स्वच्छ सर्वेक्षण ..2018

स्वप्न जुळलेली होती स्वच्छ अन सुंदर भविष्याची...
त्या स्वप्नांचं क्षणात विघटन झालं....
काय वाटत असेल त्यांना.....??

केला साफ कचरा ज्यांनी....
अन त्यांनाच कचर्यासारखं झाडून बाजूला केलं...
काय वाटत असंल त्यांना....??

शेकडो GVP transform केले ज्यांनी....
आता त्या सर्वांचाच 'सुशिक्षित'GVP होणार ....
काय वाटत असंल त्यांना....??

या देशात
कचर्याचं देखील सर्वेक्षण होतं...
प्रक्रियेसाठी...पुनर्वापरासाठी...
चांगलीच गोष्ट आहे.....
पण बेरोजागरांच कधी होणार...
या  देशाच्या भवितव्यासाठी..??
असा विचार येत असेल ज्यांना..
काय वाटत असेल त्यांना...

असेच जर DUMP जाहलो तर सडू....
जात,धर्म,प्रांत ,झेंडे,दांडे यात अडकून पडू.....
जमलं तर करा ....
विचार वरील बाबींचा....
देशासाठी आम्ही योगदान देऊन घडू...
असा विचार आला ज्यांना
कसं वाटत असंल त्यांना..

असेल विचार काहींचा बंडाचाही या विरोधात....
पण ध्यानात ठेवा  यारहो...
काहीच वाटणार नाही त्यांना......

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .