अमृताजी फडणवीस मॕडम...तुम्हाला ट्रोल करणाऱ्यांना झोडपाच,पण आपल्या IT cell लाही आवरा....



प्रति,
अमृताजी फडणवीस मॕडम.....
महाराष्ट्रातील गड किल्ले  सरकारने भाड्याने द्यायचे ठरवले असता...महाराष्ट्रातील समस्त शिवप्रेमी  गडप्रेमींनी त्या निर्णयांस  विरोध केलां आहे..अन तो करायलाही हवांय..शेवटी गड किल्ले हि महाराष्ट्राची अस्मिता आहेत....त्यांना चंगळबाजीचा वारसा नसून,शौर्य व स्वाभिमानाचा वारसा आहे....म्हणून ते जर चंगळबाजीसाठी भाड्याने द्यायचे सरकार ठरवत असेल तर सरकारला विरोध करायलाच पाहिजेत आणि तो तसा झालाही....
पण त्या गडकिल्ल्यांच्या निर्णयावरून ट्रोल मात्र तुम्ही झालांत....अर्वाच्च्य भाषेमधे मात्र  आपल्या बद्धल लिहीलं गेलं.....
दुर्दैवाने शत्रूच्या स्त्रीचाही सन्मान करणारे छत्रपती शिवराय यांचा वारसा सांगणाऱ्या काहींनी भावनेच्या भरात तुमच्या बाबत मात्र अतिशय गलिच्छ लिहून ट्रोल केले......
खरंतर त्या निर्णयात तुमचा रोल काय??हा एक प्रतिप्रश्न मी एका ग्रुप वर अशाच एका व्यक्तीला विचारला असता....त्याला तेथे उत्तर देता आले नाही....पण झालेला प्रकार हा निंदणीय आहे .

तुम्हची विचारधारा अन माझी विचारधारा वेगवेगळी आहे...पण माझ्या नजरेत तुम्ही मुख्यमंत्री असलेल्या पुरूषाची प्राॕपर्टी अथवा मादी नसून,तुम्हाला तुमचं स्वतंत्र असं अस्तित्व आहे.त्यामुळे तुम्ही कसं राहावं? काय घालावं? काय घालू नये? याबाबत आपल्या  स्वातंत्र्याचा मी आदर करतो...तुमच्या राहणीमाना बाबतीतही तुम्हाला अनेकदा ट्रोल केल्या गेलंय,पण तुम्ही त्यांस भीक न घालता निडरपणे आपल्या वागणूकीतून ट्रोल्सना उत्तरे दिलीत.....
तरीही आपणांस ट्रोल करणारे अथवा शिव्या देणारे एकतर शिवरायांचे मावळे असू शकत नाहीत ,अथवा जर ते तसं स्वतःला  म्हणवून घेत असतील तर त्यांना महाराज अजून कळालेच नाही,असं मला वाटतं..
पण.....या पार्श्वभूमीवर माझी आपणांस एक विनंती आहे की....आपण अनेक कार्यक्रमात सहभागी होत असतात.....तेव्हा एखाद्या कार्यक्रमात सदर प्रकरणाबाबत परखडपणे बोला.....पण बोलतांना या विषयाची व्याप्ती फक्त स्वतः पुरती मर्यादित ठेऊ नका..कारण मातृ देवो भवः म्हणून स्त्रीचा गौरव करतो ,अशा म्हणनार्या आपल्या भाजप पक्षाने पोसलेल्या अनेक अधिकृत-अनधिकृता IT cell ही असली निच कामे सतत करीत असते.
काही दिवसांपुर्वी प्रियंका गांधींनी उत्तर प्रदेश राजकारणात सक्रियता दर्शविली असता,त्यांच्या शरीरावरून "वो तुम्हे 32-32 के दो दिखायेगी,पर तुम 56 इंच पे अडे रहना" असे Photoshop करून व्हायरल केले  होते....
 आज जे लोकं तुम्हाला ट्रोल केल्यावर स्त्री सन्मानाचे डोस पाजत आहेत....
ती बहूतांश लोक त्यावेळेस मात्र दात काढत हसत असायची आणि ते मॕसेजेस  शेअर करायची....
बरं या प्रकाराचे बळी फक्त तुम्ही किंवा प्रियंका गांधीच आहेत असं नव्हे,तर ममता बॕनर्जी,मायावतीजी,सोनिया गांधी,सुप्रियाताई सुळे,राणा अय्युब,अरूंधती राॕय किंवा अशा अनेक स्त्रीया,ज्या सार्वजनिक आयुष्यात वावरतात....त्यांना अतिशय खालच्या पातळीवर जाऊन टिका टिप्पणी करून,त्या स्त्रीयांचे चारित्र्य हणन केले जाते........

म्हणून अमृताताई फडणवीस मॕडम...या सर्वांना आपण एकदा झोडपुन काढा...हवंतर आपण मुख्यमंत्र्यांना सांगुन,ट्रोल्स विरोधी कायदा करायला सांगा....आणि सोबतच भाजप पुरस्कृत IT cell लाही....असले नीच धंदे बंद करायला सांगा.....
कारण स्त्री ही स्त्री असते,
ती भाजप-काँग्रेस,सत्ताधारी-विरोधक
या तत्सम बाजूंची नंतर असते...
पण सर्वात आधी स्त्री ही स्त्री असते..

      सौरभ हटकर
         खामगांव जि बुलढाणा
             9604079143
(टिप:- खालील फोटो हे viral करून,त्यावर अश्लिल कमेंटस केल्या गेलेल्या आहेत)

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता