Posts

Showing posts from October, 2019

लोडशेडींग आणि गावगाडा....

पुर्वी.... गावामधे भारनियमन असायचे...गावात कोणी त्याला लोडशेडिंग तर कोणी लोडशिटींग म्हणतात ... साधारणतः 6-6 तासाचे लोडशेडिंग तेव्हा  असायचं... सायंकाळी 5-6 दरम्यान लाईन जायची तर थेट मध्यरात्री 12 नंतरच यायची.... पौर्णिमेचा लख्ख चंद्र जणू गावाला प्रकाशित करायचा, तर अमावसेच्या रात्री "चुर-चुर-चुर" करणारी रातकिडे त्या अंधाराला अजून भयाण करायचे. दरम्यान गावातल्या बाया बापड्या आपली कामं लवकर आटोपून एकमेकांच्या ओट्यावर जाऊन  बोलंत बसायच्या, तर कुठे रस्त्याच्या कडेला किंवा एखाद्या ट्रॕक्टरवर  किंवा मंदिराच्या ओट्यावर  बसून युवकांचे घोळके 'रसभरीत' चर्चा करीत रमलेली असायची. तर कुणी रात्री लाईन आल्यावर वावरांत पाणी द्यायला जायचं या ताणात राहायची. बुजुर्ग बिचारी आपली बाहेर बाजा,खाटा टाकून त्यावर नातवं खेळवायची. गावांत दुर कुठेतरी कोणत्या तरी कोपऱ्यात एखाद्या जवळच असणारा Everyday च्या सेल वर चालणाऱ्या  रेडिओवरून.. आकाशवाणी अकोल्याच्या केंद्रावरून प्रसारीत घडामोडी....गावातील काळोख आणि शांतता चिरत कानावर पडायच्या. बर्याचदा रेडिओ वर ठरलेली गाणीही असायची,जशी की बिंदिया चमक