प्रेम आणि वास्तविकता

                                                                       "प्रेम आणि वास्तविकता...."
14 फेब म्हणजेच valentine day सर्व तरूणांच्या ऊत्कंटतेचा दिवस.
कारन या दिवशी कित्येक दिवसाच्या नवसाचे प्रत्यक्षात फलित होण्याच्या जास्त संधी असतात.
पण काही जण कदाचित संस्कृतीच्या नावाखाली विरोध करतात,त्यात तथ्थ्यही असु शकत पण पुर्ण सत्य नाही.
मुळात प्रेम म्हणजे काही ठरवुन होत नाही,किंवा केल्या जात नाही.
आणि एकदा प्रेम झाल्यावर त्याला विरोध करने किंवा दाबने हे मनोविकाराचे कारण ठरू शकत
व त्यास तरूण जुमानतही नाही म्हणुन कदाचित तरूण बदनाम झाला.
पन कधीतरी तरूणांना समजावुन घेण्याचे कष्ट कोणी झेतलेच नाही म्हणुन तरूण विध्वंसक झाला ,
आणि आता तो संस्कार,संस्कृती या गोष्टी हिन मानु लागला.
पण अजुनही गोष्ट पुर्णपने वाया जेली नाही.
तेव्हा प्रेम काय असत...?
ते बदनाम का झाल?
प्रेमभंग झालेल्यांची अवस्था? 
सस्कृतीच्या नावाखाली प्रेमाला भरडणे कितपत योग्य?
व तरूणांना काय हव?
कायद्याच्या दृष्टीने प्रेमाचे महत्व ?
मी एक 20 वर्षाचा तरूण तरूणांचे प्रतिनिधित्व करताना आपल्या समोर मांडतोय.
खरे तर प्रेम म्हणजे ऊत्कटता,ओढ,अनोळखी व्यक्ती बद्दल अपार जिव्हाळा,न राहवुन एखाद्या व्यक्ती,गोष्टी बद्दल हुरहुर वाटणे.अशा अनेक,अगणित शब्दांमध्ये प्रेम सांगता येईल.
पण प्रेम सांगणयाची नव्हे तर समजण्याची 'बात'आहे,
'भावना को समजा करो यार,हर बात लब्जो मे बया नही होती' हा यंगिस्तानचा फेमस डाॅयलाॅग.
त्यामुळे प्रेम समजण्यासाठी आपल्या तरूणपणातील 'वो दिन' आठवावेच लागतील.
अस बिनदास्त प्रेम करण्यासाठी  लागणार दिलदार काळीज आमच्या तरूणाकडे असण गर्वाची गोष्ट आहे.
प्रेमासाठी काहीही करायला,कोणाशीही 'खेटायला' तयारी असणारी ह्र्दयातील विशाल निर्भयता,तसेच प्रेम केल्यानंतर येनारा समजुतदार व विचारकरण्याचे सामर्थ्य कदाचित कोणतेच व्यक्तीमत्व विकास वाले क्लास आणु शकतील नाही म्हणुन प्रेम परिंद्याना थोडीशी मोकळीक द्या.
आता प्रेम बदनाम का झाल?  माझ्या शास.अभियांत्रिकी चंद्रपुर   काॅलेजच्या गॅदरिंग मधली मं.पाडगावकरांच्या स्टाईल मध्ये माझी कविता"प्रेम प्रेम असत,तुमच आमच सेम असत कोणाच unidirectional(एकतर्फी) तर कोणाच Bidirectional असत आणि कोनाकोनाचे तरmultidirectional असत।"अशा गोष्टीमुळे प्रेम बदनाम झाले.
आणि त्यात तो रॅपर गायक त्याने every day meri new love story म्हणुन तर पुर्ण प्रेमाचा रेपच केला.
म्हणुन प्रेमात धोके देने,किती प्रेयसी,प्रियकर आहेत या गोष्टी अभिमानास्पद वाटु लागल्या.
अशामुळे बलात्कार,विनयभंग, एकतर्फी प्रेमातुन हत्या किंवा आत्महत्या ई.काळीमा फासणार्या गोष्टी  घडाया लागल्या म्हणुनच प्रेमाला नविन ऊपाधी मिळाली....'लफड'. 
असो पण प्रेम बदनाम होन्यास तरूणांचही मोठ  योगदान आहे म्हणुन तरूणांना शिव्या मिळतात.
त्या गोष्टीच मी समर्थन करतो कारन कधी-कधी आमच्या तरूनांच खुपकाही चुकतच.
ते ऐकुन घेण्याच्या तयारित नसतात.
सर्वात महत्वाच म्हणजे प्रेमभंग या गोष्टीमुळेच अत्याचाराला भरपुर प्रमाणात खतपाणी मिळाले.
एखाद्या व्यक्तीने धोका दिल्यावर ज्या प्रकारे जखमी वाघ चवताळतो त्या प्रकारे तरूण/तरूणी त्या प्रेमभंगाच्या ज्वालेत जळत असतात.
अशा वेळी प्रतिशोधाची भावना वाढीस लागते व समोर त्याचे रूपांतरण आत्महत्या,'वो मेरी नही तो किसी और की नही 'या फिजुल स्वाभिमानाच्या पोटी अॅसिड ,चाकु हल्ला ई.रूपांतरण  होते.
परंतु प्रेमभंग झालेल्यांनो आपण सारे लकी आहात.
 कारण प्रेमभंगापोटी मोठे-मोठे कवि,लेखक,विचारवंत झाले.
कदाचित हे सर्व वर नमुद केल्याप्रमाने विचार करण्याच्या सामर्थ्यावरच झाले असावे.
तसेच प्रेमभंग झालेला काळ सदैव तळमळीचा,चिडचिडपणाचा,तसेच व्याकुळतेचा असल्याकारणाने जिवन जगण्याची मजा तर येतेच पण भविष्यात कोणत्याही संकटाशी लढण्याची हिम्मत मिळते.
म्हणुन भविष्यातील प्रतिभासंपन्न व्यक्ती बनण्यास तयार रहा आणि आयुष्या सोबत लढत रहा.
आता प्रश्न संस्कार,संस्कृती च्या नावावर विरोधाचा, तर पाश्चिमात्य संस्कृती आमच्या  संस्कृती पुढे शुल्लक आहे.
आमची  संस्कृती महान आहे.
हे सर्व तरणांना माहिती आहेच,पण प्रेमाबद्दल चा विचार केला तर पाश्चिमात्यांचे प्रेम कदाचित rose dayला  सुरू होऊनvalentine dayला बहरत असेल व kick dayला संपत असेल.पण आमची संस्कृती आम्हाला प्रेम हे एका जन्मासाठीच काय तर पुढील सात जन्मासाठी  सुद्धा मिळत राहवे एवढी निरागसता आम्हाला आमच्या संस्कृतीने प्रेमाबद्दल दिली आहे.
त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा तथा व्यक्तीचा विचार करून पाऊले ऊचलावित
पण प्रेमाच्या नावाखाली फसवणुक,छळकपट,बाटविण्याचे प्रकारही होत असतात म्हणुन संस्कृतीच्या नावाखाली      कदाचित प्रेमाला  विरोध केल्या जातो ही बाब समर्थनिय आहे।आणि अशा गोष्टी निषेधार्थच आहेत.
जेव्हा कायद्याच्या दृष्टीने विचार केला जातो तेव्हा समाजात जे काही लग्नानंतरचे तलाक होत आहे.
 त्यांची संख्या झपाट्याने वाढतच आहे.
त्याला बहुतेक कारने जोडीदार समजुन घेत नाही,स्वभाव पटत नाही,आवडी निवडी जुळत नाही अशा प्रकारचे कारनांची संख्या जास्त आहे .
ह्या सर्व गोष्टी मनासारखा साथीदार किंवा जबरदस्ती लग्न यामुळे घडतात त्यामुळे लग्नाअगोदर एकमेकास समजने गरजेचे असते असे म्हणतात. आणि बळजबरीने लग्न लावने हा त्या व्यक्तीवर 'समाजमान्य माणसिक बलात्कारच' होय.
तसेच प्रेम हे जात,पंथ,धर्म या पलिकडे असते त्यामुळे आंतरजातीय लग्न तसेच जातीयवाद कमी होण्यास हातभार लागु शकतो.
असा तरूणांचा समज आहे तो कितपत योग्य तो वाचकांनी ठरवावा.
सरते शेवटी तरूणांना परिवर्तन हवेच पण त्यांना समजुन त्यांच्या माध्यमातुन सांगितलेच तर आम्ही खरेच ऐकतो हो.
पण आम्हा दमदाटी करून दडपणात आणल्या जात पण शेवटी दाबलेला स्प्रिंग ऊडणारच ना.
म्हणुन तरूणांना समजावुन सांगा,समजुन घ्या 
त्यांना जेष्टांच्या मार्गदर्शनाची गरज आहे.
कारन हा देश तरूणांचा त्याचा वापर देश परिवर्तनासाठी होऊ शकतो.
पण त्यांना समजुन घेतल्यावर।
आणि तरूणांना विनंती ऐकणे शिका,आदर देणे शिका,प्रेम करण शिका पण आयुष्याचे सर्वस्व प्रेयसी/प्रियकराचे प्रेम नाही तर त्याहुन महत्वाचे जन्मदाते ,घडविनारा समाज,तथा सर्वात महत्वाचे देशप्रेम या सर्व गोष्टींचा विचार करून सर्व घटकांवर समान तथा आतोनात प्रेम करा..........
आयुष्यात यशस्वी व्हा।
" आयुष्य छान आहे थोडे लहान आहे !
रडतोस काय वेड्या.? लढण्यात शान आहे.!
काट्यातही फुलांची झुलती कमान आहे !
उचलून घे हवे ते , दुनिया दुकान आहे !
जगणे निरर्थक म्हणतो तो बेइमान आहे."
..........-सुरेश भट
आयुष्य अनमोल व अमुल्य आहे,

त्यामुळे या जिवनावर ,या जगण्यावर शतदा प्रेम करा

      :सौरभ गोपाळ हटकर
      :हिवरखेड ता. खामगाव जि.मातृतिर्थ बुलढाणा।
9423749805,9604079143
www.saurabhhatkar.blogspot.com
14 feb 2015(published in janninad newspaper)

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता