~~घडव नवा ईतिहास तु~~
(महिलादिन विशेष)



अन्यायाशी आपल्या,
असा कर करार तु....
हाती विचारांची तलवार घेऊन....
असा कर एल्गार तु...
झुकलेच पाहिजे तुला,
अबला म्हणनारे..
अशी कर कर्तृत्वाची,
ललकार तु..........
जिजाऊची नात ......
ज्योती-सावित्रीची वात तु.....
प्रकाशित करून टाक समाज सारा.
कुळ ऊद्धारक स्त्रीत्वाची जात तु....

तुझ्या मुळे स्वराज्य.........
तुझ्या मुळे छत्रपती........
तुझेच ते प्रेरनेचे स्त्रोत.........
ज्या मुळे लढले घटनापती........
भक्तीची जगदंबा..........
अन
शक्तीची भवानी...........तु
या स्वातंत्र्यमय भारतात
गुलामिची 'कहाणी' तु....
भिऊ नकोस तरी ...........
लढायला तयार रहा...........
माता अहिल्या ची प्रेरणा.......घे
अन नवा घडव
ईतिहास तु...
शौर्याची शिखरे गाठशील फार तु......
प्रत्येक आव्हानाला करशील पार तु......
धान्यात ईतकेच राहु दे.. .....
ज्योतीविन सावित्री कधीच घडत नाही....
म्हणुन तुझ्या ज्योतिबाचाही नेहमीच सन्मान कर तु.........
संघर्षाची पंख लाव ,
अन
घडव नवा ईतिहास तु... .



:सौरभ गोपाळ हटकर
मु पो हिवरखेड ता खामगाव
जि बुलढाणा
9604079143
9423749805
Www.saurabhhatkar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

संविधानिक नैतिकता