Posts

Showing posts from October, 2017

निसर्गाचा समतोल साधून करावा विकास

कुठल्याही देशाचे उत्तम रस्ते  हे विकासाचे चाके म्हणून ओळखल्या जातात. औद्योगिक मालाचे दळणवळण,पर्यटन,वेगवेगळ्या भागांची कनेक्टीविटी म्हणून रस्त्यांचे महत्व अबाधितच आहे.भारतासारख्या विकसनशील देशांमधे तर जेवढे रस्त्यांचे नेटवर्क  मजबूत तेवढा अंतर्गत विकास झपाट्याने घडवून आणता येतो.त्यामुळे रस्ते व्हायला पाहिजेतच..... पण निसर्गाचा,जैवविविधतेचा,आणि पर्यायाने पर्यावणाचा ह्रास करून होणारे रस्ते हे विकासाचे माॕडेल होऊ शकत नाही.भग्न अन सिमेंटची जंगले शाश्वत विकासात येत नाहीत.त्यामुळे वृक्षतोडीचा असाच प्रयत्न खामगांव-शेगांव रस्ता चौपदरीकरणात होणार तर नाही ना?  अशी शंका मनात निर्माण झाल्यामुळे हा लेख प्रपंच... काही वर्षापुर्वी खामगांव-जालना महामार्ग चौपदरीकरणासाठी शेकडो झाडांची कत्तल केल्या गेली. नाममात्र भावात झाडांचा लिलाव करून,दशकांची नैसर्गिक संसाधाने असलेली अमुल्य झाडे खिरापतीत वाटल्या सारखी विकून तोडली. भरपाई म्हणून कुठल्याही प्रकारची झाडं कुठेच  लावल्या गेली नाही. आणि निर्दयतेचा कळस म्हणावा की काय???त्याच जून्या रस्त्याच्या आजूबाजूला मोठंं खोदकाम करून,ते तसंच पेंडींग ठेवल्या गेलं.त

---जनरल डबा~1---

         दि.15/10/2017 दुपारी 12 ला पेपर संपवून नवी मुंबई पासून कल्याणचा 'लोकल' प्रवास करण्यात 'ग्लोबल' मजा आली. तो प्रवास कदाचित संस्मरणीय ठरण्यासाठीच आसावा.कारण........© दुपारचा एक वाजला होता,घामाने तरर होतो. प्रवासा बद्धलचा विचार करून क्षीण मनाने कल्याण पासून जळगाव  साठी पवन ट्रेन च्या जनरल डब्यात घुसलो. खरंतर तो नुसताच जनरल डबा नसतोच , तो असतो खरा जनरल भारत. दुःखी,सुखी,कष्टी,पाकीटात तिकीटा ऐवढेच पैसे असणारे पण डोळ्यात जग जिंकण्याचा ध्यास ठेऊन मिळालेल्या जागेत(संधीत)Adjust होणारे,तर काही भनसेवादी(बाहेरसे आते है साले,यहाँ गंदगी फैलाते,सिट तुमारे बाप की है?,हमे सिट मिलनी चाहे वगैरे) व ई. दरवाजाच्या मुखाच्या अर्धे आत अर्धे बाहेर असलेला हा वर्ग दुःखी असतो,आपल्याला  संडास जवळ किंवा संडास मधेतरी प्रवास संपेपर्यंत उदरनिर्वाहा पुरती जागा मिळावी.ऐवढी माफक अपेक्षा त्या वर्गाची असतात. अन नाही मिळाली तरी , आपल्या नशिबात दरवाजाच आहे असं म्हणून सहनारे. दुसरा वर्ग दरवाज्याच्या आत सुरक्षित पण ताटकळत उभे असलेला कष्टी असतो. सकाळी सकाळी तोंडावर येणारी 'अर्जंट' प्रतिक्