नवनिर्मितीची चाहुल झाली कि पानगळ सुरु होते,
त्या पर्णगळतीच्या काळात ज्या प्रमाने जुण्या पर्णांचा चिकटुन राहण्याचा आग्रह,
हा अमान्य असतो, अनैसर्गिक असतो.
त्याप्रमानेच जिवणात आलेली दु:ख वेदना,ह्यांनाही चिकटुन राहने अनैसर्गिक ,अमान्यच असाव.
शोक जिवनात असावाच पण शोकाचा कायम धाक मणी नसावा.
कधी कधी एखादी गोष्ट,व्यक्ती मिळत नाही, मग मानसाला switch होता आलं पाहिजे.
कारण कदाचित जुन्या पानांपेक्षा नविन येनारी पानं अधिक सुंदर,अधिक रम्यतेची असतील.

असाच संदेश घेऊन नविन वर्षाची सुरुवात नव ऊगविनार्या अंकुरा प्रमानेच लुसलुशीत आणि जिवंत व्हावी
ईतकिच अपेक्षा.
मागे वळुन बघतांना,
 मागील वर्षाने हर्षाने बरेच काही दिले.
मानस जोडनें,विचार आणि प्रबोधन  वाटण्याची संधी दिली.

येत्नार्या वर्षात मि कुठला कट्टरवाद जोपासल्या पेक्षा त्या नवं पानासारखं स्वच्छंद राहिल.
मग त्याला संकल्पाचे कुंपणही नसनार.
:-सौरभ हटकर

_________________________
saurabhhatkar.blogspot.com
________________________

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता