मत को मत होना बेईमान

                                                        " 'मत' को मत होना बेईमान" 
तुकडोजी महाराजांनी मतदानाचे महत्व विशद करताना म्हटल"मत हे दुधारी तलवार" मताचा आज जर योग्य वापर नाही केला तर ते ऊद्याच्या दिवशी आपल्या वरच ऊलटेल व मारक ठरेल।
 त्यामुळे मतदानकरने तर अगत्याचेच पण त्याहुनही महत्वाचे योग्य व्यक्तीला मतदान करने निकडिच। कारण आम्हाला परिवर्तनाची क्रांती करायची असेल,
 तर आम्हाला योग्य जनप्रतिनिधींना निवडुन देऊन जनसामान्याचा व देशाचा विकास करण्यासाठी आम्हाला 'जात,पात,धर्माला देऊया मुठमाती,
 नेते निवडुया ऊज्वल भविष्या साठी' हा मुलमंत्र ध्यानात घ्यावाच लागेल.
 डाॅ बाबासाहेबांनी आम्हाला जगातील सर्वात प्रभावशाली शस्त्र प्रदान केलेय।
 ज्याच्या माध्यमातुन आपन परिवर्तनाची रक्तविरहित क्रांती करू शकतो।
ते म्हणजेच मतदान.
आज आमची ओरड आहेच कि कुठे नेवुन ठेवलाय आमचा देश,महाराष्ट्र ...?वगैरे...वगैरे।
या गोष्टीचा विचार करता आमचा महाराष्ट्र प्रगतच झाला नाही.अस कोणी म्हणत असेल तर ते चुकीचेच पण हवा तेवढा विकास मात्र झाला नाही हे ही नाकारता येत नाही।
 सावकारी,गुंडगिरी,शेतकरी आत्महत्या,बेकारी,अस्वच्छता,युवकांसाठीचे ऊदासिन धोरण अशा अनेक गोष्टी महाराष्ट्रात आहेतच,
 त्यामुळे या सर्व गोष्टीचा विचार करून आम्हाला पक्षाच्या पलिकड जावुन मतदान करने गरजेचे.
आज आम्हाला अनेक पक्ष महापुरूषांचे नाव घेऊन व जाहिरातीतुन महापुरूषांचे आदर्श दाखवितात व अवाहन करतात कि आपले मत हे जणु महा पुरूषांना द्या।
मुळात अशा आमिशाला मतदारांनी मुळीच बळी पडु नये,
नाहीतर तुमची कानपिळी ठरलेलीच.
अहो जे अगदी कालपर्यंत एकमेकांच्या गळ्यात गळे घालुन युती-आघाडीचे रताळे खात होते.
त्यांनी आम्हाला मुळातच स्वाभिमान शिकवु नये.
शिवराय,बाबासाहेब,म.फुले यांच नाव घेणार्यांनो तुम्हाला ही नावे आत्ताच कशी सुचली..?बर सुचलीही असतील तर मग तुमची शिवजयंतीच्या वादावर काय भुमिका होती...? ,
गड किल्ल्यांसाठी तुम्ही किती योगदान दिल(भंपक भाषने सोडुन).
मातृतिर्थ सिंदखेडला 12 जाने ला, विजयादशमिला दिक्षाभुमिला,,अन पुणे विद्ध्यापिठाच्या नामकरणासाठी शासन दरबारी किती घासली( आपली राजकिय प्रतिष्ठा).
अशा अनेक प्रश्नाची ऊत्तरे संबंधितांनी तर द्यावीच पण मतदारांनीही जाब विचारूनच मतदान करावे.
 मग परिवर्तन हव अस आम्ही म्हणतो पन मतदानाला जायला कंटाळतो,
देश बिगड गया म्हणतो पन सुधरवयाची धमक ठेवत नाही.
मतदानाच्या दिवशी सुट्टी दिवस म्हणुन साजरा करनारेही कमी नाहीत।
 मग माझा देश सुधारेलतरी कसा त्या साठी मतदान करावे लागेल.
पण पैसे घेऊन नाही,ऊज्वल भविष्याची स्वप्न घेऊन.
आम्ही आमच अमुल्य मत अवमुल्यात विकल तर ,
आम्ही कायद्याच्या दृष्टीने गुन्हेगारच कारन "चंद पैसो के खातीर अपना जमिर बेचनेवाले, कल को अपना देश भी बेच सकते है।" आणि आपल मत विकत घेनारे आपला मतदार संघ विकतील कारन Investement फायद्यासाठीच केली जाते.
म्हणुन " अबकी बार,
  जागा हो मतदार, 
जातीपातीला सोडुन गाजव तुझा अधिकार..... 
नको घेऊ पैसे तु..... 
नको भाळु आश्वासनावर, 
कर्तव्याला जागुन तुझ्या, 
शिक्का मार मतदानावर..."

 ;-सौरभ हटकर। युवा वक्ते तथा विद्ध्यार्थी शासकिय अभि महाविद्ध्यालय चंद्रपुर 9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता