नेहरूजी तुम्ही खरंच देशाचं वाटोळं केलं..*

*
.......वर्ष भरापुर्वीचा लेख
✍🏻सौरभ हटकर

14 aug 1947 साली घटना समितीसमोर बोलतांना नवभारताचा केलेला  दृढनिश्चय किंवा देशाला लालकिल्ल्यावरून देशाला दिलेली दिशा...आणि त्या साठी जवळपास 2 दशक केलेले कष्टामुळेच देशाचं वाटोळं झालं नेहरूजी....
अहो जवळपास 150 वर्ष इंग्रजांनी भारतावर राज्य केलं..."देडसो साल अंग्रजोने इस देश कु लुटा है...ये सब पाप अंग्रेजो का है" असल्या थापा मारून तुम्ही जनतेला भावूक भ्रामक करू शकला असता . पण नाही तुम्ही  घटना समितीसमोर "जेव्हा आपण जून्यातून नव्यात प्रवेश करतो,जेव्हा एका युगाचा अंत होतो आणि जेव्हा राष्ट्राचा बराच काळ दडपलेला आत्मा व्यक्त होतो.अशा गंभीर क्षणी आपण भारताच्या आणी भारतीय जनतेच्या सेवेला तसेच त्याहून अधिक महान अशा मानवतेच्या कार्याला ,वाहून घेण्याची प्रतिज्ञा करणे उचित राहील" असे बोलून तुम्ही नवभारताविषयी उदार आणि व्यापक आकांक्षा मांडल्या हे चुकलंच.

नेहरूजी गांधी हत्या ही विशिष्ट विचारसरणीच्या विशिष्ट संघटनेच्या विखारी प्रचारामुळे झाली म्हणून तुम्ही त्या संघटनेवर तात्पुरती बंदी आणली. पण ही बंदी कुणाचे विचार स्वातंत्र्य हिरावू नये म्हणून उठवलीही. अनेक पत्रकार,संघटना,वृत्तपत्रे तुमच्या विरूद्ध गळा काढत असायची....ठरवलं असतं तर त्या सर्वांचा बंदोबस्त तुम्हाला सहज करता आला असता...संपादकाला हाकलता आलं असतं..तेव्हा तुमची प्रसिद्धी शिखरावर होती...तुम्ही त्यांना देशविरोधी ठरवून मोकळेही होऊ शकले असता...पण नेहरूजी तुमचं Liberal वागणं चुकलंच....

नेहरूजी 1947 ला देश स्वातंत्र्य झाला अन तुम्हाला विरासतेत काय मिळालं? तेव्हाची 7 अभियांत्रिकी काॕलेजस ,25%पुरूषांची साक्षरता ,7.9% स्त्रीयांची साक्षरता,18 हजार डाॕक्टर ....फक्त लाखभर किलोमिटरचे रस्ते ...अन विज्ञान,तंत्रज्ञान अन संशोधनाचा त देशाला मागमूस ही नव्हता...अर्ध्या पेक्षा जास्त देश भूकेने व्याकूळ होता....हिंदू मुसलमान,हिंदी-बिगर हिंदी,उत्तर दक्षिण अन अशा कित्तेक अस्मितांनी देश पोखरलेला होता....अर्थव्यवस्थेने कंगाल होता....
पण तुम्ही रडला नाही इंग्रजांच्या नावे....पहिल्यांदा तुम्ही विखुरलेल्या देशाला बांधण्याचे प्रयत्न केले...एकसंध सामर्थ्यशाली ,बलवान भारताची एक एक भुजा समर्थ बनविण्यासाठीच झटत राहीला...कुण्या धर्माचा,विचारसरणीचा द्वेष केला नाही..किंवा द्वेषाला प्रोत्साहन ही दिले नाही...हि तुमची मानवता होती....अन तुमच्या या मानवतेमुळेच आज तुम्ही धर्म परावर्तीत होता ..असा अपप्रचार सहज खपविल्या जातोय....

नेहरूजी ,अर्थव्यवस्था कंगाल असताना ही ना तुम्ही कम्युनिस्ट राष्टांचे गटात गेला ना तुम्ही कॕपिटलिष्टांच्या ताटाखालचं मांजर झालात...तुम्ही तर काळाला ओळखून  तिसर्या जगाचं नेतृत्व करीत देशाला संपन्न करीत गेला...
अन म्हणून आज देश जगात 6 व्या क्रमांकाची अर्थव्यवस्था असलेला देश झालाय..देशाची साक्षरता 73%(2011 नुसार)झाली, भरमसाठ विद्यापिठे अन काॕलेजस,hospitals उभी राहिली...तुम्ही IITs,104 उपग्रह एकाच वेळी अवकाशात पाठवून जागतिक विक्रम करणार्या isro सारख्या संस्थाना चालना दिली हे तुमचं चुकलंच.......बसले असते लाल किल्ल्यावर होम हवन करीत किंवा सांगितल्या असत्या पुराणातल्या सर्जरीच्या विज्ञान कथा तरी भागलं असतं नेहरुजी...पण तुमच्या उदार धोरणांमुळे देशाचा पाया बनत गेला....हे तुमचं चुकलंच..

वरील वर्णन केलेले अनेक व राहिलेले कित्येक  चुकांमुळे  देश आज विकलांग अवस्थेला येऊन पोहोचलांय नेहरूजी.....
म्हणून म्हटलं 72 व्या स्वातंत्र्यदिनी तुम्हाला त्याची आठवण करून द्यावी... करीता हा लेख प्रपंच

:-सौरभ हटकर
खामगांव,जि.बुलढाणा9604079143

Comments

  1. You have way of thinking.
    Keep writing on your blog and always be responsible. remember people always slowly moving towards new INDIA you should give them the Path.
    every national hero make a too much sacrifices but the political people uses that persons as they want for own benefits and it's always happens in each area dear. That's nature of life.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .