विकास महात्मे साहेब समाजाविरूद्ध अविकसित राजकारण करू नका..* *सामाज भोळा आहे ...येडा नाही...* निर्यातबंदी पुर्वनियोजितच होती....

*

⭕मेंढपाळपुत्र आर्मी⭕

काही दिवसां पुर्वी  नाशिक ते मुंबई शेतकर्यांच्या विविध मागणींसाठी शेतकर्यांनी शिस्तीत अन शांततेत लाँग मार्च काढला,
पुणे ते मुंबई स्पर्धा परीक्षेतील विविध घोटाळ्यांविरूद्ध आणि जागाभरतीबाबत विद्यार्थ्यांनी लाँग मार्च काढला,पालघर जिल्ह्यात कुपोषणामुळे शेकडो मुले मेलीत तर दुसरीकडे अंगणवाडी सेविका त्यांच्या हक्कासाठी मोठ्या प्रमाणात लढत होत्या,ए.स टी कर्मचार्यांचा बंद असोकी धनगर-मराठा आरक्षण लढा असेल  असे अनेक उदाहरणे देता येतील की जेथे लाखो लोकं आपल्या मागण्यांसाठी लढत होती.
पण सरकार कधी शेतकर्यांत माऔवादी तर कधी विद्यार्थांत डावे शोधत होते..एकंदरीत सरकार आम्ही किती पक्के आहोत अन तुमच्या मागण्यांसमोर न झुकणारे आहोत अशीच भूमिका ठासून घेतांना दाखवित होते.
हे सर्व सांगायचे कारण की डाॕ रीचा जैन नामक अल्पज्ञानी व्यक्तीने मुठभर लोकांसोबत नागपुरात 'बोकड निर्याती'विरूद्ध आंदोलन काय केले? सरकार ने कित्येक मंत्र्याच्या उपस्थित होणारा आणि विशेषतः सोशिअल मेडियावरा विशेष झगमगाटी प्रसिद्धी करून स्वतःचे तथाकथित महात्म्य धनगर समाजावर थोपविणारे डाॕ विकास महात्मे यांनी तो कार्यक्रम सहजरीत्या रद्ध केला.

आणि आपला धनगर समाज नेहमीप्रमाणे रीचा जैनांच्या विरोधात गळे काढायला लागला.
तशी समाजाला उताविळ प्रतिक्रिया देण्याची सवय जडल्यामुळे,आरक्षण निर्धार मेळाव्यात 3-4थ्यांदा नामांतर घोषणा ऐकून बॕनरबाजीचा भंडारा उधळणारा असो की खासदार-आमदारकीत सत्ताधारी झाल्याचा आव आणने असेल...ह्या सवयींमुळे समाजाचा राजकीय फायदा खूप जणांनी घेतला आहे.

मग प्रश्न राहतो की बोकड निर्यातीमागील राजकारणचं मटण शिजतं कुठं..???
खरंतर डाॕ रीचा जैन ह्या काही महाराष्ट्रातील  दखलपात्र व्यक्ती नाहीत की ,त्यांच्यामागे असा कुठला मोठा दबावागटही नाही ज्यामुळे सरकार ने सहज झुकावं.
मुळतः डाॕ रीचा जैन यांना हे सगळं जाणिवपुर्वकच करायला सांगितलं गेलं असावं.
त्याचे कारण असे की भाजपा ने आरक्षण मुद्ध्यावरून धनगर समाजातील जनाधार गमाविला आहे.
सोबतःच सरकारमधे धनगर समाजाचे अधिकृत निस्वार्थी नेते म्हणवून खासदारकी मिळविणारे अन समाजाच्या चर्चेत पद्मश्री मुळे खासदारकी मिळविल्याचा आव आणनारे डाॕ विकास महात्मे साहेब यांनाही धनगर समाज फारसा प्रतिसाद देईनासा झाला.तेव्हा धनगर समाजाचा जनाधार पुन्हा मिळावा यासाठी डाॕ महात्मे यांनी 'पहिल्यांदाच बोकड निर्यात' अशा मथळ्याखाली प्रसिद्धी करण्याचा खटाटोप करायचा प्रयत्न केला,पण समाजाने त्यांना तसा विशेष प्रतिसाद न दिल्यामुळे हे रूचकर रीचाताइंच शाकाहारी प्रकरण काढलं असावं.
ह्यामुळे असे होईल की,डाॕ महात्मे या तथाकथित  निर्यातबंदी विरूद्ध महाराष्ट्रभर आंदोलन करण्याचे नाटक करून,समाजाची सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्न करतील आणि जी पुर्वनियोजित निर्यातबंदी होती ती काढून,पुन्हा एकदा 2019 साठी भाजपाच्या चरणी आपलं महात्म्य सिद्ध करतील.
पण महात्मेसाहेब ज्या भोळ्या धनगर समाजाच्या बळावरा आपण खासदार झालात त्याच समाजाविरूद्ध हे अविकसित राजकारण करू नका....
लक्षात घ्या
समाज भोळा आहे येडा नाही....महात्मे साहेब

⭕मेंढपाळपुत्र आर्मी⭕

Comments

Popular posts from this blog

जानकर साहेब, कांशीराम व्हा.

06 Dec...

म्होरक्या - धनगर मेंढपाळ समूहाच्या सामाजिक सांस्कृतिक संघर्षाचे प्रतीक .