Posts

Showing posts from December, 2019

CAA-NRC:-संभ्रम,संशय,भीती. सर्वंकष .

Image
सिटीझनशीप अँमेन्डेमेंट ऍक्ट  (CAA) मुळे देशभरात संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. भारतीय राजधानी असलेल्या दिल्ली मधे या आन्दोलनाने उग्र रूप धारण केलेले असून ,पाहता पाहता या आंदोलनाची धग संपूर्ण देशभर पसरलेली आहे . महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापुर मराठवाड्यातील काही भागामधे सुद्धा CAA बाबत आंदोलने झाले आहेत सोबतच अन्य ठिकाणी सुद्धा  होत आहेत. काही काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक रूप धारण केले,कुठे विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलने केली तर कुठे पोलिसांकडून सुद्धा हिंसा झालेली फुटेज बघायला मिळत आहेत .कुठल्याही आंदोलनांमधे हिंसा होणे ,समर्थनीय नसून ,त्यामुळे आंदोलनाची धार च बोथट होत असते . social media वर सुद्धा प्रो कायदा -कायद्याच्या विरुद्ध बाजू  ताकदीने   मांडल्या जात आहेत . यात कायद्याच्या बाजूने आणि विरोधात निघालेल्या अनेक मोर्च्यांमध्ये  दोन्हीही   बाजूच्या लोकांना ,काही पत्रकारांनी caa बाबत प्रश्न विचारले असता ,त्यांना CAA म्हणजे काय आणि कोणत्या कारणासाठी विरोध करत आहात??कोणत्या कारणासाठी समर्थन करीत आहात  ? हेही सांगता आलेलं नाही ..(याबाबत फरहान अख्तर यांचा vdo