Posts

Showing posts from November, 2021

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

Image
20 nov ला सायंकाळी मला सागर टेळे या मित्राचा फोन आला. सागर हा Delhi मधे सध्या upsc ची तयारी करतोय. आमची या पूर्वी कधी भेट झाली नव्हती. एक दोन वेळेस फोन वर बोलणे झाले. पण त्याने आम्हीं मेंढपाळ समूहाच्या दृष्टिने जे कार्य करीत आहे. त्याला तो जाणून होता. म्हणूनच त्याने यवत जवळ जोगेश्वरी सिद्धनायक यांच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण धाडले. मित्राची Platina घेऊन मी सकाळीच यवत च्या दिशेने निघालो.  यवत हे पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग 65 वर वसलेले गाव आहे.  तसे बघितल्यास हा भाग प्रचंड संपत्ती आणि समृद्धी चा दिसतो. रस्त्याने जात असताना सगळीकडे दिसणारी हिरवळ (  शेतातील म्हणतोय) मन प्रसन्न करणारी आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात फुलांच्या नर्सरी दिसल्या.  त्या नर्सरी  मधील विविध रंग बेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.  यवत ला पोहोचल्यावर आत मध्ये २-३. किलोमिटर वर तांबेवाडी गांव आहे. त्या गावात शिरताना सगळीकडे दिसणारे उसाचे मळे, त्या भागातील समृद्धीची साक्ष देतात. ऊस आणि त्याला अनुषंगाने असणारे कारखाने हे तेथील शेतकऱ्यांच्या संपन्नतेचे  मुख्य कारण आहे. ऊस तसं प्रतिष्ठेचे आणि आर्थिक उत्पन्नाचे सा