म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .
10 मे 2023 रोजी प्रकाशित चित्रपट रिव्ह्यू. अमर देवकर लिखित आणि दिग्दर्शित ' म्होरक्या ' हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला असून, नुकताच अमेझॉन प्राईम या OTT platform वर उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट बघितला , पण कॉलेज कामानिमित्त त्यावर लिहू शकलो नाही. सध्या निवांत असल्यामुळे पुन्हा एकदा चित्रपट बघून , मेंढपाळपुत्राच्या नजरेतून हे विश्लेषण लिहीत आहे. म्होरक्या हा चित्रपट जरी आश्या(मेंढपाळ मुलगा ) आणि त्याचे शिक्षण या मेंढपाळ पुत्राच्या संघर्षा भोवती फिरत असला तरीही तो तितकाच मर्यादित नाही ,ज्या समाजातून मी येतो, त्या मेंढपाळ धनगर समाजाचा विविध पातळीवरचा संघर्ष चित्रपटाने दाखविलेला आहे. चित्रपटाची सुरुवात, अशोक नावाच्या मेंढपाळ पोरांना शाळेत घेउन जाण्याच्या सिन पासून होतें. कुठल्यातरी माळ रानावर अशोक आपल्या मेंढरे आणि गोमतर आबा सोबत चारत असतो. तिथे त्याच्या शाळेतील मुले शोधत येऊन, जबरदस्तीने अशोक ला शाळेत घेउन जातात. शाळेत जातांना, अशोक सोबत कॅटरीना ला सुद्धा घेउन जातो. कॅटरीना म्हणजे अशोक ची लाडकी मेंढी... मिंढ्या मागे असल्या कारणाने, अशोक...