धनगर नव्हे;तथाकथित classical शहरी पर्यावरणवादी पर्यावरणांस धोकादायक आहेत.

13 aug 2019 ला विजय पिंजरकर यांचा 'state govt fails to act against report on sheep grazing'ह्या मथळ्याखाली times of india  मधे लेख आला होता.योगायोग असा की ठिक वर्षभरापुर्वी म्हणजे 14 आॕग 2018 ला पिंजरकरांचाच  अशाच प्रकारचा लेख times of india  लाच छापून आलेला आहे.
दोन्ही लेखामधे मेंढपाळ(धनगर) समाजाला गुन्हेगार ठरवून यथेच्छ झोडपलेले आहे.
धनगरांमुळे वने कशी धोक्यात येत आहेत याबाबत त्यांनी अनेक आरोप करून ,वनसंवर्धनाच्या बाबतीमधील elite and classical अप्रोच वापरला आहे.यावरून त्यांचा धनगर आणि इतर वन्य निवासी जमातीबाबतची पुर्वग्रह दुषित मानसिकता दिसून येते.
असो  सदर मुद्ध्यांचे खंडन करणे हे मेंढपाळपुत्र म्हणून आमचे कर्तव्ये आहे.
करीता हा लेखप्रपंच..

त्यांच्या लेखातील काही आरोप:-
आरोप क्रं1)सातपुडा फाऊंडेशन चे कैलाश रिठे म्हणतात त्याप्रमाणे"   मेंढपाळांमुळे सरकार राबवित असलेल्या 33 कोटी वृक्षरोपणांस धोका आहे."
उत्तर:-खरंतर पर्यावरण क्षेत्रात कार्य करणार्या कार्यकर्त्यांनी सरकारच्या चुकीच्या धोरणांवर बोलायला हवं न की सरकारच्या बाजूने.
2016 साली सरकारने 2 कोटी वृक्ष लागवड केली.
2017 मधे 4 कोटी,
2018 ला 13 कोटी
आणि 2019 ला 33 कोटींची तथाकथित वृक्ष लागवड केली,अस सरकार सांगते. पण ती 52 कोटी वृक्ष कुठं पेरली?कशी पेरली? आणि त्यातील किती जगली? ह्यावर खरंतर फॕक्ट चेक आॕपरेशन करणं हे कैलाश रिठेंसारख्या पर्यावरण क्षेत्रात काम करणार्या लोकांचं काम आहे.
पण स्थानिक नेत्यांच्या अभयामुळे आणि आर्थिक संबंधापायी हे असले तथाकथित कार्यकर्ते त्यावर न बोलता मुक असलेल्या समाजाविरूद्ध सतत बोलत असतात.
ते 52 कोटी वृक्ष हे कसलाही विचार न करता,आजूबाजूच्या ecosystem चा अभ्यास न करता .वाट्टेल तिथे खड्डे खोदून जाहिरातबाजीसाठी पेरून दिली जातात.(जे की हे सरकार सतत जाहिरातबाजीतच तरबेज असल्यामुळे ही सवय स्थानिक नेत्यांनाही लागली आहे.)कित्येक ठिकाणी तर मागच्या ठिकाणीच असलेल्या खड्ड्यातच नवं वृक्षरोपण करून फोटो काढल्या जातात.हे मात्र रिठेंना दिसत नाही.
याऊलट मेंढरं ज्या वनस्पती रानातल्या खातात त्या वनस्पतीच्या बिया त्या त्यांच्या विष्ठेद्वारे रानात ईतरत्र फैलावून seeds dispersal ची सेवा निसर्गाला परत करतात.
त्यामुळे स्थानिक ecosystem ही मेंढरांमुळे संतुलित ठेवल्या जाते. मेंढपाळ आनंद कोकरे (पुणे) त्यांच्या अभ्यासावरून सांगतात की"घोटबोर,बाभूळ,शिवनळ  सारख्या वनस्पती (मी हे ठामपणे सांगतो की ह्या वनस्पती मनजितसिंह शिखांना माहितीही नसतील,कारण मी त्यांना वैयक्तिक ओळखतो) मेंढराच्या विष्ठेतून पडाल्या तरच पुन्हा उगवितात,त्यांच्या बिया  तशाच फेकल्या तर येत नाहीत."

पर्यावरण तज्ञ  माधव गाडगीळ म्हणतात की स्थानिक पशुधन हे स्थानिक पर्यावरणांस पुरक असतं,ते तेथील ecosystem चाच भाग आहे. जर जबरदस्तीने त्यांना जंगलाबाहेर काढले तर काय परिणाम होतात याचे उदाहरण देतांना माधव गाडगीळ हे सांगतात" 1982 साली भरतपुर wetland ला Siberian crane या migratory पक्षासाठी national park जाहिर केले होते ,तेथील स्थानिक म्हैशींना सदर परीसरात चराई बंदी केली गेली.त्याविरोधात स्थानिकांनी मोठे आंदोलन केले व त्यात झालेल्या गोळीबारात 7 निष्पाप लोकांचा बळी गेला होता.
पण म्हैश चराईबंदीमुळे परीणामतःपाण्यात वाढणारी "paspalum" नावाचे गवत मोठ्या प्रमाणात वाढून तेथिल ecosystem डिस्टर्ब झाली आणि  नंतर siberian crane पक्षांची संख्याही कमी झाली.
अर्थात मेंढरांच्या बाबत असा स्वतंत्र अभ्यास झालेला नसला तरी मेंढर हे ही स्थानिक ecosystem  चाच भाग पिढ्यांपिढ्यापासून झालेल्या आहेत.त्यामुळे त्या पर्यावरणास धोकादायक ठरत नाहीत.

आरोप क्र:-2)मेंढपाळांच्या मेंढी चराईमुळे वनसंपत्तीला धोका पोहोचतो:-
पळस,रिठे,शिसम,साग अशा  व अनेक महत्वाच्या झाडांची पाने मेंढरं खात नाहीत.मेंढरांचे प्राथमिक भक्ष्य हे पावसाळ्यात उगविणारा चारा असतो.याउलट देशात दररोज 22,500 लोकं मरतात (NCRB report) .त्यातील बहूसंख्यांना लाकडा मधे अग्नि दिल्या जातो ती लाकडं धनगर तोडत नाहीत.
प्रत्येकाच्या घरात असलेल्या फर्निचर,दरवाजे,खिडक्या यांना लागणारे लाकूड हे वृक्षतोडीतून येते ते धनगर तोडीत नाहीत.एका वृक्षापासून 16 कागदाच्या रीम बनतात अशा लाखो रीम्स एकादिवसांत आॕफिशिअल कामांसाठी वापरल्या जातात.त्यांसाठी केल्या जाणारे वृक्षतोड धनगर करतात का?
याउलट धनगर हे  वृक्षतोड न करता पावसाळ्यात उगविणार्या चार्यावर आपली व मेंढरांची उपजिविका भागवितात.

आरोप क्र 3)बुलढाणा आणि जळगांव जिल्ह्यातील चराई परवानगीबाबत समितीचा नकारात्मक रिपोर्ट:-
बुलढाणा आणि जळगांव येथील दोन्ही कार्यालयाला संपर्क साधला असता,दोन्हीनी कुठलांच प्रतिसाद दिला नाही.
तरीही समितीचा रिपोर्ट काहीही असला तरी वनखाते हे सदैव वननिवासी लोकांच्या विरोधात काम करीत असते. हे देशभरातील विविध तज्ञ आणि प्रकरणावरून सहज समजून येते.


आरोप क्र4)मनजितसिंह शिख(तरूणाई फाऊंडेशन) म्हणतात"स्थानिक नेत्यांचीच मेंढरं असल्यामुळे त्यांना आवरणं शक्य जात नाही.तसेच मेंढपाळांनी  महिला वन गार्डसहित  असणाऱ्या वनकर्मचार्यांवर हल्ला केला असून वनखात्यातील मनुष्यबळ मेंढपाळांना रोखण्यास अपयशी ठरत आहे.
तसेचoct नंतर चार महिने चराई परवाना दिल्यास पर्यावरणाचे नुकसान होऊन नविन गवत उगविण्यास,आणि झाड-झुडपांस धोका पोहोचून नैसर्गिक पुननिर्मितीला धोका पोहोचवितात. मेंढपाळांमुळे वृक्षरोपणांसही धोका पोहोचतो.
उत्तर :-मुळात  धनगरांची मेंढरं आणि पर्यावरण  हे परस्पर  मारक नसून,पुरक आहे.हे उत्तर क्र1,2,3 वरून लक्षात येईल.
मेंढरं जसे वनांपासून आपला चारा घेतात तसेच वनांना काही सेवाही मोफत देतात.
मेंढरांच्या लेंड्या-मुत्र ह्या जमिनीचा पोत राखण्यांस,ऊत्पादकता वाढविण्यास,धूप वाचवून पाण्याचा योग्य निचरा होण्यासाठी आणि वनस्पतीच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त ठरतात .त्यामुळे धनगरांची मेंढरं आणि पर्यावरणाचे mutually benefited  असं नातं आहे.
म्हणून धनगरांना वर्षभर रानातचराईला परवानगी मिळायला हवी.तो त्यांचा पारंपारिक नैसर्गिक अधिकारच आहे.
पण वनखात्याला colonial legacy  आहे.ब्रिटिश काळात वनखातं हे आदीवासी आणि वननिवासी जमातींविरूद्ध अन्याय करण्यासाठी काढले होते.त्याविरोधात बिरसा मुंढांसारख्या अनेक आदीवासींनी कसा लढा दिला होता हे सर्वश्रुत आहे.स्वातंत्र्यानंतर हे बदलायला हवं होतं पण आजही वनखातं आदीवासी आणि वननिवाशांना प्रचंड त्रास देत असतात(याची अनेक उदाहरणे माझ्याकडे आहेत).त्यामुळे धनगर वनअधिकार्यांना मारतात हा दावा हास्यास्पद आहे.

so called classical urban conservation activist vs indigenous tribal people.

मनजितसिंह शिख  यांना मी वैयक्तिक ओळखतो.आम्ही दोघेही एकाच तालुक्यातून आहेत.ते काही पर्यावरण तज्ञ किंवा पर्यावरणक्षेत्रात काम करायचा प्रचंड  दांडगा अनुभवंही त्यांच्याकडे नाही.
2014 पुर्वी खामगांव-जालना महामार्गाचे काम करण्यासाठी 50-100 वर्षांपेक्षा जास्त वय असलेली हजारो झाडे कापल्या गेली.त्या बदल्यात पर्यायी वृक्षरोपण कुठेच केल्या गेले नाही.वृक्षतोडीनंतर 5-6 वर्ष त्या रस्त्याचे कामंच झाले नाही.परीणामी अनेक जिव अपघातात गेले.त्या महामार्गावरील अनेक गावांत यंदा पाणी पिण्यासही राहिले नाही.हे सर्व त्या वृक्षतोडी मुळे झाले असं मला वाटतं.पण तेव्हा हेच मनजितसिंह शिख तत्कालिन खामगांवच्या राजकिरण्यांचे पपेट म्हणून काम करीत होते.त्यांच्या तरूणाई फाऊंडेशन ने कुठेही आंदोलन करून विरोध केल्याचे मला दिसले नाही की 'चिपको' आंदोलनासारखे प्रयत्न करून सदर वृक्षतोडीविरोधात कुठलेही जनआंदोलन उभे केले नाही.
दोन वर्षापुर्वीही शेगांव-खामगांव मार्गासाठीही प्रचंड जूनी वृक्ष तोडल्या गेलींत ,ही वृक्ष न तोडताही रस्ते होऊ शकले असते (ह्या संदर्भात मी एका प्रतिष्ठित  मराठी वृत्तपत्रास लेख लिहीला होता.पण दुर्दैवाने दुसर्या-तिसर्या दिवशीच वृक्ष कापल्या गेलेंत)
वरील दोन्ही व प्रचंड प्रमाणातील वृक्षतोड ही मनजितसिंह शिखांच्या शहारांत झाली.पण मनजितसिंह शिखांची 'तरूणाई' त्यावेळी वृक्षरोपणावर आधारीत चित्रकला स्पर्धा व तत्सम कृतीकरून स्थानिक नेत्यांच्या पूढ पुढं करण्यात धन्यता मानित होती.कारण वरील वृक्षतोडीला विरोध करायचे धाडंस ह्या तथाकथित शहरी पर्यावरणवाद्यांमधे नसते. मुळातच स्थानिक  नेत्यांच्या सहाय्यामुळेच यांची समाजकार्य करून दाखवायची (show of)हिरोगिरी चालू असते.
म्हणून हे आपला ताव मुक असलेल्या धनगर-आदीवासी व पिढ्यांपासून जंगलात राहणाऱ्या    मुक समाजाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून,स्वतःचे मोठेपण सिद्ध करतात.पण आता हा अन्याय सहन केल्या जाणार नाही.

सोनाराने कान टोचणे हे योग्य असतं म्हणून मी या ठिकाणी जेष्ठ आणि अतिशय प्रतिष्ठित पर्यावरणवादी म्हणून ओळख असलेले माधव गाडगीळ यांच्या  पश्चिम घाटावरील असलेल्या रिपोर्ट  मधील 'स्थानिक लोकांच्या सहभागाबाबतील उदबोधने टाकू इच्छितो.
ते म्हणतात Stronghold of forest department over local bodies is the classical example of syndrome of development by exclusion and conversion also by exclusion that plague us today.only when we put it in inclusive development as well as inclusive conservation will be able to move in the direction of environmentally suistainable and people friendly developement.
आता मुळात अशा मतांसाठी प्रचंड अभ्यास आणि स्थानिक लोकांबाबत संवेदना असायला हव्यात ज्या की तथाकथित बाहेरून आलेल्या(exotic species)  असलेल्या मानजितसिंह शिख आणि तत्सम classical urban conservation activists  लोकांकडे नसतात. म्हणून ते पिढ्यांपिढ्या जंगलात राहून आपले उदरनिर्वाह जंगलावरच भागविणार्या लोकांना जंगलाचे दुश्मन समजतात.

जंगले कमी कशामुळे झालीत?जमिनीची धूप कशामुळे झाली?हवामान बदल कशामुळे होत आहे? याची उत्तरे भरमसाठ वाढलेले शहरीकरण,केलेली बांधकामे,खोदलेल्या अधिकृत आणि अनधिकृत minings,बांधलेले रस्ते,धरणं,बिल्डर लाॕबी हे आहेत.हिमालयापेक्षा जूना असलेला अरावली पर्वतामधील 31 डोंगरे हे तेथील बिल्डरांनी आणि mining मुळे अनधिकृतरीत्या खोदून कायमस्वरूपी नष्ट केलीत,तर कोकण मधलं 1600 हेक्टरचं जंगल नष्ट केल्या गेलं, म्हैसूर-वायानाड मधे बांधल्या जाणार्या महामार्गाला   wild life sanctuary  मधून pench tiger reserve  च्या धर्तीवर underpass  बांधता येईल का? असा प्रश्न  गडकरींना लोकसभेत विचारला असता,गडकरी म्हणतात "भारतासारख्या गरीब राष्ट्राला हे परवडणारं आहे का?आपण environment or economy  हे ठरवलं पाहिजेत" याचा सरळ अर्थ असा होता की बंदीपुर wildlife sanctuary मधून underpass  जाणार नाही.
वरील सर्व कामांमधून नष्ट होणार्या ecosystem ह्या कायमच्याच नष्ट होतात.
त्या पुर्ववत आणता येत नाहीत किंवा त्यांची भरपाई तथाकथित 52 कोटी वृक्ष लागवडीतूनही होत नाही.याउलट धनगरांची मेंढरं ही पर्यावरणापासून काही सेवा घेऊन,पर्यावरणांस काही सेवा परत करतात.
पण तथाकथित शहरी पर्यावरणवादी याविरूद्ध न बोलता मुक असलेल्या,प्रतिनिधित्व नसलेल्या समाजाला target केल्या जातं.अशाच या तथाकथितांमुळे फेब 2019 मधे सुप्रिम कोर्टाने 50 लाखांवर आदिवासांना जंगलाबाहेर काढण्याचे आदेश दिले होते.
देशभरातून अनेक खर्या पर्यावरणवादी लोकांनी निर्णयाला विरोध करून सुप्रिम कोर्टाला फेरविचार करावयांस लावले होते.

शेवटी या तथाकथित कार्यकर्त्यांना माधव गाडगिळांच्या report मधील संदेश देऊन,आपला बघायचा दृष्टिकोन bottom-up  असा ठेवावा अशी विनंती करतो.
There is a wide-spread belief amongst urban conservation activists, endorsed whole
heartedly by the forestry establishment, that it is the local community members and their
subsistence requirements that are the main threat to India’s wildlife. The case study of BRT hills brings out how erroneous this line of thinking has been, as does the experience of the
Bharatpur wetland. WGEA should therefore focus on promoting proper implementation of
the Forest Rights Act which confers on forest dwellers certain rights and responsibilities
inside Wildlife Sanctuaries and National Parks also.(Madhav Gadgil)

सौरभ हटकर
खामगांव9604079143

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .