Posts

Showing posts from September, 2019

'दीन' अभियंता.

भारतरत्न सर  मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.visvesvaraya). यांच्या स्मरणार्थ 15  sept हा त्यांचा जन्मदिवस  अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो. विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते होते,त्यांची विशेष ओळख ही त्यांच्या संशोधनात्मक dam construction&water irrigation च्या निर्माण केलेल्या प्रणाली बद्धल आहे. त्यांच्या संशोधनामुळे  मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचले  आणि त्याचा   परीणाम सभोवातालच्या परीसरातील लोकांची तहान भागवून ,शेती सिंचनासाठीही  झाला. हैद्राबाद शहराला पुरापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या 'फ्लड प्रोटेक्शन सिष्टम' ने विश्वेश्वर्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले होते.1912-1918 च्या दरम्यान म्हैसुरचे दिवाण म्हणून काम करणाऱ्या विश्वेश्वर्यांनी भारताच्या आर्थिक नियोजनाचा पायाही घातला होता.सन 1934 साली त्यांनी 'Planned Economy in India'  हे पुस्तक लिहीले.यालाच  'Sir M. Visvesvaraya plan'  ही म्हणतात. ब्रिटिश कालीन भारतात जन्मलेल्या  या जिज्ञासू व्यक्तीने आपल्या संशोधनाच्या बळावर ईतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घेण्यास भाग

अमृताजी फडणवीस मॕडम...तुम्हाला ट्रोल करणाऱ्यांना झोडपाच,पण आपल्या IT cell लाही आवरा....

Image
प्रति, अमृताजी फडणवीस मॕडम..... महाराष्ट्रातील गड किल्ले  सरकारने भाड्याने द्यायचे ठरवले असता...महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी  गडप्रेमींनी त्या निर्णयांस  विरोध केलां आहे..अन तो करायलाही हवांय..शेवटी गड किल्ले हि महाराष्ट्राची अस्मिता आहेत....त्यांना चंगळबाजीचा वारसा नसून,शौर्य व स्वाभिमानाचा वारसा आहे....म्हणून ते जर चंगळबाजीसाठी भाड्याने द्यायचे सरकार ठरवत असेल तर सरकारला विरोध करायलाच पाहिजेत आणि तो तसा झालाही.... पण त्या गडकिल्ल्यांच्या निर्णयावरून ट्रोल मात्र तुम्ही झालांत....अर्वाच्च्य भाषेमधे मात्र  आपल्या बद्धल लिहीलं गेलं..... दुर्दैवाने शत्रूच्या स्त्रीचाही सन्मान करणारे छत्रपती शिवराय यांचा वारसा सांगणाऱ्या काहींनी भावनेच्या भरात तुमच्या बाबत मात्र अतिशय गलिच्छ लिहून ट्रोल केले...... खरंतर त्या निर्णयात तुमचा रोल काय??हा एक प्रतिप्रश्न मी एका ग्रुप वर अशाच एका व्यक्तीला विचारला असता....त्याला तेथे उत्तर देता आले नाही....पण झालेला प्रकार हा निंदणीय आहे . तुम्हची विचारधारा अन माझी विचारधारा वेगवेगळी आहे...पण माझ्या नजरेत तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या पुरूषाची प्राॕपर