Posts

Showing posts from February, 2019

गावाकडची दिवाळी....

सौरभ गो हटकर पुण्या-मुंबई शहरात काम करणारे गावातील लोकं आपल्या चारचाक्या घेऊन दिवाळीला गावात येतात. त्यांच्या गाड्यांची चाके गावातील रस्त्यावरील माती उडवित घराकडं वळतात…तोपर्यंत गावातील सर्व लोकांच्या नजरा चारचाकीवर पडतात…पारावर बसलेली लोकं त्याने चारचाकी घेतली,फ्लॕट घेतला..अशी.कुजबुज करतात…. काही सिनियर सिटीजन “एकवेळ ह्याला त चड्डी सावरायची सोय नव्हती” पासून “ह्याला त भोंगळा फिरतांना पाहिला मी …अन आज बघा कसा झालांय” असं म्हणतात …. तर समवयस्क शाळेत मी कसा झोडपला…तो कसा पुड्या आणून द्यायचा…अभ्यासात माझ्यापेक्षा कृमीच हुशार असायचा तरी बघ आज कसा मोठा झालांय…वगैरे वगैरे चर्चा करतात…. घरात गेल्या गेल्या आई-आज्जी नवलाईने नातवंडाना जवळ घेतात….ती शहरी नातवंडही नाजूकच असतात…त्यांच हँडवाशशिवाय काहीच जमत नाही….नाही त मग लगेच ‘क्ष्क्षाँ’सुरू होऊन इनफेक्शन ची भीती असते. त्यांना थोडंही खरचटलं की सॕव्हलाॕन-डेटाॕल कधी नव्हे ते घरात उपलब्ध असतं… अख्ख घरं शहरी नातवंडांच्या मागे सुरक्षिततेसाठी तैनात असतं… दुसरीकडे गावठी नातवंडं बंड्या बिंड्याला घरातले जवळपासही फिरकू देत नाही.(बंड्या एका दिवसात ‘छ

मी,नेमाडेंचं कोसला अन 'ते'....

मी,नेमाडेंचं कोसला अन 'ते'.... पासपोर्ट चे काम आटोपून 12  april 2018 ला नागपुरच्या रेल्वे स्थानकावर सकाळीच 6-6:30,ची रेल्वे पकडण्यासाठी अर्धवट झोपेत पोहोचलो...... स्थानकात गेल्यावर बघतो तर काय?सकाळच्या  सर्व गाड्या 4-5 तासाच्या अंतराने उशिरा येणार म्हणून मनाला क्षीण आला... एकतर खिशात पोटभर सोय लावण्यासाठी भरपूर पैसेही नव्हतेच..अन त्यात रेल्वे ची वाट पाहणं(तसंही आयुष्यात आपण कधी कुणाची कधी वाट पाहिलीच नसल्यामुळे,त्यातील व्याकुळता रेल्वेच्या निमित्ताने अनुभवता आली.) मग तेवढी 10:30 च्या आसपासची  महाराष्ट्र एक्सप्रेस पकडून मी शेगांव प्रवासाला निघालो.... नेहमीप्रमाणे जनरल डब्याच्या बोगीत जनरल भारत कोंबलेला होताच....एकतर सकाळ पासून खिशातील मर्यादित पैशांमुळे पोट पाठीला चिकटलं होतं...मनात चिड ,डोळ्यावर झोपही होती..अन त्यात श्वास घ्यायला उबग आणनारी गर्दी पाय ठेवायलाही जागा द्यायला तयार नव्हती... मी भयंकर त्रासलो...कसातरी शिव्या बिव्या घालत रेटत खेटत उभं राहायची जागा शोधून कसाबसा दोन पायावर उभा राहिलो...पण पंचाईत अशी की 5-6 तासाचा प्रवास असाच कंटाळवाणा उभं राहून करायचा तरी कसा??..