Posts

Showing posts from 2024

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .

Image
  10 मे 2023 रोजी प्रकाशित चित्रपट रिव्ह्यू. अमर देवकर लिखित आणि दिग्दर्शित ' म्होरक्या ' हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला असून, नुकताच अमेझॉन प्राईम या OTT platform वर उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वीच चित्रपट बघितला , पण कॉलेज कामानिमित्त त्यावर लिहू शकलो नाही. सध्या निवांत असल्यामुळे पुन्हा एकदा चित्रपट बघून ,  मेंढपाळपुत्राच्या नजरेतून हे विश्लेषण  लिहीत आहे.  म्होरक्या हा चित्रपट जरी आश्या(मेंढपाळ मुलगा ) आणि त्याचे शिक्षण या मेंढपाळ पुत्राच्या संघर्षा भोवती  फिरत असला तरीही तो तितकाच मर्यादित नाही ,ज्या समाजातून मी येतो, त्या मेंढपाळ धनगर  समाजाचा विविध पातळीवरचा संघर्ष चित्रपटाने दाखविलेला आहे. चित्रपटाची सुरुवात, अशोक नावाच्या मेंढपाळ पोरांना शाळेत घेउन जाण्याच्या सिन पासून होतें. कुठल्यातरी माळ रानावर अशोक आपल्या मेंढरे आणि गोमतर आबा सोबत चारत असतो. तिथे त्याच्या शाळेतील मुले शोधत येऊन, जबरदस्तीने अशोक ला शाळेत घेउन जातात. शाळेत जातांना, अशोक सोबत कॅटरीना ला सुद्धा घेउन जातो. कॅटरीना म्हणजे अशोक ची लाडकी मेंढी... मिंढ्या मागे असल्या कारणाने, अशोक...

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

  महादेव जानकर यांना महायुती ने एक जागा सोडून, आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. या निमित्ताने जानकर यांचा प्रभाव संपला अशी धारणा असणाऱ्या अनेकांना, आणि ही धारणा पक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप ला सुद्धा महादेव जाणकार यांनी आपले उपद्रव मुल्य दाखवून दिले आहे . वरकरणी ही एक जागा वाटत असली तरी या गोष्टीला अनेक अंग आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये संक्षिप्त स्वरूपात जानकर यांचा राजकीय उगम, त्यांचे उपद्रव मूल्य, त्यांचा विजनवास आणि आता त्यांचे कमबॅक या सर्व गोष्टी  समजावून घेवूयात. कांशीराम यांच्या विचारधारेने प्रभावित असलेले  जानकर जरी 2014 आधी पासून, राजकारणात सक्रिय असले. तरी 2014 ला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जानकर माहिती झाले. त्याचे कारण म्हणजे धनगर आरक्षणासाठी पेटवलेली ज्योत आणि बारामती लोकसभा मध्ये त्यांनी दिलेली जबरदस्त झुंज. 2014 मध्ये सुद्धा जानकर  यांची माढा मधून लढण्याची इच्छा असताना सुध्दा ऐनवेळी बारामती मध्ये त्यांचा मैत्रिपूर्वक गेम केला गेला. पुढे धनगर आरक्षण हा मुद्दा गौ...