महादेव जानकर साहेब:- वाढदिवसा निमित्त माझ्या नजरेतून विश्लेषण.

✍🏻सौरभ हटकर
(टिप:- मी जानकर साहेबांचा भक्तही नाही अन विरोधक सुद्धा नाही.
म्हणून पुर्ण पोष्ट वाचल्याशिवांय react व्हायची घाई करू नये)

2012-13 चं साल असावं बहूदा,मी आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात C&C++ चे क्लासेस साठी गेलो होतो.
नल स्टाॕप असलेल्या सिड इन्फोटेक मधे मी    तेव्हा क्लास लावला होता.
उरलेल्या वेळांत थोडेफार पुणेही फिरून यायचो.
तेव्हा पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा हातात तलवार घेऊन,घोड्यावर स्वार या भूमिकेत अहिल्यामातेची बॕनर्स दिसलीं होती.

31 मे अहिल्यामाता जयंती निमित्ताने ती लावलेली होती.
रासपच्या झेंड्याच्या रंगाचे background  त्याला असायचं.
त्यावर बहुजनह्रदय सम्राट महादेव जानकर हे नाव फोटो सहित छापलेलंही दिसायचं.

ते बघून पहिल्यांदा महादेव जानकर या नावा बद्धल कुतूहल निर्माण झालं होतं.
वालचंद सांगली येथून अभियांत्रिकीचा Diploma ते विनालग्नाचे समाजकार्य हे कुठल्याही काळातील तरूणांसाठी आकर्षणाचे पैलू जानकरांच्या व्यक्तीमत्वात आढळले होते.
मेंढपाळ असल्यामुळे जानकरांसोबत  ओळख नसतांनाही, एक अपरिचीत,विना नोंदणी कार्यकर्त्याचं नातं तयार झालं होतं.
एक वेगळा आदरही निर्माण झाला होता.

आपला आवाज,आपले हक्क,अन आपल्या वर होत असलेला अन्याय व अशा अनेक गोष्टींची मांडणी,
त्यावर समाजाची बांधणी 
आणि मग परीवर्तनाची आखणी 
करून लढणारा लढवय्या ही प्रतिमा 2014 उजाडता उजाडता मनात घर करून गेली.

ती फक्त माझ्या एकट्याच्याच मनात घर करून गेली,अशातला भाग नाही.
तर समस्त बहूजन (ज्याला जानकर साहेब राष्ट्रीय समाज म्हणतात ) त्यामधे निर्माण झाली होती.

2014 साल हे अनेक अर्थाने धनगर समाजासाठी महत्वाचे ठरले.
कधी नव्हे ते एवढे भव्य दिव्य संघटन समाजाचं उभं राहिलं.
महाराष्ट्रातील कदाचित सर्वात मोठं आंदोलन,राज्याच्या सत्तेचं केंद्र असलेल्या बारामती मधे घडून आले होते.
साहाजिकंच त्या सगळ्या गोष्टींमागे जानकर साहेबांचा सिंहाचा वाटा होता.

'डिमांडर' च्या भूमिकेतून बाहेर काढून,संविधानाला अभिप्रेत 'कमांडरच्या' भूमिकेचं स्वप्न दाखविणारा धनगर समाजाचा माझ्या पिढीतला पहिला नेता म्हणजे जानकर साहेब म्हणायला हवेंत.

'मनुवाद' आणि 'मनीवाद' हे महाराष्ट्रातील सत्तेला स्वतःकडेच केंद्रीत करून ठेवणारे,एकंच नाणं आहे.
ते नाणं आलटून-पालटून सत्तेचं गणित स्वतःकडेंच कसं ठेवतात,याची राष्ट्रीय समाजाच्या अनुषंगाने मांडणी करणारे 'जाणकार' नेतृत्व म्हणून महादेव जानकर साहेबांकडे बघायला हवे.
यामुळे राष्ट्रीय समाजाचं सामाजिक-राजकीय,आर्थिक,सांस्कृतिक अंगाने कसं शोषण होतं?. हे ही त्यांनी मांडलं.
शिवराय-होळकर-फुले-शाहू-पेरीयार-आंबेडकर यांचा वारसाच जणू जानकर साहेब,आपल्या कृतीतून मांडत होते.

साहजिकच यावर आधारित कार्यामुळे जानकर हे राज्यातील दखलपात्र नेते झाले.

त्या गोष्टीची दखल घेऊन,स्व.गोपीनाथ मुंडें साहेबांनी  जानकरांना 2014-15 च्या निवडणुकीसाठी महायुतीतील घटक पक्ष म्हणून सामाविष्ट केले.

पुढे 2014-15 ला सत्ता हस्तांतरण झालं आणि भाजंप सत्तेवर आलं.

हे सत्तांतरण करण्यात धनगर समाज हा टर्निंग पाॕइंट ठरला.
धनगरांचे कधी नव्हे ते संघटीत-एकघट्टा मतदान भाजप ला गेलं.
अन भाजप(महायुतीची) राज्य व केंद्रात सत्ता आली.

जानकर साहेबांच्या शब्दातंच सांगायचं म्हटले तर'मनीवाद जाऊन मनुवाद'सत्तेवर आला होता.
पण यावेळेस फरक एवढा होता,की
जानकर साहेब आता त्याच  मनुवादाचे सहकारी झाले होते.

असं होतं बर्याचदा  राजकारणांत,की आपल्या वैचारिक भूमिकांच्या विपरीत जाऊन राजकीय तडजोडी कराव्या लागतात.
नव्हे 100% कुठल्याही बाजूच्या  विचारांना चिकटून  राजकारण होतंच नाहीत.
त्यावेळी काही भूमिका सैल करून,पुढं जायचं असतं.
जे अशी लवचिक भूमिका घेत नाहीत,ते राजकीय पटलावरून समाप्त होतात.

राजकीय पटलावरून ज्या वेगाने परिवर्तन घडविता येतं(ठरवलं तर) ते इतर माध्यमातून होत नाही असं मला वाटतं.
म्हणून जानकर साहेब भाजप बरोबर गेले तरी ते फारसं धक्कादायक नव्हतं.

पण......पण.....तरीही आपलं मुळ सोडुन जायचं नसतं.
जेथून आपला उगम झाला,त्या फाटक्या,तुटक्या पणाला,वाळवंटाला विसरायचं नसतं.
ती नाळ जपण्यासाठी काम करंत राहणं गरजेचं असतं.
त्यासाठी सतत त्याच घटकाशी संवादी असणं गरजेचं असतं.

2016ते 2019 दरम्यान च्या काळात क्रांतिकारी विचारांची मशाल असणारे महादेव जानकर मात्र जणू काही थंडच पडलेत.
सत्तेच्या उबे समोर परीवर्तनाचा दिवा मंदावला.
त्यांची धनगर समाजातील क्रेज याकाळांत फारंच मर्यादित होऊन गेली.
ती मर्यादित  झाली की,भाजप ने केली हा एक संशोधनाचा वेगळा विषय आहे.
कारण शुन्यातून फिनिक्स प्रमाणे भरारी घेणाऱ्या जानकरांच्या एकहाती हुकुमी प्रभुत्वाला आव्हान देण्यासाठी,भाजप ने पद्मश्री डाॕ महात्मे साहेबांचा राजकीय जन्म घातला.आणि त्यांना जानकरांच्या बरोबरीचे बनवून,जानकरांवर एका प्रकारे अंकुशच ठेवायचा प्रयत्न केला की काय? 
अशी शंका मला बर्याचदा येते.

तरीही....जानकर साहेब ज्या संघर्षातून वर आले होते.
ज्या विचार सरणीतून ते घडले होते.
अशा लढवय्या माणसाने सत्ते पुढं आपली हत्यारं म्यान करणं.
हे फक्त त्यांच्या साठीच वैयक्तिक पातळीवर घातक नसतं,तर जो समाज आपली उमेद त्या व्यक्तीवर ठेऊन असतो.
त्या समग्र समाजासाठी ते घातक असतं.
कारण उमेद मरणं,हे समाजाच्या अधोगतीचं लक्षण असतं.
तसंच काही 2016-2019 च्या काळांत आणि नंतर झालंय,हेही मला तितक्याच प्रामाणिकपणे वाटतं.
कारंण भाजप च्या सत्तेच्या काळांत जानकर साहेबांना,त्यांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रीय समाजाचं जबरदस्त संघटन करता आलं असतं.

समस्त बहुजनांचं आधारस्तंभ असलेले  गोपिनाथ मुंडे साहेबांचा दुर्दैवाने मृत्यू झाला होता.
त्यानंतर पोरक्या झालेल्या बहूजन समाजातील पोकळी भरून काढायची संधी जानकर साहेबांना होती.
एक मोठा राष्ट्रीय समाजाचा दबावगट निर्माण करून,तिसरा सक्षम पर्याय निर्माण करायची संधी होती.
बदल आम्ही घडवणारंच ला प्रत्यक्षात उतरविण्याची संधी जानकर साहेबांना होती.
शिवराय-होळकर-फुले-शाहू-पेरीयार-आंबेडकर या विचार सरणीचे कॕडर निर्माण करायची संधी जानकर साहेबांना होती.
असं एक एक कॕडर मधून,हजारो जानकर तयार करण्याची संधी होती.
अन असं झालं असतं तर, 50 च्यावर मागितलेल्या विधान सभेच्या जागांऐवजी 3 च जागा जाहिर करून,त्यातीलही 2 जणांना भाजपचेच  ए-बी फाॕर्म देऊन उमेदवार पळवायची हिम्मत भाजप ची झाली नसती.
1 जागेवर विधान सभा लढवणं हे दिल्लीची स्वप्न पाहणाऱ्या कमांडरांच्या आकांक्षांचा अवमान मी मानतो.
हे टाळता आलं असतं.

पण झालं उलटंच,स्वतःच्या घरावंर तुळशी पत्र ठेवायला तयार असणारी पोरं गायब होऊन,पुढं पुढं करणारी भक्तच तयार झालींत.
अन त्यांनी जानकर साहेबांना चक्क देवंच बनवून टाकलं.(  पुरोगामी चळवळीतील नेत्याला हे असं देवं बनविने कधी पटतंच नसतं,जानकर साराबांनाही ते पटत असेल असं वाटंत नाही)
पण जेव्हा आपण एखाद्या उदात्त कार्य करणाऱ्या नेत्याला देव बनवितो,तेव्हा आपण कर्मकांड अन भक्त सोबतंच जन्माला घालत असतो.त्यामुळे होतं असं की, त्या नेत्याची चिकीत्सा अन विकासाची प्रक्रियाही खुंटावंत जाते.
कुणी उणिवा सांगितल्या तरीही त्याला शत्रू समजल्या जातं.अन कायमचं दुर केल्या जातं.
असं काही जानकर साहेबांना देव बनविणार्यांनी केलं आहे.
 महाराष्ट्रातील 'मनीवाद' धोकादायक आहेच,पण म्हणून मनुवादाच्या कुशीत आधार शोधणारे भक्त.
 जानकर साहेबांना अभिप्रेत असलेल्या राष्ट्रीय समाज निर्मितीचे आधारस्तंभ होऊ शकत नाही.

माझ्या नजरेत महादेव जानकर हे धनगर समाजाचे रेनेसान्स हिरो आहेत.
त्यांनी धनगर समाजाला एकंदरीतच आपला पुर्व इतिहास काळ आठवून,वर्तमान जागृत केलं.
संघटित केलं.
2015 नंतर धनगर समाजांत निर्माण झालेल्या अनेक नव्या युवा नेतृत्वां मागे जानकरांचा प्रत्यक्ष -अप्रत्यक्षपणे सहभाग राहिलेला आहे.
त्यांचं धनगर समाजा मधे राजकीय अस्मिता जागृत करण्यासाठीचे योगदान,येणाऱ्या पिढ्या विसरणार नाहीत.
हे ही तितकेच खरे आहे.

सरते शेवटी..........
आज जानकर साहेबांचा वाढदिवंस आहे.
वाढदिवसाला गोड-धोड बोलायची,खाऊ घालायची शुभ परंपरा आपली आहे.
अन अशा पवित्र दिवशीच, मी उगांच उदोउदो करण्या ऐवजी  किंवा सामान्य परिस्थिती ते मंत्रीपद,लग्न न करणे,घर-संसार न करणे असं रंगविण्या ऐवजी दोन्ही बाजू समोर मांडल्यामुळे भक्तांना राग अन विरोधकांना आनंद होऊ शकतो.
पण ह्या बाजूंवर भावनिक राजकारण करण्याचा काळ जानकर साहेबांचा संपलेला आहे.

अन तसेही  शुभ-अशुभ किंवा मुहुर्त असं काहीही न मानणाऱ्या पठडीतले जानकर साहेब आहेत.
म्हणून वाढदिवसाला वर म्हटल्या प्रमाणे या फिनिक्सने अंगावरील सत्तेमुळे आलेली सहजपणाचं आवरण फेकून ,त्यांच्यातील खरा कार्यकर्ता जागा केला पाहिजेत.
अन संपूर्ण महाराष्ट्र पिंजून  राष्ट्रीय समाजाला पुन्हा उमेदीनं उभं केलं पाहिजेत.
 याच अपेक्षा अन याच शुभेच्छा ....

✍🏻सौरभ हटकर
खामगांव जि बुलढाणा.
9604079143 ,9325462499महादेव जानकर साहेब:- वाढदिवसा निमित्त माझ्या नजरेतून  विश्लेषण.

9604079143 ,9325462499

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता