Posts

Showing posts from August, 2019

नेहरूजी तुम्ही खरंच देशाचं वाटोळं केलं..*

* .......वर्ष भरापुर्वीचा लेख ✍🏻सौरभ हटकर 14 aug 1947 साली घटना समितीसमोर बोलतांना नवभारताचा केलेला  दृढनिश्चय किंवा देशाला लालकिल्ल्यावरून देशाला दिलेली दिशा...आणि त्या साठी जवळपास 2 दशक केलेले कष्टामुळेच देशाचं वाटोळं झालं नेहरूजी.... अहो जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं..."देडसो साल अंग्रजोने इस देश कु लुटा है...ये सब पाप अंग्रेजो का है" असल्या थापा मारून तुम्ही जनतेला भावूक भ्रामक करू शकला असता . पण नाही तुम्ही  घटना समितीसमोर "जेव्हा आपण जून्यातून नव्यात प्रवेश करतो,जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि जेव्हा राष्ट्राचा बराच काळ दडपलेला आत्मा व्यक्त होतो.अशा गंभीर क्षणी आपण भारताच्या आणी भारतीय जनतेच्या सेवेला तसेच त्याहून अधिक महान अशा मानवतेच्या कार्याला ,वाहून घेण्याची प्रतिज्ञा करणे उचित राहील" असे बोलून तुम्ही नवभारताविषयी उदार आणि व्यापक आकांक्षा मांडल्या हे चुकलंच. नेहरूजी गांधी हत्या ही विशिष्ट विचारसरणीच्या विशिष्ट संघटनेच्या विखारी प्रचारामुळे झाली म्हणून तुम्ही त्या संघटनेवर तात्पुरती बंदी आणली. पण ही बंदी कुणाचे विचार स्वातंत्र्य हिरावू

धनगर नव्हे;तथाकथित classical शहरी पर्यावरणवादी पर्यावरणांस धोकादायक आहेत.

13 aug 2019 ला विजय पिंजरकर यांचा 'state govt fails to act against report on sheep grazing'ह्या मथळ्याखाली times of india  मधे लेख आला होता.योगायोग असा की ठिक वर्षभरापुर्वी म्हणजे 14 आॕग 2018 ला पिंजरकरांचाच  अशाच प्रकारचा लेख times of india  लाच छापून आलेला आहे. दोन्ही लेखामधे मेंढपाळ(धनगर) समाजाला गुन्हेगार ठरवून यथेच्छ झोडपलेले आहे. धनगरांमुळे वने कशी धोक्यात येत आहेत याबाबत त्यांनी अनेक आरोप करून ,वनसंवर्धनाच्या बाबतीमधील elite and classical अप्रोच वापरला आहे.यावरून त्यांचा धनगर आणि इतर वन्य निवासी जमातीबाबतची पुर्वग्रह दुषित मानसिकता दिसून येते. असो  सदर मुद्ध्यांचे खंडन करणे हे मेंढपाळपुत्र म्हणून आमचे कर्तव्ये आहे. करीता हा लेखप्रपंच.. त्यांच्या लेखातील काही आरोप:- आरोप क्रं1)सातपुडा फाऊंडेशन चे कैलाश रिठे म्हणतात त्याप्रमाणे"   मेंढपाळांमुळे सरकार राबवित असलेल्या 33 कोटी वृक्षरोपणांस धोका आहे." उत्तर:-खरंतर पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलायला हवं न की सरकारच्या बाजूने. 2016 साली सरकारने 2 कोटी वृक्ष

पशुपालना कडे स्वतंत्र दृष्टीने पाहणे गरजेचे.

"मागील दोन पिढ्यांपासून आम्ही इथं या माळरानावर जित्राबं(मेंढरं) चारतूया,पण औंदा फाॕरेष्ट च्या सायबांनी आम्हाला पकडून नेलं.अन दोन लाख रूपयं भरा म्हणलं. पण आमच्या कडं 45 हजारंच होतं म्हणून आम्ही तेवढ्यातच आटापलं...आम्हाला आता त्या जंगलातून बाहिर काढलं..तूमीच सांगा आता  ही जित्राबं(मेंढरं)चारावी तरी कुढं" यवतमाळ जिल्ह्यातील एका मेंढपाळाने फोन करून मला ही  त्याची  व्यथा  सांगितली.अशा एक ना अनेक  घटना पशुपालक समाजाबाबत देशभर रोज घडत असतात. कुठे गावगुंडांचा त्रास तर कुठे वनअधिकार्यांचा त्रास. हा वनवास जणू पशुपालकांच्या पाचवीलां कायमचाच पुजलांय. अशा घटनांमुळे पशुपालकांच्या उदरनिर्वाहाचा तसेच सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून,पशुपालकांच्या प्रश्नांची स्वतंत्रपणे नोंद घेणे ही काळाची गरज बनलेली आहे. मागील काही दिवसांमधील दोन घटनांची नोंद या ठिकाणी करणे गरजेचे आहे.1) Perodic labour  force survey reportनुसार भारतात बेरोजगारीने 45 वर्षांतील उच्चांक घाटला आहे.  तर  दुसरी बातमी 'खाद्य व कृषी संघटनेच्या (FAO)' च्या रीपोर्ट बाबत ची आहे. जो रीपोर्ट भारतात भूकेलेल्यां