गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

20 nov ला सायंकाळी मला सागर टेळे या मित्राचा फोन आला.
सागर हा Delhi मधे सध्या upsc ची तयारी करतोय.
आमची या पूर्वी कधी भेट झाली नव्हती.
एक दोन वेळेस फोन वर बोलणे झाले.
पण त्याने आम्हीं मेंढपाळ समूहाच्या दृष्टिने जे कार्य करीत आहे.
त्याला तो जाणून होता.
म्हणूनच त्याने यवत जवळ जोगेश्वरी सिद्धनायक यांच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण धाडले.

मित्राची Platina घेऊन मी सकाळीच यवत च्या दिशेने निघालो.
 यवत हे पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग 65 वर वसलेले गाव आहे. 
तसे बघितल्यास हा भाग प्रचंड संपत्ती आणि समृद्धी चा दिसतो.
रस्त्याने जात असताना सगळीकडे दिसणारी हिरवळ (  शेतातील म्हणतोय) मन प्रसन्न करणारी आहे.
या महामार्गावर मोठया प्रमाणात फुलांच्या नर्सरी दिसल्या. 
त्या नर्सरी  मधील विविध रंग बेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.
 यवत ला पोहोचल्यावर आत मध्ये २-३. किलोमिटर वर तांबेवाडी गांव आहे.
त्या गावात शिरताना सगळीकडे दिसणारे उसाचे मळे, त्या भागातील समृद्धीची साक्ष देतात.
ऊस आणि त्याला अनुषंगाने असणारे कारखाने हे तेथील शेतकऱ्यांच्या संपन्नतेचे  मुख्य कारण आहे.

ऊस तसं प्रतिष्ठेचे आणि आर्थिक उत्पन्नाचे साधनच म्हणायला हवे.
त्या उसांना उपलब्ध असलेले सतत चे पाणी, समृद्धीचा source  आहे.
या क्षेत्राला सतत ओलीत ठेवण्यासाठी बेबी कॅनॉल, मुला- मुठा नदी, भीमा नदी हे जल सिंचनाचे स्त्रोत सतत ऊपलब्ध असतात.

जे जवळपास त्या क्षेत्रातील सर्वच भागाला सतत सिंचित करून ठेवण्यासाठी उपयोगी ठरतात.

त्या तुलनेने सासवड- पुरंदर भाग मला दुष्काळ ग्रस्त आणि सिंचाना पासून वंचित वाटतो.
त्याची कारणे?? काय महिती.

उसाचे पीक इतकेच मर्यादित वैशिष्टे या भागाचे नसून, जवळपास 4 साखर कारखाने या भागात आहेत.
  ते कारखाने अनुक्रमे भीमा पाटस , अनुराग, श्रीनाथ म्हस्कोबा, दौंड शुगर असून , राजकीय, सामाजिक, आर्थिक क्षेत्रातील घडामोडीं चे केंद्रस्थान आहेत.

यातील एक कारखाना म्हणजेच दौंड शुगर कारखाना, IT department च्या छाप्यां मुळे नुकताच चर्चेला ही  आला होता.

या व्यतिरिक्त प्रत्येक गावात उसाची गुऱ्हाळे आहेत.
या गुऱ्हाळा मूळे गावाची एक स्वतंत्र अशी अर्थ व्यवस्था तयार झालेली आहे.

या गुऱ्हाळा तील गुळ इतर राज्यात दारू व तत्सम कारणासाठी export केल्या जातो. त्यामुळे एक वेगळी अर्थव्यवस्था स्वयंरोजगाराच्या माध्यमातून प्रत्येक गावात नांदते.

भरीस भर म्हणून या भागात मोठया प्रमाणात industrialization झालेले दिसते.
भांडगाव परिसरातील एमआयडीसी चे वेग वेगळे युनिट असो, अथवा
 सुहाना मसाला, पेप्सी कोका कोला पॅकींग, filter- ऑटोमेशन ची अनेक प्लांट इथल्या स्थानिक रोजगाराची भूक पूर्ण करतात.
त्यामुळे तरुणांना स्थानिक रोजगार मोठया प्रमाणात मिळत असावा. असं माझे निरीक्षण आहे.

या भागात धनगर मेंढपाळ मोठया प्रमाणात आढळतो.
धनगर मेंढपाळ असला तरी मेंढी पालन हा व्यवसाय जवळ्पास 90% पेक्षा अधिक प्रमाणात निकालात निघाला असून, तांबे वाडी जिथे बहुसंख्य धनगर आहेत. तिथे फक्त २ कुटुंबा कडे मेंढरे आहेत. 
त्याची स्वतंत्र कारणे असली तरी, शेती- ऊस - औद्योगीकरण यामुळे सहज उपलब्ध असलेले रोजगार आणि उदर  निर्वाहाचे अन्य पर्याय  सुद्धा तितकेच महत्त्व पूर्ण आहेत.

थोड्या वेळाने तांबे वाडी मधे मी आणि सागर पोहोचलो. तेथे गेल्यावर लक्षात आले की,
जत्रा जवळ्पास संपल्यागत होती .

सिद्धनाथ जोगेश्वरी च लग्न लागून गेले होते.
नंतर मी त्या संदर्भातील महिती गोळा केली.
अनेक ज्येष्ठ लोकांशी संवाद साधला... एवढ्या लांबून आलेला मेंढपाळ धनगराच पोरग येऊन आपल्याशी बोलतेय.
याचं लय कौतुक तेथील ज्येष्ठांना वाटत होत.
'हटकर म्हंजी आम्ही महारणर च' ही ओळख सांगितल्यावर जे आपलेपण जुळून जिव्हाळा निर्माण होत होता.
तो मला या भागात पहिल्यांदा आलोय किंवा परका आहे. ही भावना नष्ट करीत होती.
त्यांच्या जवळून अनेक
अनेक महत्त्व पूर्ण महिती , दंतकथा  या संदर्भातील मला मिळाल्या.

कधी तरी त्या वर स्वतंत्र लिखाण सुद्धा होऊ शकेल.
पण या सर्वात सगळ्यात महत्वाचे काय वाटले असेल तर मला खूप आनंदी आणि समाधानी वाटले.
कोकरे, ठोंबरे, पारखे, तांबे, टेळे ही आडनावे विदर्भातील माझ्या नात्यातलीच आहेत.
त्या वाड्या मध्ये फिरताना मला माझे ' गणगोत '  मिळाल्या सारखे वाटत होत.
लहानपणी आमची आया (आजी- भीमाबाई) की ' काई व्हवू पण गण गोताला सोडू नाई ,  जेवढं गण गोताला पाणी येतं तेवढं कुणाला येत नाय (म्हंजे कुठल्या संकटात मदतीला येणे)'.
ती जाणिव मला तिथे झाली , " का र पाहुण्याला खाऊ घातलं की नाही " ही विचारणा माझ्यातील,
परकेपणा किंवा academic scholar चे उसने अवसान बाजूला फेकणारे होते.

या सगळ्यात दोन गोष्टी माझ्या मनात टोचत होत्या.
एक की या भागात धनगर मेंढपाळ संख्येने भरपूर आहेत.
तरी त्यांचे स्थानिक स्वराज्य संस्था, सहकार आणि विधानसभेला पहीजे तेवढे राजकीय प्रतिनिधित्व नाही.

ते असले पाहिजे किंवा ते नाही म्हणून आपल्यावर राजकीय अन्याय होत आहे.
असं सुद्धा या भागातील लोकांना वाटत नाही.
कदाचित उसाच्या मळ्यातील थंडाव्याने यांना त्या गोष्टीची झळ बसत नसावी किंवा कारखान्यातील साखरे मुळे त्यांच्यावरील अन्यायाचे कडूपण नष्ट केले असावे.( अर्थात मी पहिल्यांदाच या भागात फिरल्यामुळे मला इतक्या हक्काने असं मत मांडणे योग्य नाही... किँवा हे मत माझे फार वर वरचे असावे.. तसे आसेल तर  मला सांगावे.. मी ते correct करेल)

दुसरे म्हणजे... पुण्यातील हा भाग समृद्धीच्या साखरेत भिजलेला आहे.
विशिष्ठ ठिकाणी केंद्रीत झालेला विकास, हा अन्य कुठल्या तरी भागावरील अन्यायाच्या बळावर होत असतो.
आणि ही गोष्ट या भागाला उसाच्या निमित्तानेच लागू पडते.

उसाच्या मळ्यावर काम करणारे कामगार हे कामगार मराठवाडा मधील बीड-  आष्टी  परिसरातून , तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार भागातून आलेले दिसतात.
ते भटके विमुक्त- निम भटके जमातीतील आहेत.
लम्हानी- बंजारा - वंजारी - नाईक आदिवासी जमाती मधील घामाच्या जोरावर इथला ऊस गोड झालेला आहे.
 उसाच्या गुऱ्हाळा वर काम करणारी माणसे up- bihar मधली असतात.
त्यांची एकंदरीत  राहण्याची वगैरे परिस्थितीची कहाणी कडवट वाटली.
लहान लहान पोरं पाठीला बांधून, कुणी बैलगाडी वर नेऊन उसाच्या कामावर असलेली दिसली.
( इथ विकासाचा regional imbalance वगैरे गुळचाट academic शब्द वापरून संपविता येत नाही... )

मध्यंतरी ऊस कामगाराच्या जोरावर आपल्या दोन पिढ्यांचे राजकारण करणाऱ्या एका राजकीय व्यक्तीचा मुलगा परदेशात शिकायला गेला.
ही बातमी वाचली होती.
एकीकडे उसावर राजकारण रंगविणारे त्यांची मुले परदेशात शिकायला जातात, आणि हे उसाच्या फडात आपले बालपण घालवीत असतात.
असे का...??(काय महिती)

 
या सगळ्या व्यापात बराच वेळ गेला... मी आणलेली गाडी सुद्धा दुसऱ्याची होती.
त्याला ती हवी होती म्हणून, तातडीने परतीला निघालो.
पण handal सरांच्या आग्रहास्तव त्यांच्या घरी गेलो.
सरांनी ज्या प्रकारे सन्मान केला.
मन भरुन आले.

सरांच्या घरी शाल श्रीफळ घेउन मी....
हायवे नी मोठया ट्रक च्यामुळे डग
डग हलणारी Platina घेऊन, सुलपा सूल्पा ने सावकाश रूम वर पोचलो.

सौरभ हटकर
मेंढपाळ पुत्र आर्मी
9604079143
#भटका
#पुणे_फिरस्ती
#पुणे 
#मेंढपाळपुत्रआर्मी 
#धनगर 
#Dhangar 
#ऊसतोड 
#बंजारा 
#वंजारी

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

संविधानिक नैतिकता