विश्वरत्न राष्ट्रसंत:तुकडोजी महाराज।

विश्वरत्न,मानवतावादी राष्ट्रसंत:वंदनिय तुकडोजी महाराज।
मानसाला मानवता देणारे राष्ट्रसंत।
विश्वाला शांतीचा मार्ग दाखविणारे राष्ट्रसंत।
सैन्याला धैर्य,
तर जनतेला देशक्रांतीसाठी मनोधैर्य देणारे राष्ट्रसंत।
मानव का धर्म क्या है?म्हणुन कट्टरवादाला धुडकाविणारे,
तर या भारतात बंधुभाव नित्य वसु दे गाऊन एकात्मता जोपासणारे राष्ट्रसंत।
'हर हर बोलाना' ची गर्जना ठोकत मावळ्यांना पेटविणारे,
तर 'बसलास कशाला आळशी बनायला' विचारून तरूणांना जागृत करणारे राष्ट्रसंत।
"झाड झडुले शस्र बनेंगे भक्त बनेगी सेना।पत्थर सारे बाम्ब बनेंगे" ची ललकारी ठोकत देशक्रांतीची मशाल पेटवणारे ,
तर बिगडे हूए शासनाला खंजरी  च्या माध्यमातुन झलकारी देणारे राष्ट्रसंत।
"मेरे प्यारे सुंदर भारत "पर ज्याचि नजर पडेल त्याला कापरे भरविनारे ,
तर घडु दे प्रभु एवढे घडु दे म्हणुन भारताला घडविनारे राष्ट्रसंत।
तुझ्या श्रमास प्रतिष्टा मिळो सांगुन ग्रामनाथ शेतकर्यास तारनारे,
तथा अंधश्रद्धेच्या मनक्यावर घाला घालणारे राष्ट्रसंत।
आज विश्ववंदनिय तुकडोजि महाराजांचे विचार आत्मसात  करण्याची गरज ईथल्या प्रत्येक व्यक्ती सहित देशाला आहे।
या हिंदु -मुसलमानाच्या दंगली,
हे बिगडलेले जनतेचे ब्रिद, आणि नेत्यांच्या ऊदासिनते पायी रखडलेला  भारताचा विकास.
या सार्या गोष्टीचा विचार करता तुकडोजींच्या ग्रामगितेचे महत्व लक्षात येते।
महिलांना ज्या मनुस्मृतीने तुच्छ समजले त्या महिलांना 'जगाची ऊद्धारकर्ती' म्हणुन राष्ट्रसंतांनी ग्रामगितेत मानाचे स्थान दिले.
आज माय बापाला घराच्या बाहेर लाथा मारून हाकलणार्यां अवलादिंची कमी नाही.
व्यसनात पार 'टंगी' होणार्यांची संख्या ही जंगी आहे.
अशा स्थितित भारताचे व समाजाचे ऊज्वल भविष्य ज्याच्या खांद्यावर आहे तो तरूण धोक्यात आहे.
पण हेच जर वेळिच थांबवुन रोखायचे असेल  तर मेंदुला गुलाम करविणार्या पोथ्यांऐवजी ग्रामगितेचे  पारायन करने आवश्यक आहे.
कारन संस्कारांची ताकदच कोणालाही शिवाजी घडवु  शकते.
आणि सध्यस्थितिचे जाज्वल्य व निर्मळ संस्कार ग्रामगितेत आहे.
बाळाला गर्भापासुन तर मरेपर्यंत येवढेच काय तर जाळेपर्यंत चे संस्कार ग्रामगितेत आहेत।
समाजात कस वागाव,बोलाव,रहाव याचे सारे सार ग्रामगितेत आहे।
स्वावलंबनाचे 'सुत्र' व जनमानसाच्या वैचारिक क्रांतीचे 'पत्र' ग्रामगितेत आहे।
अंधश्रद्धेला ठोकणारे पण मनशांती करून मण जोडणारे आध्यात्म ग्रामगितेत आहे।
देशाचा विकास घडवायचा असेल तर गावाचा विकास करणे गरजेचे कारण 'तुझ गावच नाही का तिर्थ 'सांगत ग्रामनाथाला जागृत करन्याचे,तथा स्वताचे स्वत्वाचे बळकडु ग्रामगितेत आहे।
आणखि काय काय लिहु कारण तुकडोजी खुदः म्हणतात" मै शब्द कि खैरात हु" या महान व्यक्तीमत्वाच्या कार्याला माझ्या शब्दात मांडण्याची माझि औकातच नाही। म्हणुन शेवटी येवढेच लिहितो कि या भारत देशाने स्वतासाठी खेळणार्या सचिन तेंडुलकरला भारतरत्न दिला त्या बद्दल काही आक्षेप नाही।
पण ज्या तुकडोजींनी जनसामान्याच्या ऊद्धाराकरिता आपल्या  आयुष्यभर स्वताच्या आयुष्याशी खेळत राहिले त्या विश्वरत्नास भारतरत्न देण्याचे मात्र टाळले ही दुर्दैवीच गोष्ट आहे।
"तुकडोजिंच्या समाधिकडे वाईट नजरेने बघणार्यांनो गुरूदेवाचे अनुयायी माफ करणार नाही".
कारण तुकडोजिंचे संस्कार नुसतेच खंजेरी,तबला किवा टाळ वाजविण्याचेच सामर्थ देत नाही तर रस्ता चुकलेल्यांचे टाळके जाग्यावर आणण्याची ताकदही देते.

तुकडोजिंच्या जयंती निमित्य म्हणजेच ग्रामजयंतिच्या पर्वावर या विश्वरत्नास भारतरत्न मिळावे एवढिच तमाम गुरूदेव सेवकांची  अपेक्षा।
या विश्वरत्न,विश्ववंदनिय,मानवतेचे संत राष्ट्रसंतांच्या चरणी ग्रामजयंती निमित्त विनम्र अभिवादन।
जय गुरू।
:सौरभ गोपाळ हटकर।
हिवरखेड ता.खामगाव जि मातृतिर्थ बुलढाणा।
:9604079143


Comments

  1. आपल्या मुलासारखी सर्व मुले ! होवोत ऐसे मनी आणले !
    त्याच्या जोपासनेचे व्रत घेतले ! तोची विरागी म्हणावा !!
    जो दुसर्यासी उत्तम करितो ! त्यातची आनंद मानतो !!
    तोच सेवक मी समजतो ! येत्या युगाचा !! - ग्रामगीता ..........

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद सोमेशजी...आपली प्रतिक्रिया उशिरा वाचली....बद्धल दिलगिरी....जय गुरू...

      Delete
  2. धन्यवाद सोमेशजी...आपली प्रतिक्रिया उशिरा वाचली....बद्धल दिलगिरी....जय गुरू...

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...