बा'च सर्वेक्षण

'

बागायत वाटली
तरी जिंदगी पडित आहे.....
रूबाबात फिरती नेते
बाप अडगळीत आहे....
काय मागणं मागू तूला सांग सांता...?
भकास 'बा' ची दुरडी,
अन सजलेली तिरडी आहे......
जात नसतो मी दर्शनाला, कुठल्याच देवस्थानाला.....
बाप माझा साई,अन वावर शिर्डी आहे...

भागविण्यास भूक जगाची बाप झुरतो मग मरतो....
ढेकर देताच 'इंडीयाने',मग कळतं बाप पुरूनही उरतो......
त्याच्या वाट्याचा हा अवमान टळाला पाहिजे...
त्याचेही व्हावे एखादे  सर्वेक्षण, अन त्यालाही सन्मान मिळाला पाहिजेत...
✍🏻सौरभ हटकर
खामगांव जि बुलढाणा9604079143
saurabhhatkar.blogspot.com

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .