठरलेला होता.यालाच struggle-truce-struggle असंही म्हटल्या गेलं.... सांगायचा मुद्धा हा की....अनेक वर्षांपासून विशेषतः 2013-14 पासून धनगर आरक्षण लढा जोरात चालू आहे.पण मुळतः तो दोनच पातळीवर झालेला दिसून येतो.आंदोलन आणि आश्वासन. या पलिकडे या लढ्यातून काही साध्य झालं असं मला तरी वाटत नाही(ते मंत्रीपद अन पहिली  खासदारकी ही स्वतः साठीची राजकीय सोय होती). मुद्धा असा की हे असंच किती दिवस चालण

स्वच्छ सर्वेक्षण ..2018

स्वप्न जुळलेली होती स्वच्छ अन सुंदर भविष्याची... त्या स्वप्नांचं क्षणात विघटन झालं.... काय वाटत असेल त्यांना.....?? केला साफ कचरा ज्यांनी.... अन त्यांनाच कचर्यासारखं झाडून बाजूला केलं... काय वाटत असंल त्यांना....?? शेकडो GVP transform केले ज्यांनी.... आता त्या सर्वांचाच 'सुशिक्षित'GVP होणार .... काय वाटत असंल त्यांना....?? या देशात कचर्याचं देखील सर्वेक्षण होतं... प्रक्रियेसाठी...पुनर्वापरासाठी... चांगलीच गोष्ट आहे..... पण बेरोजागरांच कधी होणार... या  देशाच्या भवितव्यासाठी..?? असा विचार येत असेल ज्यांना.. काय वाटत असेल त्यांना... असेच जर DUMP जाहलो तर सडू.... जात,धर्म,प्रांत ,झेंडे,दांडे यात अडकून पडू..... जमलं तर करा .... विचार वरील बाबींचा.... देशासाठी आम्ही योगदान देऊन घडू... असा विचार आला ज्यांना कसं वाटत असंल त्यांना.. असेल विचार काहींचा बंडाचाही या विरोधात.... पण ध्यानात ठेवा  यारहो... काहीच वाटणार नाही त्यांना......

बा'च सर्वेक्षण

' बागायत वाटली तरी जिंदगी पडित आहे..... रूबाबात फिरती नेते बाप अडगळीत आहे.... काय मागणं मागू तूला सांग सांता...? भकास 'बा' ची दुरडी, अन सजलेली तिरडी आहे...... जात नसतो मी दर्शनाला, कुठल्याच देवस्थानाला..... बाप माझा साई,अन वावर शिर्डी आहे... भागविण्यास भूक जगाची बाप झुरतो मग मरतो.... ढेकर देताच 'इंडीयाने',मग कळतं बाप पुरूनही उरतो...... त्याच्या वाट्याचा हा अवमान टळाला पाहिजे... त्याचेही व्हावे एखादे  सर्वेक्षण, अन त्यालाही सन्मान मिळाला पाहिजेत... ✍🏻सौरभ हटकर खामगांव जि बुलढाणा9604079143 saurabhhatkar.blogspot.com

06 Dec...

मोहम्मद माझा खास दोस्त,अगदी हक्काने खिरखुर्मा सांगावा अन नाही आणला तर हक्काने शिव्या खाणारा मित्र.त्याचंही वय माझ्या वयाइतकंच म्हणून  वयाच्या 23 व्या वर्षी लग्न झालेल्या मोहम्मदची'हनिमुन' वरून मजा घ्या की,Family planning future वरून.तो हसूनच उत्तर देणार. घरून चिकन आणनार,तर कधी-कधी त्याच्या शेतातही जेवायला नेणार......इतका जवळचा तो दोस्त. तसाच आमच्या मैत्रीत सोबतीला तिसरा असणारा 'राम' ही आहे. राम सुद्धा तितकाच जिगरबाज.... आम्हा सर्वांना एकमेकांची दुःखे समान अन स्वतःची वाटतात. पैसे संपो की मुड खराब असो की चहा पाजायचा प्रश्न असो....प्रत्येकजण जबाबदारी पार पाडायला आवर्जून  पुढे  असतो.आमचे डबे शेअरींग करून खातानांचा आनंदच निराळा असल्याचा,अनुभव नेहमी प्रत्ययास येतो. म्हणूनच कदाचित आम्हाला कधीही  तो..'तो' आहे असं वाटलं नाही,अन मोहम्मदनेही कधी आम्हाला  वो...'वो' है असं जाणवू दिलं नाही. खरंतर आमची मैत्री भारताच्या तिरंग्या सारखी बहूरंगी पण तितकीच एकरूप आहे.. नव्हे आम्ही 'आमच्यातच' ईतके मिसळलोय अन  इतके एकरूप झालोय की,सारा देश असा वागला तर धर्माच