जानकर साहेब, कांशीराम व्हा.

 

महादेव जानकर यांना महायुती ने एक जागा सोडून, आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे.

या निमित्ताने जानकर यांचा प्रभाव संपला अशी धारणा असणाऱ्या अनेकांना, आणि ही धारणा पक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप ला सुद्धा महादेव जाणकार यांनी आपले उपद्रव मुल्य दाखवून दिले आहे .

वरकरणी ही एक जागा वाटत असली तरी या गोष्टीला अनेक अंग आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे.

या लेखाच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये संक्षिप्त स्वरूपात जानकर यांचा राजकीय उगम, त्यांचे उपद्रव मूल्य, त्यांचा विजनवास आणि आता त्यांचे कमबॅक या सर्व गोष्टी  समजावून घेवूयात.


कांशीराम यांच्या विचारधारेने प्रभावित असलेले 

जानकर जरी 2014 आधी पासून, राजकारणात सक्रिय असले. तरी 2014 ला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जानकर माहिती झाले. त्याचे कारण म्हणजे धनगर आरक्षणासाठी पेटवलेली ज्योत आणि बारामती लोकसभा मध्ये त्यांनी दिलेली जबरदस्त झुंज.


2014 मध्ये सुद्धा जानकर  यांची माढा मधून लढण्याची इच्छा असताना सुध्दा ऐनवेळी बारामती मध्ये त्यांचा मैत्रिपूर्वक गेम केला गेला.


पुढे धनगर आरक्षण हा मुद्दा गौण झाला, जानकर यांना विधान परिषद  आणि मंत्रिपद दिल्या गेले, आणि जानकर सत्तेत जाऊन रमले. त्यांचा जमिनी वरचा संबंध कमी झाला, हाडाचे कार्यकर्ते विखुरले आणि धनगर समाजावरील त्यांचा प्रभाव सुद्धा कमी करण्यात आला.


2019 रोजी जानकर यांनी मुंबई मध्ये रासप वर्धापन दिन साजरा केला... काही विधान सभेच्या जागांची मागणी तेव्हा त्यांनी केली. त्यावेळी त्यांना एका विधानसभेच्या जागेवर बोळवण करून त्यांचेच दोन आमदार ( राहुल कुल, मेघना बोर्डीकर)भाजप ने पळविले होतें.

परंतू जानकर यांनी 2019 मध्ये, उपद्रव केला नाही. त्याचे प्रामुख्याने एक कारण असे की, 2018 मध्येच जानकर यांना विधान परिषद भाजप च्या मदतीने जाहीर झाली होती. त्यामुळे फारसा उपद्रव करण्याची गरज त्यांना तेव्हा वाटली नसावी.

आणि पडळकर यांच्या माध्यमातून भाजप ने जानकर यांची जागा नुकतीच भरून काढायला सुरुवात केली होती.


 तरीही जानकर कांशीराम यांच्या मुशीत तयार झालेले असल्यामुळे, आणि त्यांचे तसे वैयक्तिक स्वतंत्र अस्तित्व असल्यामुळे त्यांनी भाजप ला वेळी वेळी आव्हान देण्याची भाषा केलेली आहे.


ती भाषा दडपून टाकण्यासाठी भाजप ने धनगर समाजातील उभरते नेतृत्व पडळकर  यांच्या माध्यमातून, जानकर यांचा उरला सुरला प्रभाव कमी करून टाकला.


2019 नंतर पडळकर यांनी जवळपास धनगर समाजावर जबरदस्त पकड निर्माण केल्यामुळे, जानकर यांची गरज भाजप ला उरली नाही. त्यामुळे 2024 मध्ये भाजप आपला उरलेला राजकीय कार्यक्रम संपवणार , याची जानकर यांना जाणीव झाली . त्यामुळे 2024 मध्ये जानकर यांना भाजप ने विचारले सुद्धा नाही.


परंतू, या ठिकाणी पडळकर, डॉ महात्मे, प्रा, शिंदे,  किंवा अन्य इतर पक्षातील नेते आणि जानकर यांच्या मध्ये एक महत्त्वाचा आणि मूलभूत फरक आहे. बाकी इतर नेते प्रस्थापित पक्षांच्या बंगल्यातील शिपाई आहेत. तर जानकर स्वतःच्या झोपडी चें मालक आहेत.

बंगल्यातील शिपाई बदलता येतात, मालक नाही.


त्यामूळे जशी 2024 जवळ आली, जानकर यांना त्यांच्या राजकीय अस्तित्व मुळातून संपण्याची चिन्हे दिसायला लागली असावीत. त्याचे 2 कारणे, एक जसे गोपीचंद जी पडळकर , प्रा राम शिंदे ही दोन धनगर समाजाची विधान परिषदेवर असताना,आणि पडळकर यांनी मार्केट काबीज केलेले असताना... भाजप आपल्याला अजिबातच मोजणार नाही.आणि दुसरे म्हणजे 2019 सारखी त्यांना, 2024 मध्ये विधान परिषद काही renew करून मिळणार नाही.


म्हंजे जानकर यांची विधान परिषद 2024 ला संपणार आहे, आणि भाजप कडे दोन आधीच धनगर असल्यामुळे आणि जानकर यांचे प्रभाव कमी झाल्यामुळे renew करण्याची करण्याची गरज सुद्धा नाही.म्हणून भाजप ने त्यांचे अस्तित्व विचारात च घेतलेले नव्हते.


 पण जानकर यांनीही धनगरी डाव टाकीत, महविकास आघाडी कडे कूच केली असता, भाजप ने जानकर यांना पुन्हा आपल्याकडे वळविले.

आता पडळकर, शिंदे विधान परिषदेवर असताना, आणि जानकर यांची अवस्था 2019 पेक्षा नाजूक असताना सुद्धा भाजप ला जानकर यांना  एवढे गंभीरतेने घेण्याची काय गरज पडली असावी?.


त्याचे एक महत्त्वाचे कारण हे की, धनगर समाजामध्ये एक तीव्र पण सायलेंट असंतोष भाजप प्रती निर्माण झालेला आहे.

मग तो आरक्षणाच्या निमित्ताने असो की, न मिळालेल्या  योजना असोत कि पक्ष फोडा फोडीचे राजकारण असो...

हे सर्व जानकर जर महाविकास कडून लढले असते तर जानकर यांच्या पथ्ठ्यावर पडले असतें.

जानकर निवडून आले असते किंवा पडले असतें पण माढा मध्ये त्यांनी आपली ताकद दाखविली असती.


त्याची परिणीती पुढील विधान सभेत झाली असती, जानकर यांची bargaining पॉवर वाढून ती भाजप च्या धनगर वोट बँक साठी धोका ठरली असती. दुसरीकडे महाविकास साठी फायदेशीर ठरली असती.

 2019 पासून पाडळकर यांचे निर्माण झालेले एकहाती प्रभुत्वाचा प्रभाव या निमित्ताने संपत असून, ताकद कमी झालेल्या रासाप ला उभारी देण्या इतपत हा असंतोष कारणीभूत ठरला असता.

त्यामुळे, जसे जानकर यांनी उपद्रव दाखवायला सुरुवात केली तशे त्यांना भाजपने बोलावून महायुती मध्ये सामावून घेतले.


जानकर आता बारामती, परभणी की माढा कुठून लढतात की विधान परिषदेसाठी सेटिंग लावतात हे पाहणे औत्सुक्याचे राहील.


जानकर, सदाभाऊ हे एकच वेळचे आमदार पण सदाभाऊ आता दिसत पण नाही... पण जानकर चर्चेत आहेत कारण जानकर यांचे स्वतंत्र्य अस्तित्व ही त्यांची जमेची बाजू आणि समजाची invisible ताकद आहे.


बाकी आता समझोता झालाच असेल तर जानकर यांनी तो समझोता स्वतः पुरता किंवा विधान परिषद renew साठी वापरू नये.  तर राष्ट्रिय समाज पक्ष व्यापक करण्यासाठी strategy बनवून लडण्यासाठी वापरायला हवा.


जानकर स्वतःला कांशीराम यांचा अनुयायी समजतात, त्यांच्या फुले शाहू आंबेडकरी मार्गावरील वाटसरू समजतात ( त्यांच्या पुस्तकात तसे उल्लेख आहेत), म्हणून त्यांनी कांशीराम यांच्या अनेक strategy सुद्धा  सत्तेत येण्यासाठी वापरल्या.


कांशीराम यांनी पहिल्यांदा भाजप च्या मदतीनेच सत्ता स्थापन केली होती( मायावती यांना मुख्यमंत्री करण्यासाठीं ). जानकर यांनी सुद्धा भाजप मदतीने सत्तेत वाटा मिळवलेला आहे.

कांशीराम यांच्या BSP प्रमाणे RSP स्थापन केला...


परंतु कांशीराम यांनी सत्तेला नेहमी साधन म्हणून वापरले, साध्य म्हणून नाही.

ज्यावेळेस 1998 दरम्यान कांशीराम यांना असे वाटायला लागले की राजकीय पदांमुळे त्यांचे संघटनेवरील पकड कमी झाली, त्यावेळी त्यांनी वैयक्तीक राजकीय सत्ता आणि पदांचा त्याग करून संघटना वाढीसाठी रस्त्यावर उतरले.

त्याची परिणीती म्हणून त्यांनी देशातील सर्वात मोठ्या आणि जातीयवादी असलेल्या राज्याच्या प्रमुख पदी दलीत महिलेला 4 वेळा मुख्यमंत्री बनविलेआहे ( संदर्भ- द सायलेंट रेविलुशन- Christophe Jaffrelot). .तो कित्ता आज जानकर यांना फिरवण्याची गरज आहे. त्यासाठी मिळालेली संधी कार्यकर्त्याला द्यायची गरज पडली तरी द्यावी, पण संघटन मजबूत करायला हवे. कांशीराम प्रयोग राज्यात जानकर करू शकतात, परंतू त्यांनीं आतड्याच्या बदल्यात कलेजीचा सौदा करायला नको .

म्हणून जानकर साहेब, महाराष्ट्राचे कांशीराम व्हा अशी विनंती.


( टीप - लेखातील सर्व नावाच्या नंतर साहेब by default consider करवे)


सौरभ हटकर

मेंढपाळ पुत्र.

PHD विद्यार्थी - The University of Edinburgh Scotland.

+447747212144


Mahadev Jankar 

#jankar 

#rashtriysamajpaksh 

मेंढपाळपुत्र आर्मी

Comments

Popular posts from this blog

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता