for collegeous leaders..

"आम्ही बी बिघडलेलोच ना" काॅलेज मध्ये एका ठिकाणी झालेल्या भाषणाचा प्रसंग । मि तावातावात बोलत होतो कारणहीम विषयही 'आजचा भारत' होता। स्पर्धक तर होतेच पण आज मला स्पर्धे साठी नाही देशासाठी बोलायच होते। मग सुरूवातच ऊपस्थित सळसळत्या रक्ताच्या ऊकळत्या विचारांना प्राधान्य देणार्या तरूणाईला जयहिंद ची साद घालुन केली। हा देश तरूणांचा म्हटल्या जातो ,येथे प्रत्येक तिसरा व्यक्ती तरूण आहे । आणि जगातले सर्वाधिक तरूण भारतातच आहेत म्हणुन तरूणांचा तरूण देश भारत देश म्हणायला तस हरकत नाही। पण मग नुसताच संख्येने तरूण असलेला भारत मात्र तरूणांच्या आचरणाने वयोवृद्ध झाल्या सारखाच भासत आहे। ईतिहास वाचता भारताच्या तरूणांनी सुवर्णअक्षरांना लाजवेल अशीच कार्य केलीत म्हणुन भगतसिंग,सुखदेव,राजगुरू,सुभाषचंद्रबोस यांसारखे ज्वलंत कार्यशिल तरूण, स्वामि विवेकानंदांसारखे तत्वशिल तरूण, छत्रपति शिव-संभाजींसारखे पराक्रमि तरूण, शिवाजी काशिद,तानाजीं सारखे स्वामिनिष्ठ तरूण। यांसारख्यांमुळेच तर मिळाली स्वातंत्र्य ,स्वाभिमानाची अस्मिता। यांसारख्या ध्येयवेड्या तरूणांनीच निर्माण केले स्वराज्य,स्वातंत्र्य मग येवढा जाज्वल्य देशप्रेमी तरूणांचा ईतिहास असलेल्या देशाला अवदसा का आली.......? त्याच एकमेव कारण कि आमचा देशातील तरूण देशप्रेमि तरूण देशीप्रेमि किंवा विदेशीप्रेमि झाला नि मग सळसळती अस्मिता नाल्यात रेंगळायला लागली। मग आजचा भारत ध्यानात यायला लागतो तेव्हा 'तरूण हा देशाच्या पाठीचा कणा असतो' हा विवेकानंदांच्या विचारांचा र्हास आमचा तरूण करतोय का असा प्रश्न पडतो....? आजच्या भारताचा विचार कराया लागलो तेव्हा भ्रष्टाचार,लाचारी,बेकारी,बलात्कारी,बोंधुगिरी अशा गोष्टीत अडकलेला भारत दिसायला लागतो। अशा वेळी तरूणांनी नेतृत्व हाती घेऊन परिवर्तनाची भाषा तरूणांनी बोलायला हवि होती पण......तरूण फक्त नेत्यांना शिव्या देऊन किंवा कॅडल मार्च पर्यंतच सिमित राहिलीत। बदल हवा अशी ओरड करणार्या तरूणांना जेव्हा स्वपरिवर्तनाच्या व्याख्या सांगाण्या लागलो। अनेकांची मण दुखाया लागली। कारण परिवर्तनाची सुरूवात आमच्या स्व पासुन होते। तेव्हा आम्ही तत्व अवलंबायला पाहिजेत पण आम्ही निवडणुक लडलेल्या लोकांना शिव्या देतो अन स्वता मात्र बिनदास्त त्याच पद्धती अवलंबतो। चिकित्सा करायचीच असेल तर येणार्या महाविद्ध्यालयीन निवडणुकांचे वेध घ्या व शोध ही घ्या। अहो खाण्या,पिण्या पासुन तर .....सर्व खोष्टींची व्यवस्था केली जाते। मग आमच्यात नी त्या भ्रष्टाचारी लोकामध्ये फरक तो काय। अन नसेलच फरक तर आम्हास त्यांना बोलण्याचा अधिकार तो काय.....? अरे असतील या देशातील काही नेते भ्रष्टाचारी। असतील काही अधिकारी भ्रष्ट पण ते कधीतरी तरूणच होते। आमच्या तुमच्यासारखे । म्हणजेच ते जर परावर्तित झाले असते तर कदाचित परिस्थितीच वेगळी असती। काही मित्रानी वैयक्तिक घेतले। त्यांना वाटले मि त्यांच्यावरच शेरेबाजी करतोय। काहीनी तर चक्क 'रूम वर येऊ शकलो असतो' ईथपर्यंत म्हटले आहे। अरे पण ही शेरेबाजी नव्हतीच हो हि तर निव्वळ देशप्रेमी नारेबाजी होती पण 'सत्य असत्याशी मन केले ग्वाही मानियले नाही बहुमता' सांगनारे संत तुकाराम मनी होते। म्हणुनच छातीठोक पणे सांगितल कि आता थांबवा हे सर्व। आज भलेही अशा गोष्टी वापरून तुम्ही जिंकसाल ही पण देश मात्र हारत जाईल। देशाचे अधिपतःन होत राहिल। महाविद्ध्यालयीन प्रतिनिधी होणारे देशाचे प्रतिनिधीही होतील। पण तो जर भ्रष्टचारी असतील तर देश ही असाच राहिल। ज्याच्या अंगी कला असेल जो सर्वांचा चाहता असेल। अशांना आपले प्रतिनिधी बनवा । दुभंगलेली मने जुळवा एक बना नेक बना स्वार्थी वृत्ती आवरा देशाला सावरा । ऊद्याचा दिवस आपला राहिल। अन्यथा ज्ञानेशजी वाकुडकर अगदी मार्मिक म्हणतात"ऊदंड गांडु पैदा झाले सत्तेसाठी। ------चाटतात साले सत्तेसाठी।" जय हिंद। :-सौरभ गोपाळ हटकर हिवरखेड ता खामगाव जि बुलढाणा9604079143

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

प्रवास अभियंता दिन to 'दीन' अभियंता-एक विश्लेषण .

06 Dec...