Posts

गृहितके मोडली पाहिजेत*

(लेख जूना आहे,पण विधान परिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा  लागू पडतो. नुसता वाचू नका,समजून घ्या....) ✍🏻सौरभ हटकर. एखादा  समूह संघटित नसतो ,त्याला त्याच्या प्रश्नाची जाणिव नसते.  त्याच्या वर होणाऱ्या अत्यंत अत्याचाराला तो नियतीचाच भाग समजायला लागतो. आपले हक्क ,न्याय या बाबत तो समूह पूर्णपणे अवगत नसतोच. अशावेळी त्या समाजावर व्यवस्था अन्याय करायला लागते. या  संपूर्ण अन्यायाला   त्या   समुहाचे  शैक्षणिक ,राजकीय ,सामाजिक,आर्थिक मागासलेपणंच जबाबदार असते.  अशावेळी प्रवाहाबाहेरील  त्या समुहाला मुख्य प्रवाहात आणण्याचे कार्य  वेलफेयर म्हणवून घेणाऱ्या राज्य संस्थेस करावयाचे असते. परंतू,तसं करने खडतर व जोखिमीचे ठरते. कारण उपेक्षित समुहाचे सक्षमीकरण केल्यास,उद्या तो  समाज आपला वाटा मागण्यासाठी उभा राहिला तर त्या समाजाला आतापर्यंत  गृहीत धरून व्यवस्था आपल्या मांडीखाली  सतत ठेवन्याची सवय झालेल्या  प्रस्थापित  वर्गाला त्याचा धक्का  बसू शकतो.  म्हणून प्रस्थापित व्यवस्थे विरुद्ध उपेक्षित समुहात असंतोष निर्माण होऊ...

लाॕकडाऊन डायरी-1* अन्यथा..... मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे

अन्यथा.....   मरण त्यांची पाऊलो पावली वाट पाहत आहे.* मुद्धा फक्त पालघर घटने पुरता मर्यादित ठेऊन चालणार नाही. ही कदाचित भयानक सुरूवात असु शकते...... काही दिवसांपुर्वीची घटना आहे.... माझ्या गावाजवळ औरंगाबाद वरून येणारा एक ट्रक य बंद पडला...... गुजरात मधील ते व्यापारी होते. औरंगाबाद वरून पुन्हा त्यांना हिंगोली ला जायचं होतं. रस्ता चुकुन ते आले होते. त्या ट्रकचा ड्रायव्हर अन एक सोबती दोघंही मुस्लिम होते. ट्रकला धक्का मारून चालू करायची गरज होती. दोघांकडुनही तशा प्रकारे  भरलेला ट्रक चालू करणे शक्य नव्हतं.... म्हणून रस्त्यावर येणाऱ्या जाणाऱ्या तुरळक लोकांकडे ते मदत मागंत होते. तबलिगी प्रकरणानंतर...निर्माण झालेल्या साशंकतेच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या जवळही कोणी जायला तयार नव्हते.... कित्येकांना हात दाखवू दाखवून थकलेल्या त्या दोघांनी ... ट्रक ला धक्का मारण्यासाठी कित्येकांना विनंतीही केली..... नुसता धक्का मारण्यासाठी 2 हजार रूपये देण्याची तयारीही त्यांनी दाखविली होती.... तरीही दिवस भर त्यांना कोणीही मदतीचा हात सुद्धा दिला नाही. कोरोनाचं भय,मुस्लिमांप्रती निर्माण केलेल्या संशयाच्या...

महादेव जानकर साहेब:- वाढदिवसा निमित्त माझ्या नजरेतून विश्लेषण.

Image
✍🏻सौरभ हटकर (टिप:- मी जानकर साहेबांचा भक्तही नाही अन विरोधक सुद्धा नाही. म्हणून पुर्ण पोष्ट वाचल्याशिवांय react व्हायची घाई करू नये) 2012-13 चं साल असावं बहूदा,मी आयुष्यात पहिल्यांदा पुण्यात C&C++ चे क्लासेस साठी गेलो होतो. नल स्टाॕप असलेल्या सिड इन्फोटेक मधे मी    तेव्हा क्लास लावला होता. उरलेल्या वेळांत थोडेफार पुणेही फिरून यायचो. तेव्हा पुण्यातील वेगवेगळ्या ठिकाणी आयुष्यात पहिल्यांदा हातात तलवार घेऊन,घोड्यावर स्वार या भूमिकेत अहिल्यामातेची बॕनर्स दिसलीं होती. 31 मे अहिल्यामाता जयंती निमित्ताने ती लावलेली होती. रासपच्या झेंड्याच्या रंगाचे background  त्याला असायचं. त्यावर बहुजनह्रदय सम्राट महादेव जानकर हे नाव फोटो सहित छापलेलंही दिसायचं. ते बघून पहिल्यांदा महादेव जानकर या नावा बद्धल कुतूहल निर्माण झालं होतं. वालचंद सांगली येथून अभियांत्रिकीचा Diploma ते विनालग्नाचे समाजकार्य हे कुठल्याही काळातील तरूणांसाठी आकर्षणाचे पैलू जानकरांच्या व्यक्तीमत्वात आढळले होते. मेंढपाळ असल्यामुळे जानकरांसोबत  ओळख नसतांनाही, एक अपरिचीत,विना नोंदणी कार्यकर्त्याचं नातं तयार झालं होत...

'अनहायजेनिक' गावाचं हायजेनिक प्रेम.

Image
(कथा पुर्ण वाचली पाहिजेतंच) खरंतर सुमन ला गावाकडच्या सासर ला जायचा कंटाळाच यायचा.... उन्ह्याळ्याची सुट्टी लागली की पहिली धडधड सुमनला वाटायची,ती याचीच की आता गावाकडे जायचंय....... तीची चिडचिड अजय ला स्पष्ट जाणवायची..... तरीही अजय तिच्या बोलण्याला फारसा गंभीरतेने न घेता एक दोन दिवसांकरीता का होईना....लेकरांनासोबत घेऊन गावांत जायचा. अजय सुमनचा नवरा....दोघेही एकाच कंपनीत नौकरीला होते....तिथे दोघांचं प्रेम आणि प्रेमाचं नंतर लग्नात रूपांतर झालं. अजय ग्रामिण भागातला होतकरू तरूण होता.... त्याने शिवार-वावारापासून आपला प्रवास हिंजेवाडीच्या चकचकीत इमारती पर्यंत केला होता. तर सुमन ही सावळी पण प्रसन्न रूपाची होती. तिचं  स्वतंत्र व्यक्तीमत्वाने अजय ला भुरळ घातली होती. तीच्या निर्णय क्षमतेचा तो दिवाणा होता, तर अजय च्या नम्रतेने ती दिवाणी झाली होती. तुलनेने सुमन शहरी असल्याने तिला गावगाडा फारसा कधी रमणीय वाटला नाही. अगदी तिच्याच शब्दात गावगाडा तीला प्रचंड अनहाईजेनिक  वाटायचा. म्हणून सुट्ट्या आल्या की ,सुमन ला चिंता वाटायची.ती तिच्या लेकराच्या म्हणजे राहूल च्या आरोग्याची. ...

CAA-NRC:-संभ्रम,संशय,भीती. सर्वंकष .

Image
सिटीझनशीप अँमेन्डेमेंट ऍक्ट  (CAA) मुळे देशभरात संमिश्र प्रतिक्रिया बघायला मिळत आहेत. भारतीय राजधानी असलेल्या दिल्ली मधे या आन्दोलनाने उग्र रूप धारण केलेले असून ,पाहता पाहता या आंदोलनाची धग संपूर्ण देशभर पसरलेली आहे . महाराष्ट्रातील पुणे, मुंबई, सोलापुर मराठवाड्यातील काही भागामधे सुद्धा CAA बाबत आंदोलने झाले आहेत सोबतच अन्य ठिकाणी सुद्धा  होत आहेत. काही काही ठिकाणी आंदोलनाने हिंसक रूप धारण केले,कुठे विद्यार्थ्यांनी हिंसक आंदोलने केली तर कुठे पोलिसांकडून सुद्धा हिंसा झालेली फुटेज बघायला मिळत आहेत .कुठल्याही आंदोलनांमधे हिंसा होणे ,समर्थनीय नसून ,त्यामुळे आंदोलनाची धार च बोथट होत असते . social media वर सुद्धा प्रो कायदा -कायद्याच्या विरुद्ध बाजू  ताकदीने   मांडल्या जात आहेत . यात कायद्याच्या बाजूने आणि विरोधात निघालेल्या अनेक मोर्च्यांमध्ये  दोन्हीही   बाजूच्या लोकांना ,काही पत्रकारांनी caa बाबत प्रश्न विचारले असता ,त्यांना CAA म्हणजे काय आणि कोणत्या कारणासाठी विरोध करत आहात??कोणत्या कारणासाठी समर्थन करीत आहात  ? हेही स...

लोडशेडींग आणि गावगाडा....

पुर्वी.... गावामधे भारनियमन असायचे...गावात कोणी त्याला लोडशेडिंग तर कोणी लोडशिटींग म्हणतात ... साधारणतः 6-6 तासाचे लोडशेडिंग तेव्हा  असायचं... सायंकाळी 5-6 दरम्यान लाईन जायची तर थ...

'दीन' अभियंता.

भारतरत्न सर  मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.visvesvaraya). यांच्या स्मरणार्थ 15  sept हा त्यांचा जन्मदिवस  अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो. विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते...