आंबेडकर ,अमेरिका आणि आम्ही..... (जाॕर्ज फ्लाॕईड व कोरोनाच्या निमित्ताने)

जाॕर्ज फ्लाॕइड च्या
हत्ये विरोधात
अमेरिकेतील श्वेत-कृष्ण वर्णीय जनता सरकार व पोलिसांच्या विरोधात रस्त्यावर येते....
आंदोलन करत व्हाईट हाऊस पर्यंत जाते........

कोरोना पासून मृत्यू च्या  भीती पेक्षाही त्यांना, त्यांच्या मुलभूत हक्कांचे जिवंत राहणे अधिक महत्वाचं वाटतं.....
कोरोना पेक्षाही वंशभेद अधिक धोकादायक वाटतो...
म्हणून त्यांनी अन्याय झालेल्या व्यक्तीचा वंश न पाहता,व्यवस्थेच्या अन्याया विरोधात एकत्र आले.

म्हणून अमेरिकेतील लोकशाही अधिक प्रगल्भ आहे.
ती शासन व्यवस्था म्हणून नव्हे तर तेथील जनतेला व्यवस्थेच्या व अन्यही अन्याया विरोधात तिव्रतेने एकत्र आणते....

त्याचवेळी...
दुसरीकडे ,आपल्या देशांत आकस्मिक लाॕकडाऊन जाहिर होतं.
रस्त्यानी उपाशी  पोटी असणारी लोकं-लहान लेकरं-प्रेग्नंट स्त्रीया पायपीट करीत शेकडो किलोमिटर आपल्या गावी चालंत जात होत्या......
एक 14-15 वर्षाची ज्योती पासवान नावाची पोरगी 1200 कि.मी चा प्रवास, आपल्या बापाला घेऊन सायकल वर करते.

एक दीड वर्षाच्या लहान लेकराची माय रेल्वे platform वर मृत पडलेली असते,ते लेकरू त्याच्या माय ला उठविण्यासाठी धडपड करीत आई शेजारी भ्रमण करीत असतं.
त्या जिवाला वाटतं,आई झोपलेली आहे.
पण व्यवस्थेने त्याच्या आईचा खून केलेला असतो.

पाठीवर बांधलेल्या गाठोड्यातून वाळलेल्या भाकरी घेऊन ,घराकडे निघालेल्या मजूरांना चिरडुन रेल गाडी निघून जाते.

त्या रूळावर पडलेल्या ,त्या वाळलेल्या भाकरीच्या तुकड्यावर उडलेले रक्ताचे लाल थेंब या देशाच्या व्यवस्थेला काळे प्रश्न विचारंत होते.
त्यावेळेस या देशातील जनता 'ते फलाटावर' का झोपले? म्हणून  त्या मृत झालेल्या मुडद्यांना प्रश्न विचारंत होती.

तथाकथित  विकासाचे symbol असलेल्या   काळ्या डांबरी रस्त्यांना,आपल्या पायाच्या भेगातून सांडणार्या लाल रक्ताचा अभिषेक,पोटातील भूकेच्या पेटलेल्या आगीचा यज्ञ आणि तहानेने व्याकुळ होऊन गगन भेदी आरोळ्यांसाठी व्याकूळ असलेल्या त्या तमाम उन्हात आपल्या गावी निघालेले कामगार........आपल्या मुक वाणीतून व्यवस्थेचं नग्न रूप उघड करीत असतांना......
आपली जनता त्यांन  परप्रांतीय म्हणून हिनवत,'त्यांचं जाणं' हे संधी म्हणून बघंत होती...

अमेरिकेच्या भेदावर बोलणारी आमची जनता,कोरोनाच्या काळांत मात्र  धर्म भेदावर आली होती...

डाॕ.आंबेडकर आपण खरे होतात...
लोकशाही हे फक्त शासनाचं स्वरूप आहे.
खरी लोकशाही ही बंधुत्वाने उभारलेल्या एकनिष्ठ,लोकनिष्ठ समाजात असते.असं आपण म्हणत होतात.

कारण तरंच या देशातील भेद संपून,देश एकजूट होईल.
सर्व प्रकारच्या अन्याया विरोधांत एकत्र लढेल.
पण जर जाती,धर्माचे भेद जिवंत राहिले,तर या देशातील लोकशाही ही फक्त राज्य व्यवस्थेचा प्रकार म्हणूनच राहिल...
आणि त्याला आपण लोकशाही रूजली असं म्हणू शकणार नाहीत.
ही आपली मांडणी या काळांत अधिक प्रकर्षाने दिसंत आहे...

आज घडीला या देशांत राजकीय लोकशाही बळकट होत असतांना, लोकांमधे रूजलेली लोकशाही मात्र बाल्य अवस्थेतंच आहे.
कारण कुठलांही अन्याय होत असला,तर त्या विरोधांत एकत्र येतांना जाती,धर्माचे parameters  आम्ही  आधी तपासतो...
मग ठरवतो एक यायचं की नाही...
जे मुळातंच भेदाचं मुळ व अन्याय प्रचलित होण्यास कारणीभूत ठरतं.

:-सौरभ हटकर
खामगांव जि बुलढाणा
9604079143

Comments

  1. खूप सुंदर विवेचन सौरभ.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता