सगळेच कसे नेते झाले......

      "सगळेच कसे नेते झाले....."
सगळेच कसे नेते झाले।
कार्यकर्ते कसे होतील।।
सत्ता ,प्रसिद्धीच्या मोही सारे।
'एकनिष्ट' कसे राहतील।।
कसे मिळतील येथे स्वामिनिष्ठ बाजी.......तानाजी।
अहो खुर्चीसाठी लढले होते का कधी शिवाजी......?।।
निवडुण आलेलेच....होतात कार्यकर्त्यांचे 'भाऊ'।
आणि 'का नाही होतील' कारण मिळतो येथे :त्यांन्नाच' योजणांचा खाऊ।।
आपण सारेच 'जाती साठी माती' खाऊ 'तो' कसाही असो आपल्या :'जातीचाच' आहेना म्हणुन त्यालाच निवडुण देऊ। जाहिरनाम्यातील शब्दही सारेच चोपले। आश्वासने द्यायला 'बहुतेक' कसे शिकले कार्यकर्ते कसे होतील सगळेच कसे नेते झाले।।
जय जिजाऊ।
जय शिवाराय।।
:सौरभ गोपाळ हटकर
:हिवरखेड ता .खामगाव जि.मातृतिर्थ बुलढाणा
9604079143,9423749805

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता