'दीन' अभियंता.
भारतरत्न सर मोक्षगुंदम विश्वेश्वर्या (sir m.visvesvaraya).
यांच्या स्मरणार्थ 15 sept हा त्यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून भारतभरामध्ये साजरा होतो.
विश्वेश्वर्या हे स्थापत्य अभियंते होते,त्यांची विशेष ओळख ही त्यांच्या संशोधनात्मक dam construction&water irrigation च्या निर्माण केलेल्या प्रणाली बद्धल आहे.
त्यांच्या संशोधनामुळे मोठ्या प्रमाणात वाया जाणारे पाणी वाचले आणि त्याचा परीणाम सभोवातालच्या परीसरातील लोकांची तहान भागवून ,शेती सिंचनासाठीही झाला.
हैद्राबाद शहराला पुरापासून संरक्षण मिळण्यासाठी त्यांनी निर्माण केलेल्या 'फ्लड प्रोटेक्शन सिष्टम' ने विश्वेश्वर्यांना प्रसिद्धीच्या झोतात आणले होते.1912-1918 च्या दरम्यान म्हैसुरचे दिवाण म्हणून काम करणाऱ्या विश्वेश्वर्यांनी भारताच्या आर्थिक नियोजनाचा पायाही घातला होता.सन 1934 साली त्यांनी 'Planned Economy in India' हे पुस्तक लिहीले.यालाच 'Sir M. Visvesvaraya plan' ही म्हणतात.
ब्रिटिश कालीन भारतात जन्मलेल्या या जिज्ञासू व्यक्तीने आपल्या संशोधनाच्या बळावर ईतिहासाला त्यांच्या कार्याची दखल घेण्यास भाग पाडले.त्यांच्या कार्याच्या सन्मानार्थ 1955 साली भारत सरकारने त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च भारतीय पुरस्कार देऊन गौरवित केले.
अशा या संशोधन,जिज्ञासू आणि अभ्यासू अभियंत्याच्या कर्तृत्वाच्या स्मरणार्थ त्यांचा जन्मदिन आभियंता दिन म्हणून साजरा केला जातो.
अशा या महान व्यक्तीच्या जयंतीदिनी सध्याच्या अभियांत्रिकी क्षेत्राबाबत लिहीणे उचित राहिल.
भारत सरकारने अभियांत्रिकी क्षेत्राच्या वाढीसाठी आय आय टी हैद्राबाद चे चेअरमन बि.व्ही.आर मोहन रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली समिती नेमली होती.
त्या समितीने आपला अहवाल या वर्षाच्या सुरूवातीला ए आइ सी टी ई(AICTE) ला सुपुर्द केलांय.
सदर अहवालात समितीने 2020 नंतर कुठल्याच नव्या अभियांत्रिकी विद्यालयांस परवानगी देऊ नये असे म्हटले आहे,तर परवानगी असलेल्या मेकॕनिकल,इलेक्ट्राॕनिक,सिव्हिल सारख्या पारंपारिक कोअर ब्रांचेस मधे नव्याने जागाही वाढवू नये.असं नमूद केलंय.
इतकेच नव्हे तर 2016-17 मधे देशांतील 3291 अभियांत्रिकी महाविद्यालयातील 51% जागा(तब्बल 15.5 लाख जागा) खाली होत्या.याची माहितीही दिली. हे भयानक आहे,पण असं का आहे हे ही समजून घेतलं पाहिजेत.
जे आपण शिकलो ते कृतीत उतरविण्यास सक्षम करते, त्याला ज्ञान म्हणता येईल.म्हणजेच थेअरी शिकून जे 'प्रॕक्टीकल'(अप्लाय) करायला उद्युक्त करतं ते ज्ञान.
अशी कुशलता ज्यांच्या अंगी येते त्या विद्यार्थ्यांना खरे ज्ञानार्थी म्हणता येईल.
पण ती कुशालता निर्माण करण्यासाठी सुयोग्य आणि विद्वत्तेचा व्यासंग असण्यार्या विद्वानांची म्हणजेच मार्गदर्शकांची गरज असते त्याशिवाय ज्ञानार्थी घडविनेही शक्य नसतं.
त्याचबरोबर त्या विद्वानांच्या विद्वत्तेचा सन्मान करणारे प्रशस्त,आधुनिक सुविधा व तंत्रज्ञानांनी सुसज्ज अशा महाविद्यालयांची गरज असते.(अर्थात 'इन्फ्रा'म्हणजेच पायाभूत सुविधा).
तेव्हा कुठे ती एक आदर्श व्यवस्था बनून उत्तम दर्जाचे अभियंते जन्माला घालते.
इतकेच नसून तत्सम व्यवस्थेचा दर्जा राखण्याबाबत कठोर नियंत्रण ठेवणार प्रशासन आणि त्या ज्ञानार्थ्यांच्या सन्मानतेचा रोजगार ऊपलब्ध करुन देणारे तत्पर शासन.
असा एकंदरीतच जैवसाखळीप्रमाणेचा हा क्रम 'ज्ञान साखळीबाबत'राखने शिक्षण क्षेत्रातील शाश्वत विकासासाठी गरजेचा असतो.
पण दुर्दैवाने वरील व्यवस्था ही अभियांत्रिकी क्षेत्राबद्धल स्वप्नवतच असून,आभियांत्रिकीची संपूर्ण रचनाच खिळीखिळी झालेली दिसून येते.
खालील दोन प्रसंग लक्षात घेतले पाहिजेत.
2017 मधे 'अॕस्पायर माइंड' या संस्थेने घेतलेल्या सर्व्हे नुसार देशातील तब्बल 95% अभियंते बेरोजगार होते.नुकत्याच आलेल्या पिराॕडिक लेबर सर्व्हे च्या अहवालाने देशामधे 45 वर्षातील सर्वाधिक बेरोजगारी असल्याचे अधोरेखित केले आहे..
तसेच मध्यंतरी infosys चे नारायण मूर्ती यांनी "अभियांत्रिकी महाविद्यालयातून दर्जाहीन अभियंते बाहेर पडत आहेत[iit सुद्धा)"असल्याचे वक्तव्य केले होते.
वरील दोन्ही गोष्टींचा सामाईक पने विचार केल्यास ज्ञान साखळीचे महत्व लक्षात येते.
95% टक्के अभियंत्यांना रोजगार नाही आणि त्यातील बरेचसे रोजगाराच्या क्षमतेचे सुद्धा नाहीत.ही बाब भरमसाठ वाढलेल्या सुमार दर्जाच्या काॕलेजेस मुळे झाली आहे.
महाविद्यालयांची वाढलेली संख्या ही चिंतेची बाब नव्हेच,पण ती गुणवत्ता,ज्ञानवत्ता ऐवजी जर धनवत्ता च संपादन करण्यात गुंतलेली असेल तर ते दुर्दैव असते आणि दुर्दैवाने ते वास्तव सुद्धा आहे.
तासिका तत्वावर शिकविनारे शिक्षक ,भाडोत्री ईमारत,अर्धवट यंत्र-तंत्र सामग्री(किंवा 'इंस्पेक्शन' च्या वेळी भाड्याने पण आणतात).scholarship साठीची bogus admissions (online मुळे या प्रकाराला आळा बसेल).ई व तत्सम बाबी ह्या दर्जा खालावण्यास कारणीभूत ठरतात. कागदांवर सगळे नियम अगदी तंतोतंत पाळलेले असतात, पण मग ते बहुतांश वेळी कागदावरच राहतात.
त्याचे पर्यावसन दर्जा खालावण्यात होतो.
बहुतांशी शिक्षण सम्राट हे राजकीय च असल्यामुळे 'इंस्पेक्शन' करतांना किंवा त्रुटी आढळल्यावर सुद्धा महाविद्यालयांवर कारवाई किती 'निरपेक्ष' होत असेल.
याचा विचार होने ही गरजेचा आहे.
बर्याच काॕलेजस मधे तासिकेवर शिकविनारे शिक्षक शिकवित असतात.
त्यातील बहुतेक जण हे पास'आऊट' झालेले बेरोजगार सिनियरच असतात.
त्यांना जाॕब ची गरज असते आणि काॕलेजला कमी पैशात शिकविणार्यांची. आणि मग या दोन्ही अतृप्त जिवांच एकमेकांच्या गरजेपोटी मिलन होतं.
अशावेळी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेले व्यासंगी व अनुभवी मार्गदर्शन मिळत नसल्यामुळे 'रट्टा मार पाटार्थी' फळाला येतात.
पर्यायाने त्यांच्यातील चिकित्सक वृत्तीच मारल्या जाते.
आणि मग विद्यार्थी प्रॕक्टिकल ऐवजी 'थेअरी' वरच जास्त लक्ष द्यायला लागतात.
शिक्षणाच्या बाजारीकरणात टिकण्यासाठी व नविन प्रवेश घेणार्यां नव विद्यार्थ्यांना काॕलेज कडे आकर्षित करता यावे यासाठीही
प्रॕक्टीकल्स चे मार्क्स भरगच्च देऊन निकालांचे आकडे फुगविल्या जातात.
पण दुर्दैव बघा ना ज्या 'प्रॕक्टीकल्स' मध्ये भरगच्च गुण मिळविणारे विद्यार्थी प्रत्यक्ष जिवनात त्याच 'प्रॕक्टीकल्स' चे 'इम्प्लिमेंट' करतांना सपशेल अपयशी ठरतात.मग त्यांना साधी अॕप्टीट्यूड ची टेष्ट घेऊन जाॕब देणाऱ्या कंपन्या वर्ष-दीड वर्षाचे ट्रेनिंग देतात(म्हणजे नव्याने शिकवितातच).
पण हे नेमके का होते?ह्याचा विचार होणे गरजेचा आहे.
प्रचलित असलेल्या प्रॕक्टीकल्स च्या पद्धती सपशेल कामाच्याच नाहीत.
कारण 'प्रॕक्टीकल्स' आणि 'असाइनमेंटस' ह्या दरवर्षी त्याच त्या असल्यामूळे,
मुलं फक्त ती 'काॕपी पेष्ट' करून कागदं काळे करायचे सौजन्य दाखवितात.
आणि ती पन एका रात्रीत(तेवढे कागद जरी वाचविले तरी कितीतरी वृक्ष वाचतील).
जेव्हा 'प्रॕक्टीकल्स परफाॕर्म' करण्याची वेळ येते,तेव्हा मात्र अक्षरशः रट्टा मारून आणलेले 'प्रोग्राम्स परफाॕर्म' केले जातात.
त्याला लाॕजिक लावण्याची काही गोष्टच नसते,कारण तेवढी क्षमताही विद्यार्थ्यां मधे निर्माण केलेली नसते.
अशा या वातावरणात विद्यार्थी मात्र 'अपने धुन मेच' असतात.
अभियांत्रिकी च्या विद्यार्थ्यांमध्ये एक भारीवाला 'रँचो अॕटीट्युड' भरलेला असतो. सेमेष्टर भर एंजाॕय आणि परीक्षेचा पंधरवाडाच फक्त अभ्यासासाठी राखीव ठेवायचा,सेमेष्टर भर अभ्यास करनारा अभियंताच नसतो वगैरे वगैरे गोष्टींचा ....
कुणी कुणी तर 'नाइट रायडर्स'च असतात. एका रात्रीत टाॕप मारणारे .त्यांचं अभिनंदनच पण मग एका रात्रीत एका विषयाचा अभ्यास होऊ शकतो का? तर त्याच ऊत्तर होयंच असेल कारण निकाल तर डिस्टिंक्शन मधेच असतो ना.
पण पुन्हा प्रश्न तोच ऊभा राहतो की आपण ज्ञानार्थी आहोत की पाठार्थी? याचे उत्तर प्रत्येक विद्यार्थ्याने स्वताःला विचारायला हवे.मला विश्वास आहे की याचं उत्तर नकारार्थीच येईल.
मला असं वाटतं की वरील सर्व गोष्टींचा परीणाम अकुशलता व बेरोजगारी मध्ये झालेला आहे.
अभियांत्रिकी चा अभ्यास करतांनाचा रँचो वाला अॕटीट्युड,अभियांत्रिकी झाल्यावर मात्र चकनाचूर होतो.आणि मग त्याचे पर्यावसन अगदी लिपिकांच्या जागेपासून तर "कुठलाही job मिळायला पाहिजेत यार".
या हताश व हरलेल्या भावनांन मधे होते.
काही जण m.b.a करून करतात, तर काही B.P.O मध्ये किंवा स्पर्धा परीक्षेत स्वतःला घुसडवुन धडपडतात.त्यांना त्यांच्या पायावर उभे राहून स्वताःच्या पेशाला साजेसा व्यवसाय ही काढता येत नाही, कारण तेवढी क्षमताच त्यांच्यात निर्माण झालेली नसते.
एकंदरीतच संशोधक आणि शोधक वृत्तीची ओळख असलेला अभियंता हताश होऊन सन्मानाच्या 'ऊदरनिर्वाहासाठी दीन'झालेला दिसून येतो.
कुठल्याही देशाचा विकास हा मोठ्या प्रमाणात त्याच्या संशोधन व तंत्रज्ञान क्षेत्रावरच आधारलेला असतो.अमेरिका,चिन,युरोपियन देश यांनी कायमच या क्षेत्राला प्रोत्साहन दिलेले आहे. म्हणून दिवसागणिक ते अधिक मजबूत सुद्धा बनत आहेत.
भारतातील cream talent सिलिकाॕन व्हॕली चमकावित आहेत.सुंदर पिचाई,सत्या मंडेला,राजीव सुरी व इतर अनेकांनी अनु.गुगल,मायक्रोसाॕफ्ट,नोकिया व अन्य जागतिक टाॕप कंपन्यांमधे पदे भूषविलेली आहेत...पण दुसरीकडे 'अस्पायर माइंड'च्या अहवालानुसारच 2013 मधील पदवीधारक असलेले 7% अभियंत्यांनाच अभियांत्रिकी मधील कोअर टास्क हँडेल करता येतात .हे दुर्दैवी आहे.
"भारतीय शिक्षण पद्धती ही फाॕल्टी असून,80-85% युवकांकडे नौकरी साठी लागणारे पुरेसे कौशल्यही आपली शिक्षण व्यवस्था निर्माण करू शकत नाही".अशी खंत नारायण मुर्तींनी व्यक्त केली होती.
एकेकाळी नालंदा,तक्षशिला यांसारख्या जागतिक दर्जाच्या भारतीय शैक्षणिक संस्थेंनी जगाला उच्च दर्जाचे शिक्षण दिले.
बुद्धांसारखा तत्वज्ञ,आर्यभट्टांसारखा गणितीतज्ञ, 'कामसुत्रासारखा' ग्रंथ देणार्या वात्सायन व असे अनेक जगाला दिशा देणारे विद्वान या देशाने दिलेले असतांना,त्याच भारतात प्राथमिक शिक्षणासहित, उच्च शिक्षणाला आलेली अवदसा ही एक शोकांतिकेची बाब आहे.
बि.व्हि.आर रेड्डी समितीने सुचित केल्याप्रमाणे सरकारने येत्या काळात अभियांत्रिकी क्षेत्रामधे आर्टिफिशीयल इंटिलिजीएन्स,ब्लाॕक चैन तंत्रज्ञान,डेटा सायन्स इ. नवीन क्षेत्रामधे पदवीपुर्व अभ्यासक्रम सुरू करावेत.
सर्वच स्तरावरील शिक्षण व्यवस्थे मधे परीवर्तन आणून आधुनिक अभ्यासक्रम,तंत्रज्ञान पद्धतीचा अवलंब करावा. शेवटी तंत्रज्ञानामुळे होणारा विकास हा झटपट आणि व्यापक होत असतो. तो करण्याची क्षमता अभियंत्यांमधे आहे.
आजच्या या विश्वेश्वरैयांच्या अनुययांची दखल सरकारने घ्यावी, त्यांच्या सन्मानार्थ रोजगार त्यांना मिळावा, तसेच त्यांची क्षमता वाढविनारी व्यवस्था निर्माण करावी.
त्यामुळेच देशाच्या अर्थव्यवस्थेला खर्या अर्थाने गती येईल आणि देश महासत्ते कडे जाईल.
व तीच खरी विश्वेश्वरैय्यांना आदरांजली ठरेल..
:-सौरभ हटकर
खामगाव जि बुलढाणा
9604079143
सौरभ ,आपण खुप खुप अभिनंदनास पात्र आहात.
ReplyDeleteविषयाची रोख ठोक,मुद्देसूद आणि वस्तुनिष्ठ मांडणी केली.
वस्तुतः दीन अभियंता हे शीर्षक वाचूनच मी आपला पूर्ण लेख वाचला.
खूप शुभेछा!
धन्यवाद साहेब.
DeleteKatu Satya
ReplyDeleteGreat.....