Posts

Showing posts with the label #pastoral#dhangar

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

  महादेव जानकर यांना महायुती ने एक जागा सोडून, आपल्याकडे वळविण्यात यश मिळवले आहे. या निमित्ताने जानकर यांचा प्रभाव संपला अशी धारणा असणाऱ्या अनेकांना, आणि ही धारणा पक्की करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भाजप ला सुद्धा महादेव जाणकार यांनी आपले उपद्रव मुल्य दाखवून दिले आहे . वरकरणी ही एक जागा वाटत असली तरी या गोष्टीला अनेक अंग आहेत हे समजून घेणे गरजेचे आहे. या लेखाच्या माध्यमातून आपण ते समजून घेण्याचा प्रयत्न करू. यामध्ये संक्षिप्त स्वरूपात जानकर यांचा राजकीय उगम, त्यांचे उपद्रव मूल्य, त्यांचा विजनवास आणि आता त्यांचे कमबॅक या सर्व गोष्टी  समजावून घेवूयात. कांशीराम यांच्या विचारधारेने प्रभावित असलेले  जानकर जरी 2014 आधी पासून, राजकारणात सक्रिय असले. तरी 2014 ला खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात जानकर माहिती झाले. त्याचे कारण म्हणजे धनगर आरक्षणासाठी पेटवलेली ज्योत आणि बारामती लोकसभा मध्ये त्यांनी दिलेली जबरदस्त झुंज. 2014 मध्ये सुद्धा जानकर  यांची माढा मधून लढण्याची इच्छा असताना सुध्दा ऐनवेळी बारामती मध्ये त्यांचा मैत्रिपूर्वक गेम केला गेला. पुढे धनगर आरक्षण हा मुद्दा गौ...

गोड उसाच्या कडूवट कहाण्या (प्रवास वर्णन- यवत ता दौंड जिल्हा पुणे परिसर)

Image
20 nov ला सायंकाळी मला सागर टेळे या मित्राचा फोन आला. सागर हा Delhi मधे सध्या upsc ची तयारी करतोय. आमची या पूर्वी कधी भेट झाली नव्हती. एक दोन वेळेस फोन वर बोलणे झाले. पण त्याने आम्हीं मेंढपाळ समूहाच्या दृष्टिने जे कार्य करीत आहे. त्याला तो जाणून होता. म्हणूनच त्याने यवत जवळ जोगेश्वरी सिद्धनायक यांच्या जत्रेला येण्याचे निमंत्रण धाडले. मित्राची Platina घेऊन मी सकाळीच यवत च्या दिशेने निघालो.  यवत हे पुणे सोलापूर  राष्ट्रीय महामार्ग 65 वर वसलेले गाव आहे.  तसे बघितल्यास हा भाग प्रचंड संपत्ती आणि समृद्धी चा दिसतो. रस्त्याने जात असताना सगळीकडे दिसणारी हिरवळ (  शेतातील म्हणतोय) मन प्रसन्न करणारी आहे. या महामार्गावर मोठया प्रमाणात फुलांच्या नर्सरी दिसल्या.  त्या नर्सरी  मधील विविध रंग बेरंगी फुले डोळ्यांना आनंद देतात.  यवत ला पोहोचल्यावर आत मध्ये २-३. किलोमिटर वर तांबेवाडी गांव आहे. त्या गावात शिरताना सगळीकडे दिसणारे उसाचे मळे, त्या भागातील समृद्धीची साक्ष देतात. ऊस आणि त्याला अनुषंगाने असणारे कारखाने हे तेथील शेतकऱ्यांच्या संपन्नतेचे  मुख्य कारण आहे. ऊस त...